पु. ( गो . ) एक प्रकारचा आंबा .
बोलणें ; भाषणांतील अवयवभूत जे शब्द किंवा जीं वाक्यें तीं ; वाणी ; भाषण .
शब्द . पूर्वीचें भाषण ; बोलून दाखविलेलें मनोगत ; मत ; विचार ; वचन . केला म्यां सत्य बोलिला बोल । - मोआश्व २ . १३४ . परिसोनि बोल कानाहीं । - मोउद्योग १३ . २३३ .
दोष ; दोषारोप ; निंदा ; ठपका . भीष्म - धृतराष्ट्र - विदुर - द्रोण - कृप - नृपासि बोल तो लावी । - मोसभा ५ . ४५ .
वाद्यावर प्रहार करुन काढलेला विशिष्ट ध्वनि . उदा० तबल्याचे बोल . ( क्रि० काढणें ; वाजविणें ).
वर्णन . असोत हें बोल । चालतां जालें नवल । - शिशु ५५५ .
गार्हाणें . आर्ताबोलाची सांठवण । - ऋ ९६ . [ सं . ब्रू ; म . बोलणें ; दे . बोल = कलकल ]
म्ह० बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवोनिया तृप्त कोण झाला । ( खरें कांहीं न देतां फक्त तोंडाची कोरडी सहानुभूति दाखविल्यानें कोणाचें समाधान झालें आहे काय ! )
०करणें ( महानु ) बोलणें ; भाषण करणें . तंव तो लक्ष्मी कांतु । धाकुटियासी बोलू करितु । - शिशु १७५ .
०ठेवणें लावणें - दोष देणें , लावणें ; नांवें ठेवणें . लावियला म्यां दुःखीं बाई त्या ईश्वरासही बोल । - मोकृष्ण ८३ . ३६ .
०बोलणें आपलें म्हणणें काय आहें तें स्पष्टपणें सांगणें .
बोलांत बोल नसणें बोलण्यांत मेळ नसणें ; बोलण्यांत विसंगति असणें .
०लागणें दोष लागणें ; बट्टा लागणें ; काळिमा लागणें . तरि भरत कुळगुरुंच्या लागेना बोल काय गा महिम्या । - मोउद्योग ३ . ५० .
बोलाफुलास गांठ पडणें - फूल पडेल असें म्हणण्याला आणि फूल पडण्याला एकच गांठ पडणें .
- सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें
सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें .
बोलले बोल सिध्दीस नेणें - दिलेल्या वचनाप्रमाणें वागणें ; सामाशब्द -
बोलगडा , गाडा - वि . बोलका ; बडबड्या ; वाचाळ ; वारेमाप बोलणारा ; ( शब्दश : गाडीभर बोलणारा ). [ बोलणें + गाडा ]
घेवडा, ०घेवडी वि . वाचाळ ( मनुष्य अगर स्त्री ); वटवट करणारा - री ; फार बोलण्याचा स्वभाव असलेला .
०तान स्त्री. ज्या तानेमध्यें चीजेंतील अक्षरें विवक्षित स्वरानें म्हटलीं जातात ती तान .
०पुतळी माणकी - स्त्री . फार बोलणारी , डौलानें बोलणारी स्त्री .
०भाक पु. वचन ; शपथ ; करार .
०भांड वि. आवेशानें बोलण्याच्या व भांडणाच्या कामांत पटाईत .
यत्किंचित कारणावरुन भांडावयास सिद्ध होणारा .
०वरी क्रिवि . शब्दांनीं . ज्यासि परब्रह्म आलें हातां । तोचि जाणें सदगुरुची पूज्यता । इतरासि हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी । - एभा १३ . ७४६ .
०वा वाय - पुस्त्री . ( कों . ) लोकवार्ता ; वदंता ; चारचौघांत प्रसृत झालेली बातमी .
बोलका बोलिका - वि .
बोलणारा ; चांगलें बोलणारा .
फार बोलणारा ; वटवट करणारा ; वाचाळ ; बडबड्या ; भाट .
बोलूं शकणारा ; बोलतां येत असलेला ( पोपट , लहान मूल ).
वक्ता ; संभाषणांत भाग घेणारा ; घुम्यासारखा न बसणारा . [ बोलणें ]
०का चालका - वि . बोलण्यास व चालण्यास येऊं लागलेलें ( मूल ). [ बोलणें + चालणें ]
बोलबाला - पुक्रि . उत्कर्ष ; वैभव ; विजय ; भरभराट ; अभ्युदय ; चढती कमान ; कीर्ती . शत्रूवर बोलबाला । आले करुन शहर पुण्याला । - ऐपो २३७ . ( क्रि० होणें ). [ हिं . ]
बोलाचाली बोलाबोली बोलाचाल - स्त्री .
संभाषण ; बोलणें - चालणें .
वादविवाद ; भांडण ; बाचाबाची ; रागारागाचें भाषण .
बोलाचालीवर येणें - भांडूं लागणें ; चिरडीस जाऊन बोलणें .