अथ वैकृतिकं रहस्यम्
ऋषिरुवाच
ॐ त्रिगुणा तामसी देवि सात्त्विकी या त्रिधोदिता ।
सा शर्वा चण्डिका दुर्गा भद्रा भगवतीर्यते ॥ १ ॥
योगन्रिदा हरेरुक्ता महाकाली तमोगोणा ।
मधुकैटभनाशार्थं यां तुष्टावाम्बुजासनः ॥ २ ॥
दशवक्त्रा दशभुजा दश्पादाञ्जनप्रभा ।
विशालया राजमाना त्रिंशल्लोचनमालया ॥ ३ ॥
स्फुरद्दशनदंष्ट्रा सा भीमरुपापि भूमिप ।
रुपसौभाग्यकान्तीनां सा प्रतिष्ठा महाश्रियः ॥ ४ ॥
खड्गबाणगदाशूलचक्रशङ्खभुशुण्डिभृत् ।
परिघं कार्मुकं शीर्षं निश्च्योतद्रुधिरं दधौ ॥ ५ ॥
एषा सा वैष्णवी माया महाकाली दुरत्यया ।
आराधिता वशीकुर्यात् पूजाकर्तुश्र्चराचरम ॥ ६ ॥
सर्वदेवशरीरेभ्यो याऽऽविर्भूतामितप्रभा ।
त्रिगुणा सा महालक्ष्मीः साक्षान्महिषमर्दिनी ॥ ७ ॥
श्र्वेतानना नीलभुजा सुश्वेतस्तनमण्डला ।
रक्तमध्या रक्तपादा नीलजङ्घोरुरुन्मदा ॥ ८ ॥
सुचित्रजघना चित्रमाल्याम्बरविभूषणा ।
चित्रानुलेपना कान्तिरुपसौभाग्यशालिनी ॥ ९ ॥
अष्टदशभुजा पूज्या सा सहस्त्रभुजा सती ।
आयुधान्यत्र वक्षन्ते दक्षिणाधःकरक्रमात् ॥ १० ॥
अक्षमाला च कमलं बाणोऽसिः कुलिशं गदा ।
चक्रं त्रिशूलं परशुः शङ्खो घण्टा च पाशकः ॥ ११ ॥
शक्तिर्दण्डश्र्चर्म चापं पानपात्रं कमण्डलुः ।
अलंकृतभुजामेभिरायुध: क मलासनाम् ॥ १२ ॥
सर्वदेवमयीमीशां महालक्ष्मीमिमां नृप ।
पूजयेत्सर्वलोकानां स देवानां प्रभुर्भुवेत् ॥ १३ ॥
गौरीदेहात्समुद्भूता या सत्त्वैकगुणाश्रया ।
साक्षात्सरस्वती प्रोक्ता शुम्भासुरनिबर्हिणी ॥ १४ ॥
दधौ चाष्टभुजा बाणमुसले शूलचक्रभृत् ।
शङ्खं घण्ता लाङ्गलं कार्मुकं चसुधाधिप ॥ १५ ॥
एषा सम्पुजिता भक्तया सर्वज्ञत्वं प्रयच्छति ।
निशुम्भमथिनी देवी शुम्भासुरनिबर्हिणी ॥ १६ ॥
इत्युक्तानि स्वरुपाणि मूर्तीनां ताव पार्थिव ।
उपासनं जगन्मातुः पृथागासां निशामय ॥ १७ ॥
महालक्ष्मीर्यादा पुज्या महाकाली सरस्वती ।
दक्षिणोत्तरयोः पुज्ये पृष्ठतो मिथुनत्रयम् ॥ १८ ॥
विरञ्चिः स्वरया मध्ये रुद्रो गौर्या च दक्षिणे ।
वामे लक्ष्या ह्र्षीकेशः पुरतो देवतात्रयम् ॥ १९ ॥
अष्टादशभुजा मध्ये वामे चास्यादशानना ।
दक्षिणेऽष्टभुजा लक्ष्मीर्महतीति समर्चयेत् ॥ २० ॥
अष्टादशभुजा चैषा यदा पूज्या नराधिप ।
यदा चाष्टभुजा पू ज्या शुम्भासुरनिबर्हिणी ॥ २२ ॥
नवास्याः शक्तयह पूज्यास्तदा रुद्रविनायकौ ।
नमो देव्या इति स्तोत्रमन्त्रास्तदाश्रयाः ॥ २३ ॥
अवतारत्रयार्चायां स्तोत्रमन्त्रास्तदाश्रया:।
अष्टादशभुजा चैषा पूज्या महिषमर्दिनी ॥ २४ ॥
महालक्ष्मीर्महाकाली सैव प्रोक्ता सरस्वती ।
ईश्र्वरी पुण्यपापानां सर्वलोकमहेश्र्वरी ॥ २५ ॥
महिषान्तकरी येन पुजिता स जगत्प्रभुः ।
पूजयेज्जगतां धात्रीं चण्डिकां भक्तवत्सलाम् ॥ २६ ॥
अर्घ्यादिभिरलंकारैर्गन्धपुष्पैस्तथाक्षतैः
धूपैर्दीपैश्र्च नैवेद्यैर्नानाभक्ष्यसमन्वितैः ॥ २७ ॥
रुधिराक्तेन बलिना मांसेन सुरया नृप ।
(बालिमांसादिपूजेयं विप्रवर्ज्या मयेरिता ॥
तेषां किल सुरामांसैर्नोक्ता पूजा नृप क्वचित् ।)
प्रणामाचमनीयेन चन्दनेन सुगन्धिना ॥ २८ ॥
सकर्पूरैश्र्च ताम्बूलैर्भक्तिभावसमन्वितैः ।
वामभागेऽग्रतो देव्याश्छिन्नशीर्षं महासुरम् ॥ २९ ॥
पूजयेन्महिषं येन प्राप्तं सायुज्यमीशया ।
दक्षिणे पुरतः सिंह समग्रं धर्ममीश्र्वरम् ॥ ३० ॥
वाहनं पुजयेद्देव्या धृतं येन चराचरम् ।
कुर्याच्च स्तवनं धीमांस्तस्या एकाग्रमानसः ॥ ३१ ॥
ततः कृताञ्जलिर्भूत्वा स्तुवीत चरितैरिमैः ।
एकेन वा मध्यमेन नैकेनेतरयोरिह ॥ ३२ ॥
चरितार्धं तु न जपेज्जपञ्छिद्रमवाप्नुयात् ।
प्रदक्षिणानमस्कारान् कृत्वा मूर्ध्नि कृताञ्ज्लिः ॥ ३३ ॥
क्षमापयेज्जगद्धात्रीं मुहुर्मुहुरतन्द्रितः ।
प्रतिश्लोकं च जुहुयात्पायसं तिलसर्पिषा ॥ ३४ ॥
जुहुयात्स्तोत्रमन्त्रैर्वा चण्डिकायै शुभं हविः ।
भूयो नामपदैर्देवीं पूजय्त्सुसमाहितः ॥ ३५ ॥
प्रयतः प्राञ्जिलिः प्रह्वः प्रणम्यारोप्य चात्मानि ।
सुचिरं भावयेदीशां चण्डिकां तन्मयो भवेत् ॥ ३६ ॥
एवं यः पूजयेद्भक्त्या प्रत्यहं परमेश्र्वरीम् ।
भुक्त्वा भोगान् यथाकामं देवीसायुज्यमाप्नुयात् ॥ ३७ ॥
यो न पूजयते नित्यं चण्डिकां भक्तवत्सलाम् ।
भस्मीकृत्यास पुण्यानि निर्दहेत्परमेश्र्वरीम् ॥ ३८ ॥
तस्मात्पूजय भूपाल सर्वलोकमहेश्र्वरीम् ।
यथाक्तेन विधानेन चण्डिकां सुखमाप्स्यसि ॥ ३९ ॥
इति वैकृतिकं रहस्यं सम्पूर्णम्
ऋषी म्हणाले, " महालक्ष्मीच्या सात्विक आणि त्रिगुण गुणातील तामसी भेदांनी तीन स्वरुपांचे वर्णन केले, त्या शर्वा चंडिका, दुर्गा, भ्द्रा आणि भगवती या नावांनी विख्यात झाल्या. सत्वस्वरूप असूनही भक्तांच्या संकट-विमोचनासाठी त्यांना शत्रूंशी युद्ध केले. ॥ १ ॥
तमोगुणातील तिचे स्वरुप महाकाली या स्वरुपातच दिसते. ही महाकाली भगवान् विष्णूंच्या निकट त्यांचेवर योगनिद्रेचे पटल टाकून होती. मधु आणि कैटभ राक्षसांनी ज्या वेळी ब्रह्मदेवाला त्रास दिला त्या वेळी या राक्षसांच्या नाशासाठी योगनिद्रेचा पडदा काढून त्यांना लढण्यासाठी उद्युक्त केल्याने ब्रह्मदेवांनी कृतज्ञतापूर्वक स्तवन केले तीच ही महाकाली होय. ॥ २ ॥
महाकालीची दहा तोंडे, दहा हात आणि दहा पाय आहेत. ती काजळ वर्णाची म्हणजे काळी आहे. त्याचप्रमाणे तिचे तीस डोळे विशाल आहेत. आणि एका ओळीने ते अत्यंत सुशोभित दिसतात. ॥ ३ ॥
हे भूपाला (राजा), तिचे विक्राळ दात आणि महाकाय रुप एका वेगळ्याच सौंदर्यमय व तेजोमय कांतीने सुशोभित दिसतात. तिचे विक्राळ रूप भक्तांना भाग्य आणून देते, तिच्या सौंदर्यमय व तेजोमय कांतीने मानमान्यता आणि संपत्ती ती मिळ्वून देते. ॥ ४ ॥
महाकाली आपल्या हाती तलवार, बाण, गदा, चक्र, शंख, भुशुंडी इत्यादि आयुधे धारण करते. तसेच परिघ, कार्मुक (धनुष्य) आणि शत्रूचे धडावेगळे केलेले मस्तक, ज्यातून रक्त ठिबकत आहे अशा वस्तूही तिच्या हाती आहेत. ॥ ५ ॥
ही महाकाली भगवान् विष्णूंची प्रेरक शक्ती असल्याने वैष्णवी आहे. तिची आराधना, स्मरण, ध्यान-धारणा केल्याने प्रसन्न होऊन आपल्या आशीर्वादाने भक्त संरक्षक होते. ॥ ६ ॥
सर्व देवांच्या शरीरावयवापासुन जिची उत्पत्ती झाली आहे. ती तेजोमयी महालक्ष्मी त्रिगुणमय प्रकृती असल्यानेच तिने महिषासुराचा वध करून महिषासुरमर्दिनी हे नाव मिळवले. ॥ ७ ॥
ती गौरवर्ण आहे. तिचे मातृस्तन श्र्वेत रंगाचे, कंबर आणि चरणयुगुल लाल रंगाचे तसेच जंघा आणि पिंढर्या नील वर्णाच्या आहेत. तिला आपल्या शौर्याचा अभिमान आहे व रणांगणात अजिंक्य असल्याने तो सार्थ आहे. ॥ ८ ॥
तिच्या कटीला वेढलेले वस्त्र (पाटव,साडी) बहुरंगी असल्याने ते अत्यंत सुंदर आणि चित्रविचित्र दिसते. देवीची वस्त्रे, आभूषणे, माळा अत्युत्तम तेजाने सुशोभित दिसतात. अंगाला लावलेल्या सुगंधी उटीने तिचे रुप आणि सौभाग्य शोभून दिसते. ॥ ९ ॥
ती सहस्त्र बाहूंची आहे पण तिचे अठरा हात प्रत्यक्षात दिसतात. तिच्या हातांतील आयुधांचे वर्णन उजव्या हातातील खालच्या बाजूने पाहता वरपर्यंत व डाव्या हातातील आयुधे वरपासून खाली या क्रमान्रे वर्णन केलेली आहेत. ॥ १० ॥
ती आयुधे क्रमाने अक्षमाला, कमळ, बाण, तलवार, वज्र, चक्र, त्रिशूल, परशू, घंटा व पाश (फास) अशी आहेत. ॥ ११ ॥
त्याचप्रमाणे शक्ती, दन्ड (काठी), चर्म (ढाल), धनुष्य, सुरापत्र (मदिरेचा पेला) आणि कमण्डलू असून ती कमलाच्या आसनावर विराजमान आहे. ॥ १२ ॥
ही देवी सर्व देवांच्या प्रेरणेतून आली असल्याने ही सर्व देवेश्वरी महालक्ष्मी आहे. हे राजा, हे ध्यानी घेउन जो भक्त या देवीच्या सगुण स्वरुपाची आराधना व पूजन करतो तो त्रिलोकात देव-देवताहूनही देवीला आधिक प्रिय होतो. ॥ १३ ॥
सत्वगुणांनी समृद्ध असलेल्या देवी पार्वती (गौरी) च्या मूळ स्वरुपापासून प्रकट झालेल्या देवीने शुभासुराचा वध केला. तिला महसरस्वती म्हणून ओळखू लागले. ॥ १४ ॥
हे राजा तू पृथ्वीपती आहेस. अष्टभुजा देवीच्या हाती क्रमाक्रमाने बाण, मुसळ, त्रिशूळ, चक्र, शंख,घंटा, नांगर (लंगर) आणि धनुष्य़ इतकी शस्त्रास्त्रे आहेत. ॥ १५ ॥
या देवी सरस्वतीने निशुंभाचे मर्दन (शिरच्छेद) त्याच प्रमाणे शुभासुराचाही वध केला. त्या सरस्वतीची भक्तिपूर्वक आराधना, पूजा केल्याने ती ज्ञान आणि सर्वज्ञबुद्धी देते. ॥ १६ ॥
हे राजा, याप्रमाणे तुला देवीच्या तिन्ही स्वरुपांचे पूर्ण वर्णन करून सांगितले आहे. या पार्थिव स्वरुपांच्या तिन्ही जगन्मातांची वेगवेगळी पूजा-उपासना करावी. ॥ १७ ॥
ज्या वेळी भक्तांना महालक्ष्मीची पुजा करायची असेल तर तिची मध्यभागी स्थापना करून दक्षिणेस महाकाली व उत्तर भागी सरस्वती अशी स्थापना करून त्याच्यासमोर तीन दांपत्यांची स्थापना करून पूजेस सुरुवात करावी. ॥ १८ ॥
महालक्ष्मीच्या पाठिमागे मध्यभागी सरस्वतीच्याबरोबर ब्रह्माची स्थापना करून पूजन करावे. उजव्या आणि डाव्या बाजूस गौरीबरोबर रुद्रपूजन आणि डाव्या हाताला लक्ष्मीसहित विष्णूपूजन करावे. महालक्ष्मीच्या पुढे खालील तीन देवतांची पूजा करावी. ॥ १९ ॥
मध्यभागी अष्टादशभुजा, डाव्या बाजूला दशानना महाकाली आणि उजव्या बाजूस अष्टभूजा असलेल्या महासरस्वतीची पूजा करावी. ॥ २० ॥
हे राजा ! ज्या वेळी अष्टादशभुजा महालक्ष्मी दशमुखी महाकाली किंवा अष्टभुजा सरस्वती यांचीच पूजा करणे असेल त्या वेळी दक्षिण उत्तरेस खालील देवतांची पूजा करणे इष्ट आहे. ॥ २१ ॥
उजव्या बाजूला काल आणि डावीकडॆ मृत्यू यांचे सर्व अरिष्टे संपून शांतता प्रस्थापित होण्यासाठी पूजन करावे. परन्तु ज्या वेळी शुंभासुराचा वध करणार्या अष्टभुजा देवीची पूजा करणेचा मानस असेल त्या वेळी- ॥ २२ ॥
त्या वेळी अष्टभूजेच्या नऊ शक्ती, दक्षिणेस रुद्र व उत्तरेस गणपती स्थापना करून पूजाव्यात आणि त्या वेळी नमो देव्यै या संपूर्ण स्तोत्राने महालक्ष्मी पूजावी. (नऊ शक्ती याप्रमाणे-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, शिवदूती व चामुंडा). ॥ २३ ॥
त्याचप्रमाणे या तिन्ही अवतार-देवींच्या पूजा-समयी त्यांच्या चरित्रांतील जे स्तोत्र-मंत्र आहेत त्यांचे पठ्ण करावे. त्यातही अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीची पूजा विशेषरुपे करावी. ॥ २४ ॥
कारण तीच महालक्ष्मी महाकाली महासरस्वती म्हणून उल्लेखली जाते व तीच पाप-पुण्यांची ईश्वरी आणि संपूर्ण त्रैलोक्याची महेश्वरी आहे. ॥ २५ ॥
महिषासुरमर्दिनीने महिशासुराचा वध केल्याने तिची पूजा, भक्ती करणे योग्य. तीच या विश्वाची स्वामिनी असून या जगाला धात्री, चण्डिका, प्रेमळ माता या स्वरुपात भक्तांचे पोषण करते. ॥ २६ ॥
देवीला अर्घ्य, अलंकार, गंध,फुले, अक्षता, धूप, दीप, नाना प्रकारच्या पक्वान्नांचा नैवेद्य आदी षोडषोपचारांनी अर्पण करून तिची पूजा करावी. ॥ २७ ॥
त्याचप्रमाणे बळीच्या रक्त-मासांच्या खाद्यान्नांचे अर्पण करुनही हे राजा पूजा-विधी करता येतो. (बळीच्या रक्त-मासांचे नैवेद्य दाखवून पूजन ब्राह्मणांनी करु नये.) बळीचे रक्तमांसाबरोबरच मद्याचाही नैवेद्य दाखवावा. प्रणाम, आचमन, सुगंधी चंदन, गंधलेप या प्रकारे संपूर्ण पूजाविधी करावी. ॥ २८ ॥
कापूर, आरति, विडा देवीला इतर अर्पणवस्तूबरोबरच उपचार व्हावेत . देवीच्या डाव्या बाजूला असलेल्या मस्तक तुटलेल्या महिषासुराचीही पूजा करावी. ॥ २९ ॥
महिषासुराच्या पूजेचे कारण देवीने रणक्षेत्रात त्याचा स्वतः वध करून त्याला सायुज्य मुक्ती दिली हे आहे त्याचप्रमाणे देवीच्या पुढे (मूर्तीपुढे) देवीचे वाहन असलेल्या सिंहाची पूजा करावी. सिंह सामर्थ्यवान, बलशाली असून चराचरांचे रक्षनकर्ता ईश्वर आहे. ॥ ३० ॥
म्हणून बुद्धिवंतांनी एकाचित्ताने या धर्मकार्य करणार्या देवीच्या वाहन मृगेंद्राची पूजा व स्तवन करणे योग्य आहे. ॥ ३१ ॥
ज्या वेळी एकाच चरित्राने स्तुती करावयाची असेल त्या वेळी मध्यम चरित्राने करावी.. परन्तु प्रथम आणि उत्तर चरित्रातील कोणत्याही एका चरित्राने पाठ करू नये. पाठ करण्यापूर्वी नम्रतापूर्वक देवीसमोर ओंजळ घेऊन नमस्कार करावा. ॥ ३२ ॥
त्याचप्रमाणे अर्धचरित्राचेही पठण करू नये. जपसाधना करताना आळस नसावा. प्रदक्षिणा, नमस्कार पाठानंतर करून आपली ओंजळ देवीपुढे क्षमा याचनेसाठी पसरावी. ॥ ३३ ॥
जगदीश्वरीची क्षमा मागताना पुनःपुन्हा आपल्या चुकांबद्दल, अपराध कबूल करून क्षमायाचना करावी. या सप्तशतीपाठातील प्रत्येक श्लोक सिद्ध मंत्र आहे. त्याला तीळ तुपासह हवनाहुती द्यावी. ॥ ३४ ॥
सप्तशती-पाठात जीजी स्तोत्रे वर्णिली आहेत त्या स्तोत्र-मंत्रांनी चंडिकेला पवित्र वस्तूंनी हवन द्यावे. हवनानंतर एकाग्र चित्ताने महालक्ष्मी देवीच्या नाममंत्राचा उच्चार करून पुन्हा तिची पूजा करावी.॥ ३५ ॥
त्यानंतर मन आणि इंद्रिये काबूत ठेवून नम्रतेने हात जोडून अत्यंत लीन भावनेने देवीला प्रणाम करावा आणि त्या सर्वकल्याणी चंडिकेचे पुनःपुन्हा भावपूर्वक चिंतन करीत करीत तिच्या नामस्मरणात, भजनात तल्लीन व्हावे. ॥ ३६ ॥
या प्रमाणे जो भक्त अतिशय भक्तीने नेहमी या परमेश्वरीची पूजा करील तो देवीला प्रिय होऊनतो ज्या ज्या सुखाची अपेक्षा करील तो ती सुखे त्याला मिळतील व भगवती त्याला मोक्षप्राप्तीचा स्वामी बनवील. ॥ ३७ ॥
जो नेहमी चंडिकेची पूजा करणार नाही त्याला भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारी चंडिका कृपा करणार नाही व त्याने साठवलेले पुण्य, सत्कृत्य संपुष्टात येऊन राख होतील. ॥ ३८ ॥
म्हणून हे राजा, तुम्ही सर्व लोकांची तारणकर्ती संकटहारिणी महेश्वरीचे वर सांगितलेल्या पद्धतीने पूजन करा व भगवती चंडिकेच्या कृपाप्रसादाला पात्र राहुन सुखे मिळवा. ॥ ३९ ॥