मांदल नाचाची गाणी - भिल्ल्या डोंगर
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
भिल्ल्या डोंगर
करंटोली पान
हिडे डोंगर रान
भिल्लीन भात कांडं
न् भिल्ल्या डोंगर गाजं
उचल कावड चोट्या
भिल्ल्या एखलाच नाच
(करंटोली- एक झाड, चोट्या-एक लिंगवाचक शिवी)
भिल्ल्या डोंगर
करंटोलीचे पान
हिंडते डोंगर रान
भिल्लीण भात कांडते
न् गाजतो भिल्ल्या डोंगर
उचल कावड चोट्या
(लवकर कामे उरक, कारण...)
भिल्ल्या एकटाच नाचतोय्
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP