मार्च २३ - प्रपंच

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.

प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते; भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामचे प्रेम आपल्याला यावे, असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही? जगामध्ये पाह्नताना कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे, असे आपल्याला का बरे दिसत नाही? अशी अवस्था असायला काय कारण असावे? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते. भगवंताचे पूजन-भजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही? ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर, आम्हांला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे, असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसा-अडका असावा, बायको-मुले असावीत, शेतीवाडी, नोकरी-धंदा, इतर वैभव असावे, आणि त्याचबरोबर भगवंतही असावा, असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच, असे आम्हांला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज, प्रपंचात आम्हांला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो, पण इतका प्रपंच करूनही आम्हांला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा. आगदी दूर, एका डोंगरावर जाऊन बसा, आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या, आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही आम्हांला तो सुख देत नाही, हे अनुभवाला येऊनसुद्धा तो टाकावा असे आम्हांला वाटत नाही. प्रपंचात आम्हांला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे. प्रपंच आम्हांला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले, आणि हा निश्चय एकदा दृढ झाला, म्हणजे मग भगवंताची गरज आम्हांला भासू लागेल, आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग, परिस्थिती, वगैरे काही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरविल्यावर, त्याचे प्रेम आम्हांला यावे असे आपल्याला वाटू लागेल, आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत: फिला म्हणजे संतांची संगती करणे; दुसरा म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे; आणि तिसरा म्हणजे अखंद नामस्मरण करणे. त्यांपैकी जो जुळेल तो त्याने करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP