Dictionaries | References

धस

   
Script: Devanagari

धस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. धस देणें-मारणें &c. See under धज.

धस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A nail, splinter; a steep slope.
धशीं, धसास, धसावर घालणें-लावणें-देणें   To emperil or endanger (a business).

धस     

ना.  अग्र , टोक ;
ना.  खिळा .

धस     

 पु. १ खुंटी ; टोंक ; अग्र ; खिळा ; कुसळ किंवा दुसरा एखादा पुढे आलेला , अणकुचीदार पदार्थ ( ज्यांमध्ये अडकून वस्त्र इ० फाटेल असा ). या कुंपणाचा धस लागून धोतर फाटले . २ अविचारी , उद्धट , आडदांड माणूस . जया न कळे उपदेश । धस ऐसे त्या नांव । - तुगा २९१३ . ३ दरड ; कपारी ; उभा उतार ( नदीतीर , डोंगराची बाजू इ० प्रमाणे ). दोन्ही बाजूचा कडा उंच असून त्याचे धस अगदी उभे तुटलेले . - विवि ८ . १ . १९ . ४ ज्वारीचे ताट , खुंट , अवशिष्ट मुळखंड ; थोंठ ; फण . नसे पल्लव लंबित धस उभा परि कोण छ्याया । - दावि १८६ . ५ भीति , दुःख इ० हृदयाला जो धक्का बसतो तो . ( क्रि० होणे ). ६ ( व . ) बीळ ; भोंक . आजवर केले ते धसांत गेले . - स्त्री . जोराची मुसंडी ; हल्ला ; चाल ( क्रि० मारणे ). [ ध्व . धस ! प्रा . धस ] धसी - धसास - धसावर - घालणे - लावणे - देणे - १ साहसी , कठोर उपाय योजून एखादे काम बिघडविणे ; युक्ति न लढविणे . २ अपकार करणे ; छळणे . धसास लावणे - शेवट करणे ; कड पाहणे ; तडीस नेणे . धस देणे - मारणे - धज देणे , मारणे पहा . धसावर धस घालणे - अपकारावर अपकार करणे ; एकसारखे छळणे . धसक - धसकफसक पहा . धसवट - न . लहान धस ; कुसळ ; धस अर्थ ४ पहा . रुतले अंगांगी काटे धसकट । - विवि ८ . ९ . २२० . - वि . १ जाडेभरडे ; भसाड . २ ( ना . ) अडाणी ; आडदांड . धसकट्या , धसकनंदन - पु . १ दांडगाईने कोणतेहि काम करणारा माणूस ; आडदांड माणूस ; आदळआपट करणारा माणूस . २ अकुशल कामकरी ; हेंगाडा , अडाणी कारागीर . धसकट्या , धसक्या , धसकटराव - पु . १ दांडगेश्वर ; आडदांड ; अडाणी ( मजूर , कामकरी ). २धश्चोट पहा . धसमुसळ्या ; धसफशा . [ धसकट , धस ] धसकणे - उक्रि . १ हिसकणे ; जोराने ओढणे ; हासडणे ( कांट्याकुट्यांवरुन वस्त्र इ० ). २ जोराने घालणे ; खुपसणे ; भोंसकणे ; आडदांडपणे शिरकवणे . - अक्रि . अडकणे व फाटणे ; आवाज होऊन फाटणे . २ काडदिशी मोडणे ( काटकी , फांदी ). ३ दगड इ० उलथून पडणे . [ प्रा . धस ; हिं . धसकना ] धसकफसक --- स्त्री . बेदरकार , बेफाम वर्तणूक . धसाफशी पहा . - क्रिवि . घाईघाईने ; निष्काळजीपणाने ; उद्धटपणाने ( बोलणे ; लिहिणे ; वाचणे वगैरे ). [ धसक द्वि . ] धसकमुसळा --- पु . ( ना . ) आडदांड ( मनुष्य ); धसमुसळा पहा . धसका - पु . १ आकस्मित भीति , दुःख , इ० ने मनाला बसलेला धक्का ; चरका . २ तलवारीचा फटकारा ; काठीचा तडाखा ; हाताचा रट्टा ; धबका . ३ हिसका , हिसडा . [ धस ; धसक प्रा . धसक्क ] धसकावणी --- स्त्री . तासणी ; तोडणी ; छाटणी . धसकाविणे - उक्रि . १ जोराने रागाने खच्ची करणे ; तोडणे ; ओढणे ; सपासप तोडणे ; छाटणे ; खच्ची करणे . २ अडथळ्यांना न जुमानता हिसडे देऊन ओढणे ; फरपटणे . धसकावून बोलणे - भीडभाड न ठेवतां स्पष्ट , निर्भीडपणाने बोलणे . [ धस ] धसणे - अक्रि . १ जोराने शिरणे ; घुसणे ; जाणे ; एकदम बसणे ; भोंक पाडणे . शपथ पुरःसर दीपज्वलनज्वालांत जाहली धसती । - मोमंत्रयुद्ध ७४० . २ धजणे पहा . ३ धसाला लावणे . ४ अतिशय मन , लक्ष लावणे ( अभ्यास , काम याकडे ). - उक्रि . जोराने ( आंत , पुढे , कडे ) ठोकणे ; घालणे ; ठासणे ; शिरकवणे ; सारणे . [ धस ; हिं . धसना ; गु . धसको ] धसदार , धसाव , धसावणे - धजदार , धजाव वगैरे पहा . धसधस - स्त्री . १ धडधड . ( जिवाची - उराची धसधस ). २ ( ल . ) भीति ; धास्ति . मला त्या वाटेने जायाला धसधस वाटते . [ ध्व . धस द्वि . ] धसधस - सां - क्रिवि . १ धडधड उडून ; जोरजोराने ( उडणे ). काळीज धसधस करते , उडते जीव धसधस करतो , ऊर उडतो . गांवढेकरी उंदराचा ऊर धाकाने धसधसां करतो , उडूं लागला . - छत्रे ( इसाबनीति ). २ कडाडदिशी मोडून , फाटून , तुटून , कोसळून , पडून , फुटून , इ० . धसधसणे - अक्रि . धसधस होणे ; धडधडणे ; उडणे . ( जीव , काळीज , ऊर , छाती , हृदय ). [ धस + धस ] धसफस - फूस - स्त्री . ( भांडण सुरु होण्याच्या आधीची ) चरफड , आदळआपट ; घालून पाडून बोलणी ; कुढे भाषण . [ ध्व . धस द्वि . ] धसमस - ( कों . ) धामधूम . धसमुसळा - ळ्या - वि . १ गलेलठ्ठ ; ढोण्या ; ठोंब्या . २ दांडगाईने निष्काळजीपणाने काम करणारा ; आडदांड . धसक्या पहा . हा धसमुसळ्या दिसतो . - नाम ८ . [ धस + मुसळ ] धसरड - स्त्री . ( कों . ) नदीकांठची , टेकडीवरची उभी उतरण ; दरड . [ धस = पडण्याचा आवाज + रड प्रत्यय ] धसाडा - वि . ( व . ) जाड ; खरबरीत ( सूत , गवत , कोणताहि पदार्थ ). २ दांडगा ; धसमुसळ्या ( माणूस ). - पु . १ ( ल . ) चापटी ; धपाटा ; रपाटा . २ ( ना . ) रागाने बोलणे ; धमकावणे . कमळी फार हट्ट करुं लागली . पण मी जेव्हां एक धसाडा दिला तेव्हां बसली गप . ३ बाटूक ; खुंट ; धस ; चोय . ४ हिसका ; धका . धसाधशी - स्त्री . कापाकापी , तुकडे तुकडे ( करणे ); छाटाछाट ; एकदम , जोरजोराने कापणे , तोडणे . [ ध्व . ] धसधस - सां - क्रिवि . १ खसाखस , सपासप , फटाफट , तडातड ( तोडणे , मोडणे , फाडणे ; इ० ). परि तोडिलेचि वदनि तृण धरितेहि अगा धसधसा ते । - मोएऐपिक १ . ४ . २ धडधड होऊन ( जीव - काळीज करणे , उडणे ). ३ ओक्साबोक्सी ( रडणे ). ४ चटकन ( निसरणे ). [ ध्व . धसधसचा अतिशय ] धसाफशी - स्त्री . २ हिसकाहिसकी ; निष्काळजीपणाचे काम ; ओढाताण ; आदळाआपट . २ भांडणापूर्वीची चरफड ; धसफस पहा . ३ कापाकापी ; छाटाछाटी ( करणे - तासणे ) [ ध्व . धस द्वि . ] धसाफसा - क्रिवि . धशाफशा पहा . धसाल - ली - ल्या - वि . धसकधट्या पहा . धसासा - पु . धसधस ; छातीचा ठोका . पडति बहुत तेंव्हा रुक्मियाचे धसासे । सारुह ७ . ४ . [ धस द्वि . ] धसाळ - पु . १ विसराळू , धसाळ जाणे - विसरुन जाणे . परि बोलत बोलत प्रेमभावे । धसाळ गेलो । - ज्ञा ११ . १६१ . २ दांडगा ; आडदांड ; धसाल ; धसकनंदन . ३ अविचारी ; वेडा . केवी धसाळ म्हणो देवा तूंत । तरी अधिक हा बोलू । - ज्ञा १० . ३२० . ४ मोठा ; प्रचंड . नामे एवढे धसाळ देणे । - एभा ६ . ६ . [ धस + आळ प्रत्यय . ( तुल० प्रा . दे . धसल = विस्तीर्ण ] धसी - वि . उतावीळ . धशा पहा . धस्स - न . भीति , दुःख यांचा हृदयास , मनाला बसलेला धक्का ; आघात , धडकी . धक्का पहा . [ ध्व . धस ] धस्समसूळ - वि . धसमुसळा पहा .
 पु. बारीक तूस ; पापुदर्‍यासारखा भाग . ' कागदाचें धस निघून ते छपाई होतांना रुळावर किंवा शाइत मिसळतां कामा नयेत .' - के ३० . ३ . ३७ . ( ध्व .)
 पु. १ खुंटी ; टोंक ; अग्र ; खिळा ; कुसळ किंवा दुसरा एखादा पुढे आलेला , अणकुचीदार पदार्थ ( ज्यांमध्ये अडकून वस्त्र इ० फाटेल असा ). या कुंपणाचा धस लागून धोतर फाटले . २ अविचारी , उद्धट , आडदांड माणूस . जया न कळे उपदेश । धस ऐसे त्या नांव । - तुगा २९१३ . ३ दरड ; कपारी ; उभा उतार ( नदीतीर , डोंगराची बाजू इ० प्रमाणे ). दोन्ही बाजूचा कडा उंच असून त्याचे धस अगदी उभे तुटलेले . - विवि ८ . १ . १९ . ४ ज्वारीचे ताट , खुंट , अवशिष्ट मुळखंड ; थोंठ ; फण . नसे पल्लव लंबित धस उभा परि कोण छ्याया । - दावि १८६ . ५ भीति , दुःख इ० हृदयाला जो धक्का बसतो तो . ( क्रि० होणे ). ६ ( व . ) बीळ ; भोंक . आजवर केले ते धसांत गेले . - स्त्री . जोराची मुसंडी ; हल्ला ; चाल ( क्रि० मारणे ). [ ध्व . धस ! प्रा . धस ] धसी - धसास - धसावर - घालणे - लावणे - देणे - १ साहसी , कठोर उपाय योजून एखादे काम बिघडविणे ; युक्ति न लढविणे . २ अपकार करणे ; छळणे . धसास लावणे - शेवट करणे ; कड पाहणे ; तडीस नेणे . धस देणे - मारणे - धज देणे , मारणे पहा . धसावर धस घालणे - अपकारावर अपकार करणे ; एकसारखे छळणे . धसक - धसकफसक पहा . धसवट - न . लहान धस ; कुसळ ; धस अर्थ ४ पहा . रुतले अंगांगी काटे धसकट । - विवि ८ . ९ . २२० . - वि . १ जाडेभरडे ; भसाड . २ ( ना . ) अडाणी ; आडदांड . धसकट्या , धसकनंदन - पु . १ दांडगाईने कोणतेहि काम करणारा माणूस ; आडदांड माणूस ; आदळआपट करणारा माणूस . २ अकुशल कामकरी ; हेंगाडा , अडाणी कारागीर . धसकट्या , धसक्या , धसकटराव - पु . १ दांडगेश्वर ; आडदांड ; अडाणी ( मजूर , कामकरी ). २धश्चोट पहा . धसमुसळ्या ; धसफशा . [ धसकट , धस ] धसकणे - उक्रि . १ हिसकणे ; जोराने ओढणे ; हासडणे ( कांट्याकुट्यांवरुन वस्त्र इ० ). २ जोराने घालणे ; खुपसणे ; भोंसकणे ; आडदांडपणे शिरकवणे . - अक्रि . अडकणे व फाटणे ; आवाज होऊन फाटणे . २ काडदिशी मोडणे ( काटकी , फांदी ). ३ दगड इ० उलथून पडणे . [ प्रा . धस ; हिं . धसकना ] धसकफसक - स्त्री . बेदरकार , बेफाम वर्तणूक . धसाफशी पहा . - क्रिवि . घाईघाईने ; निष्काळजीपणाने ; उद्धटपणाने ( बोलणे ; लिहिणे ; वाचणे वगैरे ). [ धसक द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP