विनायकी :
या चतुर्थीला 'शयनाख्या चतुर्थी' असे म्हणतात. या दिवशी निद्रित श्रीअनिरुद्धस्वरूप गणेशाची आवडीने पूजा करावी व संन्याशांना भोपळापात्र दान केल्याने मनुष्य़ इच्छित फल प्राप्त करतो. या दिवशी मंगलमूर्ती गणेशाची विधिपूर्वक पूजा केल्याने मनुष्य देवदुर्लभ फळ प्राप्त करतो. या दिवशी मध्याह्नकाळी आंदोळ्यावर भगवान आपल्या सर्व स्त्रियांसह शयन करतात. त्या दिवशी ब्रह्मदेवादी सर्व देवांनी त्यांची पूजा ते निद्रित असतानाच केली. त्यामुळे श्रीगणेश प्रसन्न होऊन त्यांनी या दिवशी कोणी माझी पूजा मला झोपाळ्यावर बसवून करील व मला झोपवील त्याला अक्षय्य सुख-संपत्ती व मुक्ती मी देईन, असा वर दिला आहे.