|
पु. वेळू पहा . पुस्त्री . १ कालविभाग ; काळ . २ आतांचा काळ व कांहीं कार्य होण्याचा काळ यांमधील अवकाश , अंतर . पेरे होण्यास अझून वेळ आहे म्हणून अधीं घरें शाकारून घ्या . ३ फुरसत ; न गुंतलेला , रिकामा वेळ . माझे पाठीसी काम आहे वेळ सापडल्यास येईन . ४ अपेक्षित किंवा योग्य कालापेक्षां जास्त काळ ; उशीर ( क्रि० लावणें , लागणें ). मला शाळेत जाण्यास वेळ झाला . वेळ लावला - ली , वेळ लागला - ली . ५ ( स्त्री . ) उशीर झाला . समय ; हंगाम ; विशिष्ट काल . ही पोथी वाचावयाची नव्हे . ६ दिवसाचा अर्ध भाग ; सकाळ किंवा दुपार . ७ तीस घटिकांच्या ( रात्री किंवा दिवसां ) आठ विभागापैकी एक . अमृत , उद्योग , काळ ( मृत्यु ), चंचळ ( चोर ), रोग , लाभ , शुभ आणि स्थिर वेळ . यांखेरीज इतर पुष्कळ प्रकारच्या वेळा आहेत , उदा० अंधेरी - घोर - घात - राक्षस - वेळ , जाती - येती वेळ इ० . ८ मुहुर्त . ९ प्रसंग ; संधी . - क्रिवि . वेळा पहा . तो दिवसास तीन वेळा जेवतो . [ सं . वेला ] स्त्री. एक वनस्पति . स्त्री. समुद्रकिनारा . वेल पहा . स्त्री. वळी ( गंधादिकाची ) ? ज्याच्या कपाळाची वेळ । सुर सकळ वांछिती । - भारा बाल ६ . ५६ . [ वळी ] न. ( गो . ) जीभ खरवडण्याची ( सोनें - चांदीची ) पट्टी . स्त्री. दंडांत घालावयाचा एक अलंकार . दंडी वेळा वांकडया गुजर्याचा झणत्कार । - अफला ५५ . [ सं . वलय ; म . बाळा ] ०दवडणे व्यर्थ , निष्फळ वेळ घालविणें . ०अंवस स्त्री. पंढरपूर येथील कार्तिकी किंवा मार्गशीषी आवस . यादिवशीं वेणूनाद कृष्णाप्रीत्यर्थ नदीतील खडकावर लोक जेवतात . ०कट कटू - न कळकाचा तुकडा . [ वेळू + काष्ट ] ०मारून प्रसंगी कमीपणा येऊं न देणें ; युक्तीने प्रसंग साजरा करणें ; बाणी राखणें . केवळ शब्दमात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे . - निचं . नेणें प्रसंगी कमीपणा येऊं न देणें ; युक्तीने प्रसंग साजरा करणें ; बाणी राखणें . केवळ शब्दमात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे . - निचं . ०काठी स्त्री. कळक ; बांबूचा वासा . ०वन न. वेळूचें वन . यदुवंशाची वेळवनें । वनवावी असती । भाए ५३ . वेळवी - वि . वेळूसंबंधी . वेळवी वासा . वेळाचे वेल वाचे न वदवति जसे तें तसें वेळवांचे । - २ ( गजेंद्रमोक्ष ) ५४ . ०वाहणे बरें किंवा वाईट होण्यास अनुकूल होणें . सामाशब्द - ०अवेळ स्त्री. उचित किंवा अनुचित , अनुकूल किंवा प्रतिकूल असा काळ प्रसंग ( विवक्षित कामाविषयीचा ). वेळ अवेळ आहे चार रुपये जवळ अधिक अंसू द्या . - क्रिवि . वेळ किंवा अवेळ न पाहतां ; वाटेल त्यावेळी . वेळ अवेळ बाहेर जातोस परंतु एथे पिशाचांचा उपद्रव भारी आहे . ०काळ पु. काळ - वेळ पहा . ( क्रि० येणे ; जाणे ; गुदरणे ; पडणें ; टळणें ). वेळाकाळाला कामास येणें - प्रसंगविशेषी , अडीअडचणीला उपयोगी पडणें . वेळणेवारचा , वेळणेवारी - विक्रिवि . वेळेप्रमाणे ; वेळेनुसार ; वेळेच्या चांगल्यावाईट गुणांप्रमाणें व भाषा किंवा कृति याच्या प्रकारानुसार घडणारी ( गोष्ट इ० ) अनिष्ट परिणामाच्या , कृतीच्या , वचनाच्या प्रसंगी योजतात . वेळणेवारचा उगाच तूं बोलतोस काय म्हणून . [ वेळ आणि वार ] ०अनसार नसार - ( वेळनसार ) - वेळेनुसार पहा . ०नावारीं क्रि . बरीवाईट वेळ न पाहतां . वेळअवेळ पहा . म्ह० वेळ ना वारी गाढव आले पारीं . [ वेळ + ना + वार ] ०प्रसंग पु. काळकल्ला , बळकुबल , वेळअवेळ पहा . ०भर क्रिवि . १ सारा दिवस ; वरचेवर . वेळ भर करसी वेरझारा धाक याचा वाटे मजप्रती । - होला ९८ . २ अर्धा दिवस पर्यंत . ३ बर्याच वेळपर्यंत . ०मारणारा मार्या - वि . समयसूचक ; प्रसंगावधानी . ०वारीं क्रिवि . वेळेवारी पहा . ०साधणारा साधु - वि . १ संधी साधून काम करणारा . २ वक्तशीर . वेळा - स्त्री . १ हंगाम ; समय ; विशिष्ट काळ . २ आवृत्तिवाचक गणनाकाळ . वेळां - क्रिवि . संख्यावाचक किंवा गुणवाचक उपसर्ग लावून आवृत्ति दाखविण्यासाठी योजतात . उदा० एक - तीन - बहुत - किती - वेळां . एक वेळां सोसीन , दोन वेळां सोसीन , तिसर्यानें बोलशील तर तोंडांत खाशील . वेळाईत - वि . वेळेवर , संकटप्रसंगी सहाय्य करणारा , मदतीस धावणारा ; कैवारी . - विउ ११ . २८ . तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चित त्याचि याने । - तुगा २२७५ . [ वेळा + आगत ? तुल० सिं . वेलाइतो = वेळेवर ] वेळापत्रक - न . आगगाडया , आगबोटी , शाळा इ० च्या कार्याचा वेला दाखविणारा तक्ता . ( इं . ) टाईम - टेबल . वेळाप्रकाशक - पु . ( गणित ) पट दाखविणारी संख्या ; वार संख्याक ; गुणक . वेळायित - वेळाईत पहा . धावला राघव वेळायितु । - दावि १४३ . वेळावणे - अक्रि . आबाळणें ; वेळेवर गरजेच्या गोष्टी न मिळल्यानें खंगणें ( पीक , जनावर , मूल , इ० ) वेळावेळ - स्त्री . १ वेळअवेळ पहा . २ ( क ) विलंब ; उशीर . तो अलिकडे वेळावेळानें येऊं लागलां आहे . [ वेळ + अवेळ ] वेळेनसार वेळेनुसार - क्रिवि . १ वेळ , प्रसंग याला अनुसरून . २ वेळप्रसंगी ; कधीकधी . वेळेवारचा - वि . वेळेवर असलेला . कधी वेरेवाळचा असा अशुध्द प्रयोग येतो . वेळेवारी - क्रिवि . योग्य वेळी ; वेळ टळण्याच्या आधी ; वेळेचा अतिक्रम न होतां . तुला चाकरी सोडणें असल्यास वेळेवरिच सांग , नाहीतर आयते वेळेस फसवशील . वेळोवेळां - क्रिवि . १ वरचेवर ; वारंवार . २ वेळ येईल त्याप्रसंगी प्रत्येक वेळी ; [ वेळ व्दि . ]
|