गणपतीची आरती - गणराया आरती ही तुजला ॥ धृ...
Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - गणराया आरती ही तुजला
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति घुंगूर ।
गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी ।
पुजिती जन तुजला ॥ २ ॥
गंध पुष्प धुप दीप समर्पुनी ।
अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥
भक्त हरी हा आठवितो रुप ।
गातो तव लीला ॥ ४ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012

TOP