Dictionaries | References

७२

   { बाहात्तर }
Script: Devanagari

७२     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बहत्तर, बहत्तर

७२     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बहात्तर, बहात्तर

७२     

Sanket Kosh | Marathi  Marathi
बाहात्तर कोठडया (देहांतील)   
४ आधारचक्रीं, ६ स्वाधिष्ठानीं, १० मणिपुरी, १२ अनुहाती, १६ कंठीं म्हणजे विशुद्धचक्र, २ अग्निचक्रीं, २१ पश्चिममार्गी आणि १ ऊर्ध्व. (पंचीकरण).
बाहात्तर दिवस रामा - रावण युद्ध   
माघशुद्ध २ पासून चैत्र कृष्ण चतुर्दशी पर्यंत ८७ दिवसांत युद्ध फक्त १५ दिवस बंद होतें म्हणून हें युद्ध एकंदर ७२ दिवस झालें. ([गूढार्थ चंद्रिका])
बहात्तर यक्षप्रश्रः   
पांडव वनवासांत द्वैतवनांत असतांना तृषाहरणासाठीं एका सरोवराकडे गेल्यावेळीं तेथील जलप्राशन करणार इतक्यांत अंतरिक्षांतून यक्षवाणी झाली कीं, माझ्या प्रश्नांचें उत्तर देईल, त्यानेंच हें जल प्राशन करावें असा माझा नियम आहे. परंतु क्रमानें नकुल, सहदेव, अर्जन व भीम या चौघांनींहि यक्षप्रश्नाचें उत्तर न देतां जलप्राशन केल्यामुळें ते गतप्राण होऊन पडले. शेवटीं युधिष्ठिरानें त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांचीं समर्पक उत्तरें दिल्यावर ते चौघेहि धर्माचे भ्राते जिवंत झाले. हा भाग महाभारतांत आरण्यक पर्वांत आला आहे. यक्ष व युधिष्ठिर यांच्यामधील ही प्रश्नोत्तरमालिका आत्मतत्त्वाचा निर्णय करण्यासाठीं आरंमिली आहे. प्रश्न व उत्तरें खालील प्रमाणें :-
१ सूर्याला कोण उदित करतो ?- ब्रह्मापासून सूर्याचा उदय होतो.
२ त्याचे साहाय्यकर्ते कोण ?- देव हे त्याचे साहाय्यकर्तं.
३ त्याला अस्तास कोण नेतो ?- धर्म.
४ तो कशाच्या आधारानें असतो ?- सत्याच्या आधारानें.
५ पुरुष कशानें श्रोत्रिय होतो ?- वेदाध्ययन केल्यानें.
६ त्याला ब्रह्मप्राप्ति कशानें होतें ?- तपानें.
७ तो साहाय्यवान् कशानें होतो ?- धैर्याच्या योगानें.
८ तो बुद्धिमान् कशानें होतो ?- वृद्ध आचार्यांच्या सेवेनें.
९ ब्राह्मणांचें देवत्व कोणतें ?- स्वाध्याय.
१० त्यांचें सदाचरण कोणतें ?- तपश्चर्या.
११ त्यांच मानवी भाव कोणता ?- मरण.
१२ त्यांचें असदाचरण कोणतें ?- परनिंदा.
१३ क्षत्रियांचें देवत्व कोणतें ?- धनुर्विद्या.
१४ त्यांचा परंपरागत धर्म कोणता ?- यज्ञ करणें.
१५ त्यांचा मानवी भावा कोणता ?- युद्धांत भय व पलायन.
१६ त्यांचा असदाचरण कोणतें ?- शरणगताचें रक्षण न करणें.
१७ यज्ञासंबंधीं साम कोणतें ?- प्राण.
१८ तत्संबंधीं मुख्य यजुर्मंत्र कोणता ?- मन.
१९ यज्ञाला आधारभूत असें एक काय आहे ?- ऋग्वेद.
२० कशाशिवाय यज्ञाचें अस्तित्व असूं शकत नाहीं ?- ऋग्वेदाशिवाय.
२१ सर्व प्रकारें तृप्ति करणारांमध्यें श्रेष्ठ कोण ?- पर्जन्य.
२२ पितरांचें संतर्पण करणारांत उत्तम कोण ?- बीज.
२३ इहलोकीं स्वस्थतेची इच्छा करणारांना साधन काय ?- गाय.
२४ संततीची इच्छा कराणारांना श्रेष्ठ काय ?- पुत्र.
२५ कोणता पुरुष जिवंत असून मृतवत् ?- देवता, अतिथि, सेवक, पितर आणि आत्मा या पांचांना जो कांहींच अपर्ण करीत नाहीं तो.
२६ पृथ्वीपेक्षां श्रेष्ठ काय ?- माता.
२७ आकाशापेक्षां उंच काय ?- पिता.
२८ बाय़ूपेक्षां चंचल काय ?- मन.
२९ मनुष्याला सर्वांत वाढत जाणारी गोष्ट कोणती ?- चिंता.
३० निद्रेंतहि डोळे मिटत नाहींत असा कोण ?- मत्स्य.
३१ उत्पन्न झालें असतां हालचाल नसतें असें काय ?- अंडें.
३२ कोणाला ह्रदय नाहीं ?- दगडाला.
३३ वेगानें वाढतें कोण ?- नदी.
३४ प्रवाशाला मित्र कोण ?- समुदायानें असणें.
३५ सज्जनाला घरीं मित्र कोण ?- भार्या.
३६ रोग्याला मित्र कोण ?- औषध.
३७ आसन्नमरण झालेल्यास मित्र कोण ?- दान.
३८ एकाकी मार्ग क्रमनारा कोन ?- सूर्य.
३९ पुनः पुनः जन्म घेणारा कोण ?- चंद्र.
४० शीताला औषध कोणतें ?- अग्नि.
४१ सर्वांत मोठें उत्पत्तिस्थान कोणतें ?- भूमि.
४२ धर्माच्या पर्यवसानाचें मुख्या स्थान कोणतें ?- दक्षता.
४३ यशःप्राप्तीचें मुख साधन कोणतें ?- दान.
४४ स्वर्गप्राप्तीचें मुख्य साधन काय ?- सत्य.
४५ सुखाचें मुख्य निधान कोणतें ?- शील.
४६ मनुष्याचा आत्मा कोण ?- पुत्र.
४७ त्याचा दैवानें दिलेला मित्र कोणता ?- भार्या.
४८ त्याचें जीवन कोणतें ?- पर्जन्य.
४९ त्याला मुख्य आधार काय आहे ?- दान.
५० द्र्व्यप्राप्तीच्या साधनांत उत्तम साधन कोणतें ?- दक्षता.
५१ उत्तम धन कोणतें ?- विद्याधन.
५२ उत्तम लाभ कोणता ?- आरोग्य.
५३ श्रेष्ठ सुख कोणतें ?- समाधान.
५४ इह लोकीं श्रेष्ठ धर्म कोणता ?- आश्रितांचें रक्षण.
५७ अक्षय्य फलद्रूप होणारा धर्म कोणता ?- वैदिक धर्म.
५७ कशाचें नियमन केलें आसतां दुःख करण्याची पाळी येत नाहीं ?- मनःसंयमन.
५८ कोणाची संगति केली असतां वाया जात नाहीं ?- सज्जनांची संगति.
५९ कशाच्या त्यागानें मनुष्य प्रिय होतो ?- वृथा मान.
६० शोक कराण्याचा प्रसंग काय टाळल्यानें येत नाहीं ?- क्रोध.
६१ कोणत्या त्यागानें मनुष्य संपत्तिमान होतो ?- आशा.
६२ कशाचा त्याग केल्यातें तो मुखी होतो ?- लोभ.
६३ मृत पुरुष कोणता ?- दरिद्री.
६४ राष्ट्र मृत कशानें होतें ?- अराजकानें.
६५ मृत श्राद्व कोणतें ?- अधीत्त ब्राह्मणाभावीं.
६६ मृत यज्ञ कोणता ?- दक्षिणारहित.
६७ कोठून आलेलें पाणी श्रेष्ठ ?- आकाशापासून.
६८ अन्न कोणतें ?- गोदुग्ध.
६९ विष कोणतें ?- याचना.
७० श्राद्धाला योग्य काल कोणता ?- खाध्यायतत्पर ब्राह्मणाची अनुकुलता.
७१ सर्व संपत्तिमान् असा पुरुष कोणता ?- ज्याची कीर्ति दिगंत गाजत आहे असा, प्रिय व अप्रिय, सुख व दुःख तसेंच येऊन गेलेलें व भावी सुख - दुख हीं समान लेखणारा पुरुष. सर्व संपत्तीनें युक्त होय.
([म. भा. संशोधित आवृत्ति आरण्यकपर्व भाग २ अ. २९७])
बाहात्तर रोग   
बहात्तर रोगांवर एकच औषध अशी म्हण आहे. तिचा इत्यर्थ इतकाच कीं मानव शरीरांतील रोगपरिगणन प्राचीनांनीं बहारत्तर मानिलें आहे. शास्त्रीय शोधामुळें पोटमेद अनेक वाढले असले तरी प्रधान रोग बहात्तरच आहेत. ते असें :-
१ अजीर्ण, २ अग्निमांद्य, ३ अतिसार, ४ अपस्मार, ५ अर्बुद (आवाळु) ६ अमांश, ७ अरुचि, ८ आनाह, (मलबद्धतारोग) ९ अंडवृद्धि, १० आमवात, ११ आम्लपित्त, १२ उचकी, १३ उदररोग, १४ उदावर्त्त, १५ उन्माद, १६ उपदंश, १७ ऊरुस्तंभ, १८ कर्णरोग, १९ कफरोग. २० कावीळ, २१ कास (खोकला), २२ कुष्ठ, २३ कृमिरोग, २४ गलगंड, २५ गुल्म, २६ गंडमाळा, २७ तृपा, २८ दाहरोग, २९ द्दष्टिरोग, ३० नासारोग, ३१ नेत्ररोग, ३२ पांडुरोग, ३३ पित्तरोग, ३४ प्रमेह, ३५ बालरोग, ३६ भगेंद्र, ३७ मस्तकरोग, ३८ मुखरोग, ३९ मूर्च्छा, ४० मूत्ररोग, ४१ मूळव्याध, ४२ मूढगर्म, ४३ मेदोरोग, ४४ रक्तपित्त, ४५ रक्तदोष, ४६ रक्तवृद्धि, ४७ राजयक्षमा, ४८ योनिकंद, ४९ वातरक्ता, ५० वातरोग, ५१ वांति, ५२ विद्रधि, ५३ विषचिकित्सा, ५४ विषूचिका, ५५ विसर्प, ५६ विस्फोट, ५७ व्रणरोग, ५८ शूकरोग, ५९ शूळ, ६० श्वास व दमा, ६१ श्लीपद, ६२ सूज, (शोथ) ६३ संग्रहणी, ६४ स्मृतिनाश, ६५ स्वरभेद, ६६ स्त्रीरोग, ६७ शीतपित्त, ६८ सूतिकारोग, ६९ स्वतरोग, ७० स्तन्यदुष्टी, ७१ ह्रदोग आणि ७२ क्षयरोग. ([माधव निदान])
बहात्तर रोगावर एकच औषध असा एक जुना संकेत रूढ आहे.
बाहात्तर कला   
१ गीतकला, २ वाद्यकला, ३ नृत्यकला, ४ गणितकला, ५ पठितकला, ६ लिखितकला, ७ वक्तृत्त्वकला, ८ कवित्वकला, ९ कथाकला, १० वचनकला, ११ नाटककला, १२ व्याकरणकला, १३ छंदःकला, १४ अलंकारकला, १५ दर्शनकला, १६ अभिघानकला, १७ धातुवादकला, १८ धर्मकला, १९ अर्थकला, २० कामकला, २१ बादकला, २२ बुद्धिकला, २३ शौचकला, २४ विचारकला २५ नेपथ्यकला, २६ विलासकला, २७ नीतिकला, २८ शकुनकला, २९ क्रीतकला, ३० वितकला, ३१ संयोगकला, ३२ ह्स्तलाघवकला, ३३ सूत्रकला, ३४ कुसुमकला, ३५ इंद्रजालकला. ३६ सूचिकर्मकला, ३७ स्नेहकला, ३८ पानककला, ३९ आहारककला, ४० सौमाग्य़कला. ४१ प्रयोगकला, ४२ मंत्रकला, ४३ वास्तुकला, ४४ वाणिज्यकला, ४५ रत्नकला, ४६ पात्रकला, ४७ वैद्यकला, ४८ देशकला, ४९ देशभाषितकला, ५० विजयकला, ५१ आयुधकला, ५२ युद्धकला, ५३ समयकला, ५४ वर्तनकला, ५५ हस्तिकला, ५६ तुरगकला, ५७ नारीकला, ५८ पक्षिकला, ५९ भूमिकला, ६० लेपकला, ६१ काष्टकला, ६२ पुरुषकला, ६३ सौन्यकला, ६४ वृक्षकला, ६५ छद्मकला, ६६ हस्तकला, ६७ उत्तरकला, ६८ प्रत्त्युत्तरकला, ६९ शरीरकला, ७० सत्त्व - कला. ७१ शास्त्रकला व ७२ लक्षणकला ([वस्तुरत्नकोश])

७२     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : बहत्तर

Related Words

७२   72   lxxii   seventy-two   गोवर्धनी गाय   आवले   लागा   झुबी   सिरचोट   धड कांठयांवर घालून दैवास रडणें   वताळणे   आज्याबा   गठ्ठ्यांचा खेळ   कामार   कारचोबी   बाहत्तर   लुगाई   रायेण   बमुख्वत   नफी   चुलीवर चढलेलें   तबरुंगु   ढोरडॉक्टर   येखादा   वीभिचारु   आबई   ईडेपाडें   उठी   खडखड्या   घृताशिन्   घोडाआढी   अखटा   आळुकेपण   उक्षी   घडियाल   चंचकरणें   चंचणें   चंचरणें   हरिधामन्   त्रैपुरि   चतुष्टस्ट   चलराशि   चिकसा   तये   शहत   शहीत   ल्हातणे   अहाड   अहाडु   अनुहत गजर   अनुहत चक्र   अनुहत ध्वनि   अनुहात   कांबली   उभाउभी   उगीचचेउगीच   उगीचेउगीच   उणाक   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   चित्रगंधा   चित्रध्वज   तडावणे   काकड   दफन   आवतण   आवतणें   अनंग   आगींतून निघाला, फुफाटयांत पडला   आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला   आगींतून निघून फोफाटयांत पडणें   खराबी   खर्डा   उंचवळा   उग्रतप   उणाख   घडसी   वाटिव   वाटीव   झांवळ   लुबरा   लुब्रा   फुफाटयांतून आगींत पडणें   फोफाटयांतून आगींत पडणें   धावय   चचणें   चतुष्ट   तळण   डोळ्यांत तेल घालून   अनुहत   दूड   तोरा   आटोपणें   अनुवादणें   कासर   उंचवटा   उगाच   अवचट   घडशी   वोपणें   बहात्तर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP