गणपतीची आरती - जय जय आरती पार्वतिकुमारा ...
Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - जय जय आरती
जय जय आरती पार्वतिकुमारा गणपती ओवाळूं।
पंचही प्राणांच्या कर्पूरवाती ज्ञाना़ग्रे जाळू॥धृ.॥
ओंकार प्रणवाक्षरी बीजापासूनि ध्वनि उठली।
ते हे माया त्रिगुणात्मकचि सगुंणत्वा आली॥जय.॥१॥
पंचभूतात्मक व्यापक एकचि घटक तुं जैसा।
दृष्टीगोचर नव्हसी कोणा गूळ गोडी तैसा॥जय.॥२॥
निगुण ज्योति सगुणा आली पुंडलिकासाठी।
विटेवर शोभे कटिकर उभा भीमेचे कांठी॥जय.॥३॥
ऎसी मूर्ति नित्यनिरंतर ध्यानी जे धरिती।
संकट त्यांचे दूर करी तूं श्रीमंगलमूर्ती॥जय.॥४॥
वायुतानें ह्र्दयिं ध्यायिली जसि राघवमुर्ती।
तसि हनुमंता तुझिया पायीं देई सद्भक्ती॥
जय जय आरती पार्वति कुमारा.॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012

TOP