* संकष्टी
हे व्रत प्रत्येक महिन्याच्या व. चतुर्थीस करतात. त्यासाठी चंद्रोदयव्यापिनी चतुर्थी ग्राह्य मानली जाते. जर अशी चतुर्थी दोन दिवस चंद्रोदयव्यापिनी असेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या वचनानुसार हे व्रत पहिल्या दिवशी करतात. व्रत करणाराने प्रात:स्नानादी विधी उरकल्यानंतर व्रताचा संकल्प करून संपूर्ण दिवस मौन पाळावे. सायंकाळी पुन्हा स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे, तदनंतर ऋतुकालोद्भव पुष्पगंधादी साहित्याने श्रीगणेशाचे पूजन करावे. चंद्रोदय झाल्यावर त्याची पूजा करावी. अर्घ्य, वायन देऊन स्वत: भोजन करावे. हे व्रत केल्याने सौख्य, सौभाग्य आणि संपत्ती यांची प्राप्ती होते.