Dictionaries | References

राखण

   
Script: Devanagari

राखण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बरे तरेन करतात अशी राखण   Ex. जे देशाची राखण करपा खातीर शिमेर तयार आसात त्या विरांचो हो देश उपकारी आसा
HYPONYMY:
भलायकी सेवा
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुरक्षा
Wordnet:
asmসুৰক্ষা
bdरैखाथि
gujસુરક્ષા
hinसुरक्षा
kanಸುರಕ್ಷಿತ
kasحفاظت
malസുരക്ഷ
marसंरक्षण
mniꯉꯥꯛ꯭ꯁꯦꯟꯕ
oriସୁରକ୍ଷା
panਸੁਰੱਖਿਆ
sanसंरक्षणम्
tamபாதுகாப்பு
telరక్షణ
urdحفاظت , نگرانی , سرپرستی
noun  आपत्ती, आक्रमण, लुकसाण, नाश, बी हांचे पसून वाटावपाची कृती.   Ex. वायट प्रसंगा वेळार ताणें म्हजी राखण केली.
HYPONYMY:
राखण आत्मराखण जीवनदान
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सांबाळ रक्षा
Wordnet:
asmৰক্ষা
benরক্ষা
gujરક્ષણ
hinरक्षा
kanಕಾಪಾಡುವುದು
kasرٲچھ
marरक्षण
mniꯉꯥꯛꯄꯤ ꯁꯦꯟꯕꯤꯕ
nepरक्षा
oriରକ୍ଷା
panਰੱਖਿਆ
urdحفاظت , بچاؤ , امان
noun  राखण करपाची कृती वा भावना   Ex. शेतकार शेताची राखण करता
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सांबाळ
Wordnet:
bdरैखाथि
benরক্ষণা বেক্ষণ
gujરખવાળી
hinरखवाली
kanನೋಡುವವ
kasحِفاظت , رٲچھ , رٲچھ راوَٹھ , دیکھ ریکھ
marराखण
nepरखवारी
oriଦେଖାରଖା
panਰਖਵਾਲੀ
telకాపలా
urdرکھوالی , حفاظت , نگرانی , دیکھ ریکھ , دیکھ بھال
noun  राखणदाराचें काम   Ex. राखण करता आसतना सतर्क रावूंक जाय
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रक्षा सुरक्षा
Wordnet:
asmপহৰাদাৰী
bdनेनाय
benপাহারাদারি
gujચોકીદારી
hinपहरेदारी
kasرٲچھ دٔری
malകാവല്‍
marराखणदारी
mniꯊꯣꯡꯉꯥꯛꯄꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
nepचौकीदारी
oriଚୌକିଦାରୀ
sanरक्षककर्म
tamகாவல்
telకాపలాకాయు
urdپہرےداری , چوکی داری , دربانی , نگہبانی
noun  आर्थीक लुकसाणी पसून वांचप वा आपल्या वेव्हाराची बी राखण   Ex. विमो संकश्टाच्या वेळार राखण दिता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संरक्षण
Wordnet:
kasبَچاو , حِفاظَت
mniꯆꯩꯉꯥꯛ
panਸਰੁੱਖਿਆ
urdتحفظ , بچاو

राखण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to a woman supposed, through her exceeding ugliness and hideousness, to be able to secure the house and its females from all magic and enchantment.

राखण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Preserving.
  A person set as a guard.
 f  A reserve.

राखण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव   Ex. शेतकरी शेताची राखण करत आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रक्षण संरक्षण रखवाली
Wordnet:
bdरैखाथि
benরক্ষণা বেক্ষণ
gujરખવાળી
hinरखवाली
kanನೋಡುವವ
kasحِفاظت , رٲچھ , رٲچھ راوَٹھ , دیکھ ریکھ
nepरखवारी
oriଦେଖାରଖା
panਰਖਵਾਲੀ
telకాపలా
urdرکھوالی , حفاظت , نگرانی , دیکھ ریکھ , دیکھ بھال

राखण     

स्त्रीन . ( कों . ) १ राखणें ; ठेवणें ; रक्षण करणें . २ रक्षक म्हणून ठेवलेला मनुष्य ; रखवाली . राखण वायसें राहवेना । - एभा १३ . ४७४ . ३ रक्षकाचें , रखवालदाराचें वेतन . ४ पिशाचादि उपद्रवापासून आपलें रक्षण व्हावें म्हणून ग्रामदेवतेस प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी अर्पण केलेला नारळ , बळी . ५ भुतें , उंदीर , टोळ इ० कांच्या उपद्रवापासून मनुष्यें , प्राणी , शेतें इ० कांना मंत्र , तंत्र , मानता इ० उपायांनीं मुक्त करून सुरक्षित ठेवण्याची क्रिया ; भूतादिकांचा बंदोबस्त करणें . ( क्रि० लावणें ; करणें ; लागणें ). ६ ( क्व . ) पूर्ण अभाव होऊं नये म्हणून घरांत राखून ठेवलेलें अल्प स्वल्प धान्यादि खाद्य पदार्थाचें परिमाण ; घर म्हणून ठेवलेला पदार्थ . सगळे दाणे खर्चूं नका , घरांत राखण म्हणून दोन पायली तरी राखून ठेवा . ७ ( माळवाप्रांत ) अतिशय कुरूपतेमुळें व अक्राळविक्राळपणामुळें घराचें व त्यांतील स्त्रियांचें चेटकापासून रक्षण करण्यास समर्थ म्हणून मानलेली स्त्री . - न . ब्राह्मणांत प्रसूतीनंतर तिसर्‍या दिवशीं , सुईण बाळतिणीच्या खोलींतील एक कोनाडा सारवून , रांगोळी काढून , त्यांत वर गंधाचीं बोटें ओढलेलें व आंत पैसा , सुपारी टाकलेलें जें मडकें ठेवते तें ; किंवा बाळंतिणीच्या दहा दिवसांत तिच्या जेवणाच्या वेळीं तिच्या खोलींत , निखारा व त्यावर थोडा भात टाकून ठेवलेलें मडकें . याच मडक्यांत प्रत्येक जेवणाच्या वेळीं असा निखारा व भात टाकतात . [ सं . रक्षण ] ( वाप्र . )
०लागणें   उपद्रव न होईल असा बंदोबस्त करणें . या खिस्तीचे एकदां रुपये भरले म्हणजे चार महिन्यांची राखण लागली . सामाशब्द -
०करी   दार राखणा राखणाईत राखणाइत राखणार - पु . १ रखवालदार ; पहारेकरी . २ गुराखी . जरी राखणाइत सहपरीवारी । - विउ ९ . ७६ . मालीकाचा मी तो राखणार । - दावि ४५९ . म्ह० - राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय ? राखणावळ - स्त्री . १ गुराख्याची मजुरी , वेतन . २ राखणें ; रक्षण करणें ; काळजी घेणें . [ राखणें ] राखणी - स्त्री . राखणें ; संभाळणें ; ठेवणें ; बाळगणें इ० [ राखणें ] राखणें - सक्रि . १ रक्षणें ; रक्षण करणें ; रखवाली करणें ; खबरदारी घेणें ; अपकारापासून वांचविण्याकरितां आपल्या ताब्यांत घेणें . काढूनि राखे प्राणु । - ज्ञा १६ . १४३ . २ ठेवणें ; उरविणें ; पुढच्या काळाकरितां किंवा कांहीं उद्देशाने ठेवून देणें . त्या रानांतील गवत यंदा राखलें आहे . ३ खर्चल्याशिवाय ठेवणें ( सामर्थ्य , जोर ). जोर - हात राखला . टोला - घाव - मार - राखला . ४ चोरून ठेवणें ; पोटांत किंवा मनांत ठेवणें . तुझ्या मनांत असेल तें सारें बोल . कांहीं राखूं नको . ५ एखाद्या पदार्थावर ओघानें एखादी क्रिया करणें प्राप्त झालें असतां ती न करितां , तो पदार्थ तसाच ठेवणें ; आहे त्या स्थितींत राहूं देणें . कोनाडयाची जागा तेवढी राख आणि अवघी भिंत सारीव . ६ करणें ; ठेवणें ; एखादा पदार्थ स्थित्यंतर न पावूं देतां ठेवणें ; बनविणें व कायम करणें . ही भिंत फार रूंद राखली म्हणून शोभत नाहीं . ७ स्त्रीनें पुरुषास किंवा पुरुषानें स्त्रीस उपभोगार्थ बाळगणें , ठेवणें . ८ ठेवणें ; धरणें ; पाळणें ; हेळसांड , अवज्ञा न करणें ; एका बाजूस पडूं न देणें . ९ व्यवस्थित , योग्य स्थितींत ठेवणें . १० पालन करणें ; न ढळणें ( वचन ; आज्ञा ; प्रतिज्ञा ). [ सं . रक्षण ; रक्ष् ‍ ; प्रा . रक्ख ; पं . रक्खण ; सिं . रखणु ; हि . रखना , राखना ; गुज . राखवुं ; बं . राखिवा ; फ्रेजि . रख ; पोर्तुजि . अरखना = रक्षक ] म्ह० राखील त्याचें घर , खणेल त्याचें शेत . राखणेकरी - पु . राखणदार ; राखणकरी पहा . राखण्या - पु . ( राजा . ) गुरें राखणारा ; गुराखी . राखले - स्त्री . हुंडी विकत घेणाराची स्थिति , पेशा , अधिकार , पत दर्शक योजावयाचा शब्द . त्या हुंडीमध्यें माझी राखले घातली होती . [ राखणें ( गुजराथींतून आलेला शब्द ) ] राखवळ - स्त्री . ( प्र . ) राखणावळ ; राखण्याबद्दल मजूरी , वेतन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP