|
पु. पु. वेताची छडी ; वेत . [ सं . वेतस ] पु. बैत पहा . दोहरा . - प्रश २९ . ०ऊंस पु. उसाची एक जात ; हा ऊंस बोरु किंवा वेताप्रमाणें दिसतो . योजना ; रचना ; नमुना ; युक्ति . कारण ; उद्देश ; हेतु ; मसलत . पद्धत ; रीति ; व्यवस्था ; मांडणी ; टापटीप . रुप ; आकार ; रुपरेषा ; वळण ; आराखडा ( पुढील कामाचा काढलेला , योजलेला ). [ सं . हेतु ; हिं . ] बेताचा , बेताबेताचा - वि . रीतीचा ; पद्धतशीर ; योग्य व ठराविक नमुन्याप्रमाणें असलेला . मध्यम साधारण ; प्रमाणशीर ; योग्य प्रमाणाचा ; योग्य किंमतीचा . जुळता ; जुळणारा ; जमणारा ; माप , चालीरीती , स्वभाव इ० शीं जुळता . अल्पस्वल्प ; अगदीं थोडा ; तात्पुरता ; क्षणिक ; अर्धवट . त्यांचा ईश्वरावर बेताबेताचाच विश्वास आहे . - टि ४ . ३१४ . बेतावर असणें - निश्चय , ठराव , व्यवस्था , बेत , योजना , नियम यांना धरुन असणें ; नियमाप्रमाणें असणें . बेतबात - पु . व्यवस्था ; टापटीप . बेतवार - क्रिवि . पद्धतशीरपणें ; नेमस्तपणानें . बेताबेत - क्रिवि माप , आकार , तर्हा इ० बाबतींत तंतोतंत जुळणारा . ( क्व . ) तंतोतंत जुळणें . बेत्या - वि . नेहमीं भलतेच बेत , योजना करणारा , युक्त्या लढविणारा . बेतणें - सक्रि . माप घेणें व कापणें ( अंगांस घालावयाचे कपडे ). मुस्कटांत मारणें थोबाडीत मारणें . बेतणी - स्त्री . माप , आकार , रुपरेषा इ० ची आंखणी , मोजणी ( अंगांत घालावयाच्या कपड्यांची ). कपडा मापाप्रमाणें फाडणें , कापणें . बेतनीचा - वि . जमणारा ; जुळता ( मापानें , बनावटीनें इ० ) ( बेताचा ह्या अर्थी उपयोग ). बेतीव - वि . बेताप्रमाणें केलेलें ; योजनेनुसार असलेलें . मापाप्रमाणें बेतलेले , कापलेले ( कपडे ). बेतविणें - सक्रि . माप घ्यावयास लावणें . तोंडांत थप्पड , चपराक लगाविणें . तोंडावर जेव्हां दोन बेतविल्या तेव्हां कबूल झाला .
|