देवी कवच - क्षमा-प्रार्थना

देवी कवच - क्षमा-प्रार्थना

 क्षमा-प्रार्थना
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्‍वरि ॥ १ ॥
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्‍वरि ॥ २ ॥
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्‍वरि ।
यत्पूजितं मया देवि परिपूर्णं तदस्तु मे ॥ ३ ॥
अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत् ।
यां गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मादयः सुराः ॥ ४ ॥
सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके ।
इदानीमनुकम्प्योऽहं यथेच्छसि तथा कुरु ॥ ५ ॥
अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतम् ।
तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्‍वरि ॥ ६ ॥
कामेश्‍वरि जगन्मातः सच्चिदानन्दविग्रहे ।
गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्‍वरि ॥ ७ ॥
गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्मत्कृतं जपम् ।
सिद्धिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादात्सुरेश्‍वरि ॥ ८ ॥

हे भगवती ! मी या जीवनात हजारो पापे केलेली आहेत, रोज करतोच आहे. मला तुझा एक दीन सेवक समज. हे परमेश्‍वरी माझ्या पापांची मला क्षमा कर. ॥ १ ॥
मी पूजाविधीतील आवाहन ठाऊक नसलेला भक्त आहे. स्थापना आणि विसर्जन हे मूर्तिसंस्कार मी शिकलो नाही. षोडशोपचार पूजातंत्र मी केलेलं नाही. कसे करतात याचे ज्ञान नाही. म्हणून हे परमेश्‍वरी मला क्षमा कर. ॥ २ ॥
मला मंत्रपठण येत नाही. पूजेचे, यज्ञयागाचे कर्मकांड विधी मला ठाऊक नाहीत. हे सुरेश्‍वरी ! मला नीट भक्तीही करता येअत नाही. परन्तु मी केलेल्या वेड्यावाकड्या असंस्कारित विधीने मी जशी पूजा केली तशी पूर्ण करुन घे (गोड मानून घे.) ॥ ३ ॥
माझ्या हातून घडलेल्या असंख्य अपराधानंतरही मी तुझे स्मरण करुन तुला 'आई' अशी हाक देतो. त्या एका आर्त हाकेनेही  मला तुझ्या कृपेने जी सद्‌गती मिळते ती ब्रह्मादि देव-देवानांही सहजपणे मिळत नाही. ॥ ४ ॥
म्हणून मी केलेल्या अपराधांसह तुझ्याकडे तुझ्या पायाशी शरण आलो आहे. तू माझ्यावर दया दाखव, हे मी लीनतेने म्हणत असलो तरी माझ्या बाबतीत तू तुझ्या इच्छेला येईल ते कर. ॥ ५ ॥
अजाणतेपण, विसरभोळेपणा, अथवा बुद्धि-भ्रष्टतेने मी तुझ्या पूजेत, ध्यानात, साधनेत, जपतपात जे काही कमी जास्त केले असेल ते सर्व हे देवी ! त्याबद्दल मला क्षमा कर व आम्हाला प्रसन्न हो. ॥ ६ ॥
हे जगदम्बे कामाक्षी माते, सच्चिदानंदस्वरुपी दुर्गे, मी केलेली भाबडी अर्धवट पूजा तू स्वीकार आणि या साठीच मला प्रसन्न हो. ॥ ७ ॥
गुप्त वस्तूंमधील अत्यंत गुप्त वस्तूच्या राखणदारीची जबाबदारी देवीची आहे. त्या सर्वांचे संरक्षण तू कर मी आताच सांगितलेल्या जपसंख्येला स्वीकारुन तुझ्या कृपेने मला सिध्दि दे. हे सिद्धेश्‍वरी ! मी तुला अनन्य भावनेने शरण आलेलो असून मला सिद्धिसामर्थ्य (पूर्णतेचे) दे.         

N/A
Last Updated : December 20, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP