ब्राह्मणांचे कसब - चाल चवथी
हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.
॥ अभंग ॥
ऋतु प्राप्त होता साधिती बा वेळ ॥
साहिना ती कळ उभा दारीं ॥१॥
दाविती उल्हास बोलून मंजूळ
पोटीं तळमळ द्रव्यलोभ ॥२॥
सोडूनीया लाज विचारीती काळ ॥
पाही राशीबळ पंचांगांत ॥३॥
जप अनुष्ठान स्थापिती निवळ ॥
झटती केवळ जसे स्नेही ॥४॥
ब्राह्यणभोजन तूप चळचळ ॥
दक्षिणा तुंबळ आधीं बोली ॥५॥
फुकटचे खाती दाटविती नळ ॥
करी मळमळ पाणी पीतां ॥६॥
धनी जेवतांना उठे पोटशूळ ॥
गुळवणी गूळ पाणी घाला ॥७॥
भॊंदिती अज्ञानी गृह पाठबळ ॥
इहलोकी काळ पोटबाबू ॥८॥
आप्तसोय-यांचा मेळवूनी मेळ ॥
त्यागावें समूळ पाखांडयास ॥९॥
प्रार्थना देवाची भोजन निर्मळ ॥
सदा सर्वकाळ जोती म्हणे ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP