|
स्त्री. ( प्र . ) १ आरोळी ; मोठयानें मारलेली हाक . २ आक्रोश ; दुःखानें फोडलेला हंबरडा , किंकाळी ; बोंब . ( क्रि० फोडणें ; मारणें ). ३ ( नाटय ) राक्षसपात्राची आरडाओरड . [ आरोळी ] स्त्री. एक गवत ; दूर्वा . [ सं . हरिताली ; प्रा . हरिआली ; हिं . हरियल ] ०ची स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर . मुळी स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर .
|