* कज्जली तृतीया
हे व्रत श्रावण व. तृतीयेला करतात. कधी कधी देशकाल-परिस्थितीभेदाने हे व्रत भाद्रपद व. तृतीयेला करतात. परंतु खरे हे व्रत श्रावण व. तृतीये दिवशी करावयाचे असते. माहेश्वरी वैश्य लोक या दिवशी जवस, गहू, हरबरे आणि तांदळाच्या पिठांत तूप, गोड पदार्थ घालून त्यापासून अनेक प्रकारची पक्वान्ने करतात आणि चंद्रोदयानंतर त्याचेच एकवेळ भोजन करतात. यामुळे या व्रताला 'सातूडी तीज' सातवी तीज' असेही म्हणतात.
* बूढी तीज
उत्तर भारतात या व्रताचा प्रचार फार आहे. या दिवशी वृद्ध स्त्रिया झोपाळ्यावर बसून गाणी गातात. त्याला 'कजरी' असे म्हणतात. सात गाईंना या दिवशी कणिकेची रोटी खाऊ घालून त्या एकवेळ जेवतात. सासूला अगर वृद्ध स्त्रीला नमस्कार करून बताशांचे वाण देतात व उलट मेवामिठाई त्यांना मिळते.
*विशालाक्षी यात्रा
हे व्रत श्रावण व. तृतीये दिवशी करतात. यासाठी रात्रिव्यापिनी तिथी घेतात. या दिवशी उपवास व जागरण करतात. सुवर्णाची गौरीची मूर्ती करून तिची यथाविधी पूजा करतात. नैवेद्यात गुळाचा सांजा असतो. विशालाक्षी यात्रा मुख्य आहे.