दिवसाची गाणी - बातदेवी तू हं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
बातदेवी तू हं
ये ऽ माझी बातदेवी तू हं
मी अजान आहे बाल ग देवी
माझे बेंबला ग नाल आहे देवी
नाल गुंडला कंबरंला ग देवी
ऐक माझे बातसरी देवी तू
नको करू राग गडे दोष तू
पाठीशी ग माझे उभी राही देवी तू...
आपली घरां आई यमाची ग दारा
यमाची दारा आपली घरामाहेरा....
यमादारी बाका ग वाजल्या
बाका नाही हाका गडे मारल्या
हाका गडे मारल्या यमराजानी
यमाचे दारी खाडं गडे पडलं....
यमाची दारी होला गडे फ़िरला
होला नाही गेला मनराया भोला ग...
यमाचे दारी हेला गडे फ़िरला
हेला नाही फेरा गडे फ़िरला....
यमाचे दारी फ़िरत घार ग
घारी नं ग मारला ग झेपाडा
जसा नेला कोंबडीचा पिल्ला ग, देवाजी हो.....
देवा नको करू राग गडे दोष तू...
जसा वांगीचा वांगा खुडला
जसा भाजीचा पाला कोमला
असी आपली मर्तिक कथा
बांगड्या फ़ुटं तं काच राया दिसते
आपला जीवडा पाण्याचा बुडबुडा
फ़ुटलां जातां, बिघडला नातां.....
आले जन्मी करू नका राग हो
मर्तिक कथा
हे ऽ माझी बातदेवी तू हं
मी अजाण आहे बाळ, ग देवी
माझ्या बेंबीला अजून नाळ, ग देवी
नाळ कंबरेला गुंडाळलेली, ग देवी
ऐक माझ्या बातसरी देवी तू
नको धरू राग, नको देऊ दोष तू
पाठीशी ग माझ्या, उभी राहा देवी तू....
आपली घरे म्हणजे यमाची दारे
यमाची दारे ती आपली माहेरे....
यमाच्या दारी बाके अशी वाजली
बाके नाही वाजली, हाका मरल्या
हाका अशा मारल्या यमाराजाने
यमच्या दारी खड्डे त्यामुळे पडले....
यमाच्या दारी फ़िरतो असा होला
होला नव्हे मनराजा तो भोळा
यमाच्या दारी हेला असा फ़िरला
हेला नव्हे फेरा असे फ़िरला....
यमाच्या दारी फ़िरत असे घार
घारीने घेतली कशी झेप
उचलले कोंबडीचे पिल्लू ग, देवाजी हो....
नको धरू राग, नको देऊ दोष तू..
जसे बांगीचे वांगे खुडले गेले
जसा भाजीचा पाला कोमेजला
तशीच आपलीही मर्तिक कथा...
बांगड्या फ़ुटल्या तरी काच राहतेच....
आपल जीव पाण्याचा बुडबुडा
फ़िटले जाते, मोडले नाते....
पुढील जन्मी, धरू नका राग हो....
(++ मृत व्यक्तिचे नाव येथे उच्चारले जाते)
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP