काव्यरचना - ब्राह्मणांचा भोंदूपणा
महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.
[पद]
इच्छा ब्राह्मण भोंदुची ॥ मिथ्या धांव भटांची ॥धृ.॥
म्हणे आम्हांस देव देतो मूढास बोधितो
गुलहौषी देवा करुनी शुद्रा फसवीतो ॥१॥
आळस रिपु, मनुजें स्वत:श्रम करावे ॥
धूर्तभटाचे मनीं इच्छा हरामाचें खावें ॥२॥
मुठींत नाक मनांत नाम भट्टानें घोकावें ॥
शुद्रादिकांनी शेतीं खपुन आर्या पोसावें ॥३॥
खाया मिष्टान्न मऊ बिछाने भटास असावे ॥
मोठमोठे हुद्दे घेऊन शुद्रा नागवावें ॥४॥
भटजींच्या ध्यानीं ब्राह्मण पंतोजी असावे ॥
शुद्राकीकां विद्या न देतां मूढच ठेवावें ॥५॥
नांव देशाचे सांगूनी आपण पार्लमेंटी व्हावें ॥
शुद्रादिकांनी रणामध्यें लढून मरावें ॥६॥
भूदेवांच्या मनीं हाव पालखींत बसावें ॥
जिवंत-मेले भटा शुर्द्रे खांदेकरी व्हावें ॥७॥
सिव्हील सर्व्हीसची मनीं हाव सभेंत निंदावें ॥
हक्कासाठीं उगीच इंग्रजी धोंडे मारावे ॥८॥
जोती सांगे ब्रह्मचांडा समूळ त्यागावें ॥
पोटापुरता धंदा सारुन सत्या आळवावें ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP