* चंद्रषष्ठी
हे व्रत श्रावण वद्य षष्ठी दिवशी करतात. यासाठी चंद्रोदयव्यापिनी तिथी धरतात. हे व्रत मुख्यत: विवाहित अगर अविवाहित मुलीच करतात व चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्य देतात.
* छानाछट
श्रावण व. षष्ठीला हे व्रत पडते. हा उत्सव आहे. हे व्रत विशेषत: मारवाडी समाजात अधिक प्रिय आहे. कुमारी मुली चांगल्या वरप्राप्तीसाठी हे व्रत करतात. काष्ठाच्या चौरंगावर कलश स्थापन करून त्यावर सात पट्टे ओढावे आणि कापडावर स्वस्तिक काढून त्यावर गहू भरून एक भांडे ठेवावे, नंतर हातात ७-७ गहू धरून कथा ऎकावी.