वनपर्व - नलदमयंतीवियोग

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


' द्यूत कर ' असें शिकवी मग नलदायाद पुष्कराशि कली, ।
न शिकावें परि तन्मति त्या दुर्मत्रा सुदुष्करा शिकली ॥१॥
पुष्कर ह्नणे, ' करावें द्यूत ' नल ह्नणे, ' अहा ! भलें सुचलें ।
अमृतापरीस माझ्या कर्णयुगाला त्वदुक्त हें रुचले ' ॥२॥
द्यूती आनंद जयें थोडा त्या पुष्करासि, अति कलिला, ।
हानि नलाला नुमजे, केली मलिनें शिरोनि मति कलिला ॥३॥
दुष्कर साधन जीचें त्या श्रीतें मेळवूनि पुष्करसा ।
पुष्कर साजे, नलतनु जसि सरसी ग्रीष्मकाळशुष्करसा ॥४॥
बहुमास भरी भरला, प्रियसख सचिवांसि विसरला निपट, ।
स्त्रीहि श्रीहि बहु रडे, कलिनें दाटून पाडिलें विर्पटा ॥५॥
सर्वस्वनाश होतां सचिवमतें ती करुनि यत्नातें, ।
धाडी माहेराला रथरत्नासह अपत्यरत्नातें ॥६॥
सर्वस्व हरुनि पुष्कर नलराजाला ह्नणे, ' उदारपणे ।
शेवट गोड करावा द्यूतरसाचा तुवां सदारपणें ' ॥७॥
गरळरसाच्या अब्दें या तच्छब्दें अतीव तळमळला ।
परि न दुरुक्तें आपण तो पुण्यश्लोकि धीर नळ मळला ॥८॥
जाय विभूषण दारानुगत नल त्यागुनि स्वनगरातें; ।
बहु लाजवी ह्नणति तैं जो हा ! हा ! पौर तो स्वन गरातें ॥९॥
त्या पुण्यश्लोकाला आश्रय देती न दिन पुरोपवन, ।
नल जठराग्नीस ह्नणे, ' जळ कीं तुज तृप्तिला पुरो पर्वन ' ॥१०॥
पुष्करभयें न पुसती कोणीही आप्त त्या नळाला हो !
हिंडे वनोवनी तो अन्नावांचूनि बहु गळाला हो ॥११॥
यत्पादतलमृदुत्वें लाजावें कामधेनुभवनीतें, ।
वर मिथुन पादचारें हिंडे, पावे फळेंहि न वनी तें ॥१२॥
हेमच्छद खंग पाहुनि कल्पी आहारहेमलाभ वनी, ।
वस्त्रें धरी ह्नणे हो ! ' प्राप्त न झालेंचि हें मला भवनी ' ॥१३॥
वस्त्री धरितां गेले वस्त्र हरुनि ते उडोनि खग नीच, ।
' वस्त्रहर अक्ष ' ऐसें कळवुनि झाले अदृश्य गगनींच ॥१४॥
वनदेवता न पाहों सकती लज्जानता नलास्याला; ।
करिति न रोमथाला हरिण, मयूरहि तदा न लास्याला ॥१५॥
साध्वीने स्वपटार्धे स्वतनू तसि झांकिली स्वपतितनु ती
वेदहि अशा सतीची करिति सदा, परि न पळहि पतित नुती ॥१६॥
वर्णी नदीनगांतें दावूनि तिला विदर्भदेशपथ, ।
त्याग समजोनि रडतां समजावुनि नल सतीस दे शपथ ॥१७॥
एका सभतें रात्नौ निजला मग आठवूनि निजलीला ।
कलिमलिनबुद्धि नल तो सोडूं पाहे श्रमोनि निजलीला ॥१८॥
' जावें कसें न कळतां ? मज पाशचि दारसंग हा निपट
आपण असोनि अक्षत होऊं देइल न संगहानि पट ॥१९॥
फाडावा स्वकरें तरि आतां पट जागवील निजलीला ।
होता मदर्थ जरि हरि असि असि म्हणता दुजी न निजलीला ' ॥२०॥
शोधुनि सभा पहावी ऐसी आधी दिली नळास मती, ।
मग खङ्गलता कलिनें, वाटे त्या सुकृतसत्फळासम ती ॥२१॥
कलियोगें जें धरिलें रायें तीक्ष्णत्व कापितां वस्त्रा ।
न धरील कधीहि तसें शाणशितें गरळलेपनें वस्त्रा ॥२२॥
खङ्गें पट कापविला न तिचा अर्धा गळाचि तो कलिनें, ।
न मळावेंचि कधी तें प्रेम कसें मळविलें खळें मलिनें ? ॥२३॥
जाय पुन्हा नल परते, पाहे येउनि तिच्या मुखाला हो ! ।
साश्रु नल ह्नणे, ' देवा ! हे वामाक्षी सती सुखा लाहा ' ॥२४॥
जाय पुढें, ये मागें, परतोनि सवेंचि जेंवि दोलो हो ! ।
तो लाहा भेटीचा घे कीं न पुढें स्वदृष्टि लोला हो ॥२५॥
' विश्वमरे ! क्षमे ! ह्या साध्वीला रक्ष, म्यां नरविली हो !
सर्वसहे  ! तुजपुढें न स्वाधिकता इणें मिरविली हो ! ॥२६॥
बापा ! सतिव्रता ! हे तुज बहु जपली, न जीवितासि सती,
तूंहि हिला बहु जप गा ! त्वां त्यजिल्या न स्त्रिया बर्‍या दिसती ' ॥२७॥
कलि दमयंतीप्रेआ हे दोघे वोढिती नळाला हो ! ।
प्रेम्याला त्यांचे मन सांपडले, देह त्या खळाला हो ! ॥२८॥
सत्याश्रित गुणमय शुचि कापुनि घे, परि न देचि हांक, पट,
पुण्यश्लोकी राहुनि उघडिल त्याचेंचि केंवि हा कपट ?  ॥२९॥
नल गेल्यावर कलिनें जागविली की तिचे असु खपावे, ।
पति न दिसतां ह्नणे, ' हा !  राज्यभ्रंशें न ती असुख पावे ॥३०॥
' अजि नाथ ! अहो नरवर ! अजि इकडे एकवेळ हेरा हो !
एकाकी जाल कसे ? दासी सेवा करील हे, राहो ॥३१॥
चुकल्यें, क्षमा करा जी ! न चुकेन पुढें कदापि सत्कार्या, ।
त्यजिली दया अकस्मात्, त्यागार्हा काय तीहि सत्कार्या ? ॥३२॥
माझें मन बहु तुमचा चिंतूनि असार्धुवाद तळमळतें, ।
अजि पुण्यश्लोक ! पहा मत्त्यागें कीर्तिपादतळ मळतें ' ॥३३॥
व्याघ्रालाही रडवी भ्रमतां गहनी तदा विलाप तिचा, ।
पदमुद्रित पथहि तिला कलिवशदैवें न दाविला पतिचा ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP