गणपतीची आरती - आरती करितो गणपतीदेवा, दे ...
Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - आरती करितो गणपतीदेवा
आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।
सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥
पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।
उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥
नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।
म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012

TOP