रथोत्सव चतुर्थी
आश्विन शु. चतुर्थीला भगवतीची पूजा करून रात्री जागर करावा. एका सजविलेल्या रथामध्ये तिला बसवून तिची नगरामधून मिरवणूक काढावी. नंतर ती पूर्वस्थानी आणून स्थापावी.
विनायकी
आश्विन शु. चतुर्थीला 'मंदार चतुर्थ' असे म्हणतात. या दिवशी पुरुषसूक्ताने षोडशोपचारांनी कपर्दिश विनायकच्या भक्तिपूर्वक पूजेचे माहात्म्य सांगितले आहे. या दिवशी मंदारवृक्षाखाली बसून मध्याह् नकाळी श्रीगजाननाची पूजा केल्यास इच्छित फल प्राप्त होते.