ॐ अस्य श्रीसप्तशतीरहस्यत्रयस्य नरायणा ऋषि:अनुष्टुप्छन्दः ,
महाकालीमहालक्ष्मीमहासरस्वत्यो देवता यथोक्तफलावाप्त्यर्थं
जपे विनियोगः ।
राजोवाच
भगवन्नवतारा मे चण्डिकायास्त्वयोदिताः ।
एतेषां प्रकृतिम ब्रह्मन् प्रधानं वक्तुमर्हसि ॥ १ ॥
आराध्यं यन्मया देव्याः स्वरुपं येन च द्विज ।
विधिना ब्रूहि सकलं यथावत्प्रणतस्य मे ॥ २ ॥
ऋषिरुवाच
इदं रहस्यं परममनाख्येयं प्रचक्षते ।
भक्तोऽसीति न मे किञ्चित्तवावाच्यं नराधिप ॥ ३ ॥
सर्वस्याद्या महालक्ष्मीस्त्रिगुणा परमेश्र्वरी ।
लक्ष्यालक्ष्यस्वरुपा सा व्याप्त कृत्स्नं व्यवस्थिता ॥ ४ ॥
माअतुलुङ्ग गदां खेटं पानपात्रं च बिभ्रती ।
नागं लिङ्गं च योनिं च बिभ्रती नृप मूर्धनि ॥ ५ ॥
तप्तकाञ्चनवर्णाभा तप्तकाञ्चनभूषणा ।
शून्यं तदखिलं स्वेन पूरयामास तेजसा ॥ ६ ॥
शून्यं तदखिलं लोकं विलोक्य परमेश्र्वरी ।
बभार परमं रुपं तमसा केवलेन हि ॥ ७ ॥
सा भिन्नाञ्जनसंकाशा दंष्ट्राङ्कतवरानना ।
विशाललोचना नारी बभूव तनुमध्यमा ॥ ८ ॥
खङ्गपात्राशिरःखेटैरलंकृतचतुर्भुजा
कबन्ध्हारं शिरसा बिभ्राणा हि शिरःस्त्रजम् ॥ ९ ॥
सा प्रोवाच महालक्ष्मीं तामसी प्रम्दोत्तमा ।
नाम कर्म च मे मातर्देहि तुभ्यं नमो नमः ॥ १० ॥
तां प्रोवाच महालक्ष्मीस्तामसीं प्रमदोत्तमाम् ।
ददामि तव नामानि यानि कर्माणि तानि ते ॥ ११ ॥
महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा ।
निद्रा तृष्णा चैकवीरा कालरात्रिर्दुरत्यया ॥ १२ ॥
इमानि तव नामानि प्रतिपाद्यानि कर्मभिः ।
एभिः कर्माणि ते ज्ञात्वा योऽधीते सोऽश्र्नुते सुखम् ॥ १३ ॥
अक्षमालाङ्कुशधरा वीणापुस्तकधारिणी ।
सा बभूव वरा नारी नामान्यस्यै च सा ददौ ॥ १५ ॥
तामित्युक्त्व महालक्ष्मीः स्वरुपमपरं नृप ।
सत्त्वाख्येनातिशुद्धेन गुणेनेन्दुप्रभं दधौ ॥ १४ ॥
अक्षमालाङ्कुशधरा वीणापुस्तकधारिणी ।
सा बभूव वरा नारी नामान्यस्यै च सा ददौ ॥ १५ ॥
महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती ।
आर्या ब्राम्ही कामधेनुर्वेदगर्भा च धीश्र्वरी ॥ १६ ॥
अथोवाच महालक्ष्मीर्महाकालीं सरस्वतीम् ।
युवां जनयतां देव्यौ मिथुने स्वानुरुपतः ॥ १७ ॥
इत्युक्त्वा ते महालक्ष्मीः ससर्ज मिथुनं स्वयम् ।
हिरण्यगर्भो रुचिरौ स्त्रीपुंसौ कमलासनौ ॥ १८ ॥
ब्रह्मन् विधे विरित्र्चेति धातरित्याह तं नरम्।
श्री: पद्मे कमले लक्ष्मीत्याह माता च तां स्त्रियम्॥१९॥
महाकाली भारती च मिथुने सृजतः सह ।
एतयोरपि रुपाणि नामानि च वदामि ते ॥ २० ॥
नीलकण्ठं रक्तबाहुं श्वेताड्गं चन्द्रशेखरम्।
जनयामास पुरुषं महाकाली सितां स्त्रियम् ॥ २१ ॥
स रुद्रः शंकरः स्थाणुः कपर्दी च त्रिलोचनः ।
त्रयी विद्या क्स्स्मधेनुः सा स्त्री भाषाक्षरा स्वरा ॥ २२ ॥
सरस्वती स्त्रियं गौरीं कृष्णं च पुरुषं नृप ।
जनयामास नामानि तयोरपि वदामि ते ॥ २३ ॥
विष्णुः कृष्णो हृषीकेशो वासुदेवो जनार्दनः ।
उमा गौरी सतीचण्डी सुन्दरी सुभगा शिवा ॥ २४ ॥
एवं युवतयः सद्यः पुरुषत्वं प्रपेदिरे ।
चक्षुष्मन्तो नु पश्यन्ति नेतरेऽतद्विदो जनाः ॥ २५ ॥
ब्रह्मणे प्रददौ पत्नीं महालक्ष्मीनृप त्रयीम् ।
रुद्राय गौरीं वरदां वासुदेवाय च श्रियम् ॥ २६ ॥
स्वरया सह सम्भूय विरिञ्चोऽण्डमजीजनत् ।
बिभेद भगवान् रुद्रस्तद् गौर्या सह वीर्यवान् ॥ २७ ॥
अण्डमध्ये प्रधानादि कार्यजातमभून्नृप ।
महाभूतात्मकं सर्वं जगतस्थावरजड्ग्मम् ॥ २८ ॥
पुपोष पालयामास तल्लक्ष्म्या सह केशवः ।
संजहार जगत्सर्वं सह गौर्या महेश्वरः ॥ २९ ॥
महालक्ष्मीर्महाराज सर्वसत्त्वमयीश्र्वरी ।
निराकारा च साकारा सैव नानाभिधानभृत् ॥ ३० ॥
नामान्तरैर्निरुप्यैषा नाम्ना नान्येन केनचित् ॥ ॐ ॥ ३१ ॥
इति प्राधानिकं रहस्यं सम्पूर्णम् ।
राजा म्हणाला, "हे मुनिराज, आपण चंडिकेच्या अवतारांची कथा मला सांगितली , आता या अवतारंच्या प्रवृत्तीचे यथासांग वर्णन करून मला सांगावे ॥ १ ॥
हे द्विजवरा ! भगवन् ,ज्या देवीची अनेक रूपे आहेत,त्या त्या अनेक स्वरुपांची पूजा -आराधना ही
वेगवेगळ्या प्रकारे करावी लागत असेल तर ती कोणती हे मला सविस्तरपूर्वक सांगावे अशी माझीआपणास नम्र प्रार्थना आहे." ॥ २ ॥
ऋषी म्हणाले, "वास्तविक निरनिराळ्या स्वरुपांनी देवीची आराधना कोण्त्या प्रकारे करावी ही गुप्त बाब सांगू नये असे संकेत आहेत;परन्तु हे नरश्रेष्ठ राजा ! तू माझा भक्त आहेस, त्यामुळे तुला सांगू नये असे काही मी मजजवळ ठेवावे हे योग्य नसल्यामुळे ही माहिती मी तुला सांगतो. ॥ ३ ॥
त्रिगुण्मयी परमेश्वरी महालक्ष्मी आदिम आहे. ती या विश्वात, त्रैलोक्यात सनातन आहे. तीच दृश्य आणिअदृश्य रुपाने या विश्वाला व्यापुन उरलेली असल्याने तिचीच सर्व ठायी अधिसत्ता आहे. ॥ ४ ॥।
हे राजा ! त्या अदिम मायेने आपल्या हाती मातुलिंग (रसरशीत लिंबू) गदा, ढाल व हाती सुरापात्र घेतलेलेआहे. तिच्या मस्तकावर नाग, लिंग, आणि योनी मुद्रा धारण केलेल्या असून विश्वाच्या उत्पत्तीचे कार्य,पोषण, संरक्षण यासाठी ती शस्त्रधारी आहे. ॥ ५ ॥
तापलेल्या सोन्याप्रमाणे तिच्या अंगाचा रंग असून तिने तापवून शुद्ध केलेल्या सोन्याची आभूषणे परिधान।केलेली आहेत. या अखिल विश्वाला, जे पूर्वी रिते होते, निर्जीव, निर्मनुष्य होते त्या विश्वाला परिपूर्ण बनवलेले आहे. ॥ ६ ॥
पूर्वी या विश्वावर वस्ती नव्हती , जीवजंतू नव्हते, हालचाल नव्हती हे पाहून परमेश्वरीने अंधाराच्या लाटांसोबत जाऊन प्रकाशाची जाणीव निर्माण केली आणि प्रकाशाच्या तेजांचे किरण तिने घोर अंधारातूनच निर्माण केले. ॥ ७ ॥
त्या तेजोकिरणांवर अद्यापही अंधाराची काजळी पसरलेली होती. त्यातूनच एक सावळे नारीस्वरूपप्रकट झाले. त्या स्वरुपाचे मुख शोभित तर होतेच पण मुखात दात, आकर्ण मत्स्याकृती डोळे आणि ती सिंहकटी होती. ॥ ८ ॥
चार हातांची ही नारीस्वरुपा हातांत तलवार, ढाल, गळ्यात शिरच्छेद केलेल्या शत्रूंची मस्तकमाला,अंगावर केललेलं कबंध (डोक्याशिवाय धड) अशा उग्र स्वरुपात ती अवतरली. ॥ ९ ॥
या प्रकारे उग्र स्वरुपात अंधकारतून येणार्या अत्यंत सौंदर्यवती प्रमदेने(तामसीदेवीने) महालक्ष्मीलासंबोधून नमस्कार केला आणि म्हणाली, "हे भद्रे ! तुझ्या संकेताप्रमाणे मि अवतरलेली असून आतामला तू मला तू माझे पूढील काम सांगावेस." ॥ १० ॥
उत्तम स्त्री-लक्षणांनी युक्त असलेल्या त्या प्रमदेला तामसीदेवीला महलक्षमी म्हणाली, "हे देवी ! मी आतातुला निरनिराळी नावे देत आहे, त्या त्या नावांप्रमाणे त्या त्या प्रकारचे कोणते काम तुला करावे लागेल हेही तुला सांगते." ॥ ११ ॥
प्रथम तुझी नावे अशी असतील -महामाया, महाकाली, महामारी, क्षुधा (भूक), तृष्णा (तहान), निद्रा (झोप)एकवीरा (शौर्य), कालरात्री आणि दुरती. ॥ १२ ॥
अशी तुझी नावे असतील. त्या त्या नावांनी लोक तुझी आराधना, पूजा जप साधना करतील. आपल्याजप-साधना , ध्यान कर्मांनी संकटात, युद्धांत तुझा धावा करतील व तुझ्याकडून संकटमुक्त होऊन यावज्जीव सुखे भोगतील. ॥ १३ ॥
हे राजा ! महालक्ष्मीने इतके बोलून स्वतः एक अत्यंत सात्त्विक शांत स्वरुप धारण केले,जे पाहतापौर्णिमेच्या चंद्राची नितळ व सौंदर्ययुक्त ज्योत्स्ना फिकी व्हावी. हे अति सुंदर,शुद्ध व सगुण स्वरूप आनंददायी भासले. ॥ १४ ॥
महालक्ष्मीच्या या गौरवर्ण सगुण स्वरूपातील देवी गौरीच्या हाती अक्षमाला, अंकुश,वीणा आणि पुस्तक होते. या सत्वयुक्त स्वरुपालाही देवीने आणखी नावे दिली व त्या नावाप्रमाणेत्यांची रूपे ठरविली, त्यांची कामे निश्चित केली. ॥ १५ ॥
ती नावे अशी-महाविद्या, महावाणी, भारती, वाक् (वाचा) सरस्वती, आर्या, ब्राह्मी, कामधेनु, वेदगर्भा आणिधीश्वरी (बुद्धिदेवता). ॥ १६ ॥
त्यानंतर आदिम महालक्ष्मीने-महाकाली, महासरस्वतींना सांगितले, हे सख्यांनो देवींनो तुम्ही आपापल्या जरुरीप्रमाणे व ज्या ज्या कामांची योजना असेल त्या कर्मांना अनुकूल अशा गुणांनीयुक्त असे स्त्री-पुरुष घडवा (निर्माण करा). ॥ १७ ॥
महालक्ष्मीने त्या दोघींना हे सांगितल्यावर स्वतःच एक अत्यंत सत्त्वगुणांनी युक्त, शुद्ध ज्ञानाने संपूर्णकमलपत्रावर आनंदाने व सुहास्य वदनाने युक्त असे स्त्री-पुरुषाचे एक दांपात्य स्वतः निर्माण केले. ॥ १८ ॥
महालक्ष्मीने तदनंतर दांपत्यामधील पुरुषाचे ब्रह्मा, विधाता, विरिंचि, विधी असे नामकरण केले व नारीस्वरूपाला श्री पद्मा, कमला, लक्ष्मी इत्यादि नावांनी संबोधून नामाभिधान केले. ॥ १९ ॥
त्यानंतर महाकाली महासरस्वतींनी महालक्ष्मीप्रमाणे प्रत्येकी एकेक दांपत्य (जोडी) निर्माण केले.महाकाली व महासरस्वतींनी त्या जोड्यांना आपापली नावे सांगण्यास सुरुवात केली. ॥ २० ॥
महाकालीने स्वतः निर्माण केलेल्या दांपत्यातील नीलकंठ रक्त-बाहू श्र्वेतांग आणि चंद्रशेखर या नावाच्यापुरुषाला तथा अति शुभ्र धवल वर्णाच्या स्त्रीला स्वतः जन्म देऊन निर्माण केले (घडविले). ॥ २१ ॥
या दांपत्यांपैकी पुरुषाला रुद्र, शंकर, स्थाणु, कपदी, त्रिलोचन या नावांनी संबोधून विश्वाला ज्ञात केलेतर नारीला विद्या, कामधेनू, भाषा, अक्षरा, स्वरा या नावांनी विभूषित केले. ॥ २२ ॥
महासरस्वतीने एका गोर्या रंगाच्या स्त्रीला तथा सावळ्या रंगाच्या पुरुषाला निर्माण करुन सांगितले की,बाळांनो आता तुमची नावेही मी तुम्हाला सांगत आहे. ॥ २३ ॥
पुरुषाला विष्णू, कृष्ण, हृषीकेश, वासुदेव, जनार्दन ही नावे दिली तर नारीला उमा, गौरी, सती, चंडी, सुंदरी,सुभगा, शिवा या नावांनी सन्मानित केले. ॥ २४ ॥
याप्रमाणे त्या तीन दांपत्यापैकी तिन्ही पुरुषांना त्यांच्या त्यांच्या स्त्रिया प्राप्त झाल्या, हे फक्त ज्ञानवंतांनाचमाहीत आहे. इतर सामान्य जनांना हे रहस्य माहीत असण्याचे कारणच नाही. ॥ २५ ॥
ब्रह्मा नामक पुरुषाला महालक्ष्मी ही पत्नी प्राप्त झाली. रूद्राला गौरी तर वासुदेवाला श्री या पत्नीचा लाभ झाला. ॥ २६ ॥
सरस्वतीबरोबर संमीलन होऊन ब्रह्माजीने ब्रह्मांडाची रचना केली. रुद्राने (शिवाने) गौरीसह संमीलित होऊन तिचे पाणिग्रहण केले. ॥ २७ ॥
त्या ब्रह्मांडात मुख्य तत्वांची, कर्मांची, पंच महाभूतांची व विश्वाला सतत भासणार्या निकडीची म्हणजे स्थावर, जंगम,अन्न, वस्त्र, निवार्याची योजना केली व एक चराचर जगत् निर्माण केले. ॥ २८ ॥
भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह या नूतन जगाच्या पालन- पोषणाची जबाबदारी उचलली तर भगवान् शंकरांनीगौरिसह प्रलयकाली होणार्या मानवादि चराचरांच्या संहाराची योजना केली. ॥ २९ ॥
महाराजराजेश्वरी महालक्ष्मी ही या तिघींमध्ये सर्व सात्विक गुणांनी युक्त आणि सर्व तत्त्वधारिणी आहे.ती वेगवेगळी नावे धारण करून गुणकर्मानुसार सुख व शांतीचा वर देते. ॥ ३० ॥
सगुण स्वरुपात महालक्ष्मीची पूजा करावी ती वेगवेगळ्या नावांनी त्या त्या स्वरुपात असलेल्या देवीचीच. फक्त महालक्ष्मी म्हणून आराधना-पूजेचे निरनिराळ्या स्वरुपांची ती निर्भळ पूजा होऊ शकत नाही ॥ ३१ ॥