आयो.
मग भेटोनि द्रुपदा, द्रोण म्हणे, ' मी तुझा सखा पहिला ' ।
दे क्षोम शब्द तो त्या, दंड जसा स्पर्शतां खळा अहिला ॥१॥
पार्षत ह्नणे, ' दरिद्रा ! तूं राजाचा सखा कसा मुर्ग्धां ! ।
मित्र सधन सधनाचें साजे, गोदुग्ध मित्न गोदुग्धा ॥२॥
न करुनि विचार वदतां पडतें शोकांत मानस, ख्यातें ।
विद्वत्वें सधनत्वें तुल्यें लोकांत मान सख्यातें ॥३॥
झालें जीर्ण विसर जें, कोण तया मंदनार्यंका ! पुसतो ? ।
गतरंगसुर्गंध जुना पावे सन्मान काय कापुस तो ? ॥४॥
बहु बडबडे असें, दे मद्य तसें, त्यासि भाग्य मत्तत्व ।
मुनि मनिं ह्यणे, ' न करितां परिभव न कळेल यासि मत्तत्व ॥५॥
मुनि त्या अपमानातें घोंटी जेंवि त्रिलोचन गरातें ।
किमपि विरुद्ध न वदतां, गेला तो हस्तिनाव्हेनगरातें ॥६॥
राहे गुप्त कृपगृहीं द्रोण; तदार्त्मज सुशीलराशि कवी, ।
पार्थास कृपानंतर अस्त्रें, कोणासि न कळतां, शिकवी ॥७॥
ते कुरुकुमार करितां नगरीबाहेर जाउनि क्रीडा, ।
निरुदककूपपतितनिजवीटोद्धृत्यपटु पावले व्रीडा ॥८॥
ते वृद्ध कृश श्याम द्रोण ब्राह्मण अदूर पाहोनी ।
निजवीटोद्धारार्थ प्रार्थिति, भंवते उभेचि राहोनी ॥९॥
द्रोण म्हणे त्यांसि, ' तुह्मी भरतकुलज कीं, कृर्तांस्त्र कीं, तरिती ।
वीटा न निघे धिग् ! धिग् ! गुणतेचि स्वेष्टासिद्धि जे करिती
वीटा तसी स्वमुद्रा टाकुनि मी काढितो इषीकांही ।
साहित्य परि करावें प्रेमें मद्भोजनाविषी कांही ' ॥११॥
धर्म ह्नणे, ' अस्मद्गुरु कृप, तदनुमतें तुह्मांसही भिक्षा ।
शार्श्वत मिळेल, दावा वीटा काढूनि अद्भुता शिक्षा ' ॥१२॥
हास्य करुनि द्रोणें त्या शशिकुळजांसि द्यावया तुष्टी ।
कूपांत इषीकांची अभिमंत्रण करुनि सोडिली मुष्टी ॥१३॥
एकीचें मुख शिरलें वीटेमध्यें तिला दुजी जडली, ।
तिसरी तीस चतुर्थी तिजला ऐसी परंपरा घडली ॥१४॥
बाहेर काढिली ती वीटा तत्काळ जेंवि पात्र गळें ।
स्वरभंग त्यांत वरिला त्या पार्थाच्या मुहूर्तमात्र गळें ॥१५॥
अभिमंत्रित शर सोडुनि मुद्राछिद्रांतरी तया शिरवी, ।
वीर अंगुलीयकातें ओढी किरणें जसें पयाशि रवी ॥१६॥
त्या भंत्रचमत्कारें प्रमुदित होउनि, कुमार ते प्रणती ।
करुनि प्रेमें, सांगा निज नाम ग्राम कुळ ' असें ह्नणती ॥१७॥
द्रोण म्हणे, ' सांगा हे भीष्माला ज्ञानभगनदीपाला ।
जाणेल तोचि लोकीं; विदित नसे काय गगेनदीपाला ? ॥१८॥
बाळमुखें तें कळतां, भीष्म ह्नणे, ' परशुराम की द्रोण ।
आला असेल भाग्यें, लोकी तिसरा असा कृती कोण ? ॥१९॥
श्रीगुरुसम गुरुबंधु प्रेमें भेटोनि निवविला भीष्में ।
जैसा मयूर मेघें जो तापविला सुदुःसहें ग्रीष्में ॥२०॥
आणूनि राजसदनी, पूजुनि होऊनि सानुराग मनीं, ।
भीष्में तयासि पुसिलें कीं, ' सांगा कोण हेतु आगमनी ? ॥२१॥
द्रोण ह्नणे, ' परिसावें त्वां, सांगावें तुलाचि सभ्यास ।
द्रुपदास मजहि करवी चापी गुरु अग्निवेश अभ्यास ॥२२॥
गुरुबंधु सखे आह्मी होतों गुर्वाश्रमांत, वीरमणे ! ।
तेव्हा मजला ऐसें पांचाळ द्रुपद गौरवूनि ह्नणे ॥२३॥
' जे हां काय मज सख्या ! द्रोणा ! देईल राज्यपद तात, ।
तेव्हां तद्भोक्ता तूं, आण तुझी, कुळज सत्य वदतात ' ॥२४॥
गेला पढोनि, झाला नृप तो, झालों गृहस्थ मी, राया ! ।
फळली सुतरत्नफळें त्यावरि माझी कृपी सती जाया ॥२५॥
धनिकापत्यकृतपयः प्राशन पाहोनि, पुत्र पय मागे ।
पिष्टादक ठकवितां, तें माझ्या शल्य काळजा लागे ॥२६॥
पिष्टोदकपानमुदित सुत धनिकसुतांत चपळपद नाचे ।
मोहिति मज क्षणक्षण त्यांच्या उपहासशब्द वदनाचे ॥२७॥
बहु धन असो नसो, परि एक असावें गृहीगृही दुभतें ।
घ्यावें सुतार्थ शुद्धापासुनि गोदान, सन्मतें शुभ तें ॥२८॥
फिरलों बहु कीं, ' संतति पटु तसि गोदानदी न ताराया ' ।
परि विधि मज दे मिळवूं जातां गोदान दीनता, राया ! ॥२९॥
स्मरलें, स्वसखद्रुर्पदस्नेहवचन मज ह्नणोनि मग, राहो ।
यत्नांतरं करुनि असा निश्चय, गेलों तदीयनगरा हो ! ॥३०॥
भेटोनि तया वदलों, ' पूर्वीचा मी सखा ' असें नातें ।
जें तद्दत्तोत्तर तुज सांगाया योग्यसें असेना तें ॥३१॥
परि न कथितां भल्याला हत्तोप उणा न होय, शांतनेवा ! ।
तें ऐकुनि साहेसा कोण असा सज्जन प्रशांत नवा ? ॥३२॥
धिक्कारिति अज्ञ जसे मागतया भीक सर्वदा दाभण, गा ! ॥३३॥
वदला असे असें कीं, मी सख्यानर्ह मद, राहो तें ।
स्मरतां बहु दुःख मनी, भीष्मा खळजळधिमंदरा ! होतें ॥३४॥
' देईन अन्न एका दिवसाचें मात्र, पाहिजे तरि घे ' ।
हें शेवटी वदे, तों कोपागारी मदीय चेते रिघे ॥३५॥
द्रुपदकृतघ्नत्वाची येतांचि प्रत्ययासि पुष्कलता ।
त्यजिली सभा तयाची म्यां मधुपें जेंवि धर्मशुष्क लता ॥३६॥
आलों त्वन्नगरा मी जोडाया अर्थ शिष्य यश कांही ।
कर्ण विटविले माझे द्रुपदाच्या विरसवचर्नमशकांही ' ॥३७॥
भीष्म ह्नणे ' राज्य तुझें, ज्याच्या प्राप्त्यर्थ देव नवसाचे ।
ते कुरुभाग्यें आले हे पाय क्षणहि दूर न वसावे ॥३८॥
सिद्धचि झालें सर्वहि कर्तव्य असें तुह्मीं मनी आणा ।
बाणासन विज्य करा कौरव दासानुदाससे जाणा ' ॥३९॥