मांदल नाचाची गाणी - टाकलं फ़ासं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
टाकलं फ़ासं
आस कांडं जुन्या वर्या
बास विणं भुसा
पोर्या मारं मासा
दे रं पोरा मासं
नायातं तंगडं धरून फ़ासं
भिनारचं खासं, टाकलं फ़ासं
आम्ही मारलं मासं
टाकले फ़ासे
आई कांडते जुन्या वर्या
बाप विणते भुसा
पोरगा मारतो मासा
दे रे पोरा मासे
नाहीतर तंगडी धरून फ़ाशात अडकवेन
आम्ही भिनारचे खासे, टाकले फ़ासे
आम्ही मारले मासे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP