Dictionaries | References

लुडबुड

   
Script: Devanagari

लुडबुड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
luḍabuḍa f Officious and vexatious intermeddling; disturbing and bothering interference with the view to assist.

लुडबुड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Officious and vexatious intermeddling.

लुडबुड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ढवळाढवळ

लुडबुड     

 स्त्री. 
दुसर्‍याने बोलाविले नसतां त्याच्या कामांत पडणे ; दुसर्‍याला मदत करण्याकरितां त्याच्या केलेली ढवळाढवळ ; चाललेल्या कामांत उगाच केलेली गडबड .
एखाद्याला मूल इ० नी केलेली किरकोळ मदत . लुडबुडणे - अक्रि .
दुसर्‍याला त्याच्या कामांत मदत करुं लागणे ; गडबड करणे ; लुडबुड करणे ; ढवळाढवळ करणे ; ज्या योगे दुसर्‍याला कामांत अडथळा होईल अशी मदत करणे ; विनाकारण दुसर्‍याच्या कामांत गढून जाणे .
इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असे हेलपाटे घालणे किंवा खाणे . द्राविडो लुडबुडाम्यहम । लुडबुडत पडणे - एखाद्याच्या मार्गात पडणे ; दुसर्‍याला अडथळा उत्पन्न होईल अशा रीतीने निष्कारण त्याच्या कामांत असणे किंवा मदत करणे ; लुडबुड्या - वि .
दुसर्‍याने बोलाविले नसतांना त्याला मदत करुन त्रास देणारा ; लुडबुड करणारा ; लुडबुडणारा ; पुढे पुढे करणारा ; उपदेश किंवा मदत करण्याच्या ऐटीने विनाकारण चुकीच्या मार्गाने कामांत पडणारा .
ढवळाढवळ करणारा ; लुडबुड करणारा . शौर्ये निर्दय , आर्जवे लुडबुड्या की दीन सद्भाषणी । - वामन , स्फुटश्लोक १६ ( नवनीत पृ . १३५ ). म्ह० लांडे लुडबुडे आणि नाचे पुढपुढे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP