मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
आरती शंकरतनयाची । मोरया प...

गणपतीची आरती - आरती शंकरतनयाची । मोरया प...

Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - आरती शंकरतनयाची

आरती शंकरतनयाची । मोरया पार्वतीनंदनाची ॥ धृ ॥

पद्मासमान तुझे चरण । वंदिती सकळ सुरमुनी तीं ॥
उंदिर वाहन हें तुझे । त्यावरी बैसोनी फिरसी । चाल ॥
वर्तुल  गजासमीप मान । पायीं पैंजण, रुणझुण करिती, सताल सुस्वर, नुपुरें, सुंदर, गणेशाची वाजति झनन विनायकाची ॥ १ ॥ ॥ आरती ॥ 

भाद्री शुद्ध चतुर्थीला । तुजला ते दिनीं पुजिती ॥
एकविस दुर्वांकुरानीं । अर्पूनी तुजला नित्य ध्याती ॥ चाल ॥
नामाचा अगाध हो महिमा । शेंदूर अंगी चर्चित सुंदर, कर्णी कुंडल, झळकती सिद्धि नायकाची लखलखती एकदंताची ॥ २॥ आरती ॥

माघ शुद्ध चतुर्थीला । गणपती पुळ्यामध्यें तुजला ।
तेथें यात्राचि भरुनि । जन्मोत्सव तुझा करिती ॥ चाल ॥
तुझी अगाध हो करणी । अग्रपूजेचा मान देऊनी, सकळ सुरवर ध्याऊनि सत्वर तुजलाची पूजिती ॥ मोरया, तुजलाची पूजिति ॥ ३ ॥ आरती ॥

संकष्टिचीं व्रतें तुझी । करतील नरनारी जगती ।।
त्यासी प्रसन्न तूं होसी । मनीषा पूर्ण करिसि त्यांची ॥ चाल ॥
वर्णकाय तुझा महिमा । तुझिया स्मरणे, हरतील पापे सद्‌बुद्धि तू देई आम्हांला ॥ हीच तुम्हा विनंती मोरया, हीच तुम्हां विनंती ॥ ४ ॥

N/A

References : N/A


Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP