वामनपूजा :
आषाढ शु. द्वादशीला वामनावताराचे यथाविधी पूजन करून व्रत केल्यास यज्ञासमान फळ मिळते. व्रत असे आहे- प्रत्यक्षमूर्ती असेल तर तिच्यासमोर बसावे; नसेल तर सोन्याची करून तांब्याच्या संपुष्टात तुलसीपत्रावर स्थापन करावी. तेही शक्य नसेल तर शालिग्रामाच्या मूर्तीची पुरुषसूक्तोक्त मंत्राने षोडशोपचार पूजा करावी.