वनपर्व - किरातार्जुनयुद्ध

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


तरली चांडाळीहि न भावें वाहोनि शंकरा बेल, ।
हें जाणतां बुध न कां त्याच्या भजनी विशंक रावेल ? ॥१॥
जिष्णूग्रतपें भ्याले सर्व तपः श्रीविलाससदन मुनी, ।
कैलासाप्रति जाउनि कथिती श्रीशंकरासि पद नमुनी ॥२॥
भगवान् ह्नणे, ' न भ्यावें, त्याचा संकल्प शुद्ध, मी जाणें, ।
स्वस्थमनें स्वस्थानाप्रति, टाकुनि भीतिला, तुह्मी जाणें ' ॥३॥
मुनि जातांचि, किरातत्वाच्छादन मूर्तिसंर्पदेवरि घे ।
जेथें पार्थ तप करी, त्याचि वनी सानुकंप देव रिघे ॥४॥
आला किरातरुपी शिव जिष्णुसमीप, तोंचि हननाश ।
दानव वराहरुपी मूकहि करि जो तप स्विजननाश ॥५॥
दुष्टासि एकदांचि प्रेक्षिति ते वीर पार्थ भव दोघे,
ह्नणती, ' शरप्रहारा, तापसजन ' हाय हाय ' ! न वदो घे '
खरतर नरहरशर परजीवन एकक्षणीच सहरिती, ।
सम देवभक्त, ऐसें जाणों कळवावया असें करिती ॥७॥
अर्जुन म्हणे, ' किराता ! त्वां मृगयाधर्म लंधिला दर्पे, ।
स्वांतार्थ मजपुढें अघ केलें, खगपतिपुढें जसें सर्पे ॥८॥
हा प्रथम मत्परिग्रह असतां, त्वां ताडिलें कसें किरित ।
पाथर्रवटें स्वटंके भेदावें वज्रपाणिसह गिरिते ! ' ॥९॥
त्यासि किरात ह्नणे, ' रे ! मद्वन हें, प्रथम म्यांचि हा पिटिला,
म्यां वधिला असतां, तूं कोण शरें हाणणार या किटिला ॥१०॥
मिरविसि सुज्ञत्व वृथा, अन्याला स्वकृत ताप लाऊनी, ।
काय न दगड तपस्वी ? भिजला वृष्टींत तापला ऊनी ॥११॥
जोडुनि पुण्यवनी तप, बुडसी त्याच्या भरेंचि गर्वतमी, ।
तूं मजपुढें किती रे ! कोण हरिपुढें ह्नणेल पर्वत मी ॥१२॥
हो सिद्ध, जरि असेल स्वतपोबलगर्व, सज्ज चाप करीं, ।
होशील विमद, पडला गरुडाच्या जेंवि मत्त साप करी ' ॥१३॥
तें वाक्य अर्जुनाला, गरळ जसें यामुनाहदां कढवी, ।
पढवी जो चापश्रुति रामासि तयावरि स्वधनु चढवी ॥१४॥
शर ते जाणों वाहे एकनिमेषांत एक लाखोली, ।
प्रभुची जाणेल कसा बाहुबळें तोचि एकला खोली ? ॥१५॥
स्वरवें गिलों न देते कवलहि सिंहा विदारितेभा ते ।
सरले शर, दोन्हीही झाले सहसा तदा रिते भाते ॥१६॥
भ्याला, परि धैर्य धरुनि, ताडी त्या ईश्वरासि कोदंडे, ।
देता विश्व कवळित्या उग्रा काळासि कंप जो दंडे ॥१७॥
जें युद्धांत ह्नणे, ' हो ! भास्करजी ! न करजाल विकिरा ' तें
गांडीव धनुहि हरिलें कामाद्यरिमंदतमोरविकिरातें ॥१८॥
ज्याचा पाद ह्नणे, ' रे ! भक्तभवा ! स्वकुदशा न कर, वाळ ।
त्यावरि धनंजयाचा भंगे पावे यशा न, करवाळ ॥१९॥
प्रभुला जिकूं पाहे भुजयुद्धी, जेंवि काजवा सवित्या,
परि तोषवी स्वधर्मे आराधुनि भक्तराज वासवि त्या ॥२०॥
' मृत्युभयासि तराया न जडसुधेचें धरा चिबुक ' लीला ।
ज्याच्या असें सुरांसहि ह्नणती, तो प्रभु वराचि बुकलीला ॥२१॥
शोणित वमला, श्रमला, भ्रमला, गमला नुठेलसा पडतां, ।
परि उठला, मोह कसा राहेल ? दयाकटाक्ष सांपडतां ॥२२॥
पाहति न जाहलें जें पूर्वी कौतुक कदापि नाकी तें,
विजयार्थ शरण गेला नर नतकामदपदा पिनाकीतें ॥२३॥
वाहे पार्थिवलिंगी भावें जें माल्य तो प्रतापार्थ ।
पाहे तोंचि पुरस्थस्वमर्दघ्नकिरातमस्तकी पार्थ ॥२४॥
प्रभुला प्रभुप्रसादें त्या माल्यें करुनि वोळखे दास, ।
तो पात्र होय गरुडातिक्रमकर जेंवि टोळ खेदास ॥२५॥
पाय धरुनि पार्थ ह्नणे, ' ब्रह्मांडी अघ न माय बा ! पाहें ।
तूंचि हरी पक, हरिल अमृताचा न घन मायबापा ! हें ॥२६॥
प्रभुजी ! क्षमा करा, जी मागतसें पसरुनि स्व पदरा मी, ।
या दासीहि करो हें पदयुग, जैसें करी स्वपद रामी ' ॥२७॥
त्यजुनि विचार, कराया इच्छित होता बळे परिभवातें, ।
लघन असह्य गुरुला, स्वसभाजन वाटलें परि भवातें ॥२८॥
नमुनि ' क्षमस्व ' ह्नणतां, प्रकट करुनि रुप, बाहुनी कवळी
अधराप्रति स्मितानें स्वयशानें त्रिभुवनासही धवळी ॥२९॥
तो दीनबंधु उजरी देउनियां अभय पाशुपत नातें; ।
बोले असें, हरी जो स्वपद स्मरतांचि आशु पतनातें ॥३०॥
' सर्वत्न रणी विजयी तूं नारायणसखा नरा ! हो रे ! ।
स्वप्नीहि अयश तुझिया अवलंबुनि पदनखा न राहो रे ! ' ।
न कळतहि नाम घेतां पाप्यासहि जो म्हणोनि ' ओ ' तारी, ।
गेला संकल्पेंचि ब्रह्मांडे निर्मिणार ओतारी ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP