आदिपर्व - बकासुरवध उत्तरार्ध

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


तेव्हांचि पृथा देवी भेटे, अभयोक्ति जी वदे त्यातें ।
संजीविनीच जाणों ती रोगें करुनि जीव देत्यांतें ॥१॥
रोदनकारण पुसतां विप्र ह्नणे, ' अब ! तापसि ! श्रवणें ।
घ्यावें शिव, अशिवाच्या व्यर्थचि कां तूंहि तापसि श्रवणें ? ॥२॥
या राष्ट्रा बकराक्षस अजयूथा लांडगा जसा पाळी ।
तद्वेतनदानाची आलि असे आजि मजकडे पाळी ॥३॥
एक महिर्ष, एक पुरुष, शाल्योदनराशि, त्यासि भक्षाया ।
द्यावा असें असे, या व्यसनी मज कोण दक्ष रक्षाया ? ॥४॥
कुंती ह्नणे, ' दिला तुज एक खसुत, द्विजा ! नकोचि रडों ।
हा शोकभर स्वशिरीं घेउनि सकुटुंब तू नको चिरडों ' ॥५॥
विप्र ह्नणे, ' शिव शिव ! परघातक जो स्वार्थर्लुब्ध नर कामीं ।
तो जैसा तैसा या कर्मे पावेन घोर नरका मी ॥६॥
करुनि पराचें अहित स्वहित विहितं काय तापसि ! कवीसी ? ।
माते ! असें असे मज व्हाया याहूनि ताप सिकवीसी ' ॥७॥
कुंती ह्नणे, ' मदात्मजं गुरुवरमंत्रें असे महातेजा ।
साहों न शकति राक्षस वज्राघातसही सहाते जा ' ॥८॥
मग विप्र पृथाप्रार्थित भीम धरुन राक्षसापराध मनी ।
कोपे, जाणों दहनचि तो, होय प्रार्थना तया धमनी ॥९॥
तें मान्य करुनि मुनिला, ' व्हा स्वस्थ ' असेंचि तो कवि प्रार्थी
निः स्व जसे वित्तार्थी, तैसेचि कुलीन लोक विप्रार्थी ॥१०॥
स्वानुज साहस कांही करणार, असें युधिष्ठिरा समजे ।
' आकारेंचि परेंगित कळे ' ह्नणति कवि युधिष्ठिरासम जे ॥११॥
पुसतां पृथा कथी तें धर्म ह्नणे, ' अंब ! परिस तोकवचे ।
द्याया काय उचित ? जो रणी सहाणार अरिस तो कवच ॥१२॥
कुंती ह्नणे, ' अरे ! बा ! पावों द्यावा मुनी कसा असुखा ? ।
आह्मी सुखें ह्नणावें, ' काळा ! द्विज सोड, आमुचे असु खा ' ॥१३॥
भीसी कां ? अनुभविलें अनुजवळ तुवां न काय गा ! रानी ? ।
पावे ताप पराचा, परि हिमेगिरिचा न काय गारांनी ॥१४॥
पडला निपटं शिशुपणीं भीम मदंकावरुनि ज्यावरि तें ।
झालें चूर्ण शिळातळ न धरीं भय, यश तबानुजा वरितें ॥१५॥
ब्राह्मणसाहाय्यकर क्षत्रिय जो तोचि संत, तोचि तरे ।
ऐसें व्यासें कथिलें, ह्नणुनि तुह्मां तेंचि संततोचित रे ! ॥१६॥
जननीस धर्म वर्णी, नवल न वर्णील तीस सुरभी ती ।
तरिच तसे खळ वधिले तत्पुत्रांनी जयांसि सुर भीती ॥१७॥
रात्रौ एकाकी ही शिरतां सागरवनी न भी मकर ।
भीमहि तसा बकवनी आणि तदत्नी तसाचि भीमकर ॥१८॥
जेवी भीम, ' बका ! ये ' ऐसी मारुनि हांक उग्रास ।
शिरले काय सदुदरी सदोदनाचे भिवोनि सुग्रास ॥१९॥
भीम न सोडी भोजन, राक्षस ताडी बळें जरि बुक्यांनी ।
खळ गांजी, परि सादर हरिभजन करी जसा बुध मुक्यानीं
पांडव जेवुनि आधी मग राक्षस जीवितास आंचवला ।
सन्मणी न कोटिलक्षा ये, येतो काय राक्षसा चवला ? ॥२१॥
मारी हरि लीलेनें जेंवि गजा, तेंवि पार्थ कुणपाशा ।
तैं सुर ह्नणति, ' यमाच्या गुरु साजति भीमबाहुगुण पाशा ' ॥२२॥
ठेवी नगरद्वारीं परमभयानक अशुद्धिमत् कुणप ।
जाणों मातेनें तो वधिला शिशुरक्तपोग्र मत्कुणप ॥२३॥
भीमें हळूचि जावुनि कथिली वार्ता द्विजासी कानी ती ।
श्लार्घ्येहि करुनि न मिरवी कुळज, सुजनहो ! असी सिका नीती

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP