|
पुन . १ डोळयांस त्रिफाळ पाणी सुटण्याचा व खुपण्याचा एक रोग . २ डोळयाचा एक विकार ; खुपर्या . ( क्रि० येणें . ). पु. लहान दगड ; बारीक खडे ; कण ; गार ; केर ; धूलीकण . आणि घासाआंतील हरळु । फेडितां लागे वेळू । - ज्ञा १३ . ३३६ . - स्त्री . वाळू . सिकता हरळ शिजवितां । मवाळ नव्हे कल्पांती । [ का . हग्ळु ] वि. सैल ; विरळ ; फटी , भेगा असलेला . अरळ पहा . हरळणें - अक्रि . फट ठेवणें , पाडणें ; दूर , विरळ असणें ( दांत , झाडें इ० ). दांत कस्करे आणि हरळे । - दा ३ . ७ . २३ . स्त्री. एक गवत ; दूर्वा . [ सं . हरिताली ; प्रा . हरिआली ; हिं . हरियल ] पु. १ ( वांगी , मिरच्या इ० काचें ) रोप लावण्यासाठीं जमीनींत खोदलेली लांबट खळी ; खांच , चर . २ पाणी नेण्याचा पाट ; कालवा . हरल पहा . ३ पाणी वाहण्यानें पडलेला ओघळ ; चर . स्त्री. खाष्ट सेवा ; त्रासदायक काम , नोकरी ; दगदग ; त्रास . ( क्रि० लागणें ) काय हो ह्या पोराची हरळ लागली . ०ची स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर . मुळी स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर .
|