नमन
अतुल तव कृति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धृ०॥
वर्षती मेघजल, शांतविति भ्रमितल, सलिल मग त्ययुनि मल जात सुरमंदिरा ॥
गोविंद पूर्व-पद-अग्रज स्मरुनि पद, दबळि निज हृत्सखद शब्द नाकरा ! [गोविंदाग्रज]
[मधुकर व वसंत]
[ स्थ्ळः-रस्ता,]
नधुकरः वेडयांचा बाजार आहे आमचें घर म्हणजे ! वसंतराव, एकेकाचा प्रकाराऐकलात तर अक्कल गुंग होऊन जाईल तुमची ! नाहींतर उगीतर उगीच वेणूताईचें लग्न इटकें लांबणीवर पडलें असतें का ! जा कांहीं नाहीं तरी सोळावें वर्ष असेल तिला ! पण आमचे तात्या पडले ज्योतिप्याच्या नांदात ! अण्णासहेबांना सगळा वैद्यकाचा व्यापार आणि आईला देवधर्म पुरतात ! बरें दादाविषयी
म्हणाल तर त्यानें संन्यासदीक्षा घ्यावयाची फक्त बाकी ठेविली आहे !
वसंत : खरेंच, माधवरावांच्या डोक्यांत हें वेड कसें काय आलें ?
मधुकर: लग्न झालें तोंपर्यंत सर्व ठीक होतें; पुढें त्यांना कळलें कीं, बहिनीला लिहितां वाचताम येत नाहीं म्हणून; आणि हे म्हणजे पक्के सुधारनावादी ! केला निश्चय कीं, पुन्हां म्हणून बायकोचें तोंड पहावयाचें नाही, आणि त्य सुमारास विवेकानंद, स्वाभी रामतीर्थ,
हंसस्वरूप या मंडळींच्या व्याख्यानांचा प्रसार सुरू झाला होता, त्या वैतागांत आमच्या दादासाहेबांनींही परमाथीची कास धरिली ! इकडे बिचारी रमावहिनी महिरीं चांगले लिहायला वाचायला शिकली, पण उपयोग काय ? इतक्या अवकाशांत दादासाहेब पूर्ण विरक्त बनले ! वहिनींना घरीं आणावयाचें नांव काढलें कीं हे घर सोडण्याच्या प्रतिज्ञा करायला लागतात !
वसंत : पण, मधुकर, मला वाटतें कीं माधवरावाचं हें वैराग्य फार दिवस टिकणार नाहीं ! हें दोन दिवसांचें वारें दिसतें सगळें ! कांहीं प्रयत्न केला तर माधवराव अजून ठिकाणावर येतील !
मधुकरः येतील तेव्हां खरें ! पण आज तर घरांत एका वेडयाची भर पडली आणि बाकीच्यांच्या वेडांना उठाव्णी मिळाली! तात्या म्हणतात त्याला साडेसाती आहे सध्यां; अण्णा म्हणतात, अभ्यासानें आणि जाग्रणानें त्याचें डोकें फिरलें आहे आणि आई म्हणते कुणी तरी जादुटोणा केला आहे !
वसंतः आणि तिघांचेही आपापल्या परीनें सारखे उपाय चालू असतीत,
मधुः तें कांहीं विचारूं नका, त्यांच्या पत्रिकेचीं वर्षफळें काढण्यांत तात्या वर्षेंच्या वर्षें घालवितात; अण्णांच्या औषधांनी आणि काढयांनीं त्याची अन्नपाण्याची सुद्धां गरज भागविली आहे आणि आईनें तर अंगार्याधुपार्यांनीं त्याला शुद्ध बैरागी बनविला आहे !
वसंतः काय विलक्षण मंडळी ! हा प्रकार पाहून तुम्हाला अगदीं वेडयासारखें होत असेल !
मधुः अहो, इतक्यानें कुठें आटोपतें आहे सारें ? दादाच्या लग्नांत आपण चुकलों असें प्रत्येकाला वाटतें आहे आणि वेणूताईच्या लग्नाबद्दल फाजील सावधगिरी घेऊन मागच्या चुकीचा वचपा भरून काढप्याची तिघांनींही आपापल्या मनाशीं गांठ बांधून ठेविली आहे !
वसंतः आमची यमुताई मोठी भाग्याची म्हणून निर्विघ्नपणें तुमच्या पदरांत पडली म्हणायची !
मधुः त्यावेळीं आमच्या मंडळींत इतकी जागृति झाली नव्हती, नाहींतर माझ्या लग्नाचा प्रकारसुद्धां वेणुताईच्या लग्नासारखाच झाला असता. हल्लीं मात्र खरा तमाशा चालला आहे घरांत ! वेणुताई आणि दादा यांच्या कल्याणासाठीं तिहेरी उपायांचा सारखा मारा सुरू आहे.
वसंत: यमुताई कधींकधीं या गोष्टी सांगते, पण इतका प्रकार असेल असें नव्हतें आम्हांला वाटत ! मग कदाचित् ती मुद्दाम सांगत नसेला !
मधु: ती सांगणार किती तुम्हांला ! अण्णांनीं या दोघांसाठीं औषधांचा असा सांठा करून ठेविला आहे घरांत कीं तो पाहून मुर्डी आंजर्ल्याच्या वैद्यांनासुद्धां लाज वाटावी ! आईनें दोघांच्या हातापायांत गंडेताईतांची इतकीं गर्दी केली आहे कीं दोघांनींही ताबूतांत फकिरी घेतली आहे असा भास होतो. आणि तात्यांनीं तर या दोघांचीं वर्षफळें, पत्रिका यांच्या नकला करण्यासाठीं आणि ठिपणें करण्यासाठीं वीस रुपये दरमहाचा एक स्वतंत्र कारकून ठेवून दिला आहे !
वसंतः आणि माधवराव हें सारें मुकाटयानें सोशीत असतात वाटतें !
मधुः तो इकडे लक्षच देत नाहीं ! भोंवतीं बैराग्यांचा एक तांडा असला म्हणजे झालें ! त्यानें तर घराला धर्मशाळेची कळा आणून ठेवली आहे.
वसंतः अशा घोटाळ्यांत सारी जबाबदारी तुम्हांलाच संभाळावी लागते हें स्वाभाविकच आहे. मधुकर, मीं वेणूच्या लग्नाचा विषय आज मुद्दामच काढिला आहे हें तुमच्या लक्षांत आलेंच असेल.
मधु: तुम्हीं न बोलतां तुमचा हेतु माझ्या डोळ्यांसमोर नेहमीं उभा असतो; पण ज्या गोष्टीचा इलाज आपल्या हातीं नाहीं तिचा नुसता उच्चार करण्यांत काय हांशील आहे या विचारानें मी नेहमीं स्वस्थ बसतों.
वसंत: तर काय आमच्या प्रीतिविव हाची भाशा मीं सोडून द्यावी म्हणतां ?
मधुकर, आमचा प्रीतिविवाह म्हणजे एखाद्या नाटकांतली नाहीं तर कादंबरींतील बडबड समजूं नक ! तुमच्या लग्नांत वेणू मला देण्याबद्दल जी सारखी थट्टा चालली तिचा आमच्या दोघांच्याही मनावर अगदीं तात्पुरताच परिणाम झाला नाहीं, लग्नानंतर यमुताईबरोबर मी तुमच्या खेडेगांवीं एक महिनाभर होतों त्यावेळीं एकमेकांच्या अधिक परिचयानें तो परिणाम द्दढ झाला. तुमच्या लग्नांतल्या थट्टेला आम्हीं लग्नापेक्षां जास्त महत्त्व देऊं लागलों, पुढें, तुम्हांला माहीतच आहे, मी जरी त्यानंतर कधीं तुमच्या घरीं आलो नाहीं तरी या तीन चार वर्षीत आमच्या यमुताईबरोबर वेणू आमच्या घरीं दोन चार वेळां महिना महिना राहिली होती. या अवकाशांत आमच्या एकमेकांच्या गुणांची आम्हांला पारख पटून तुमच्या लग्नांतल्या थट्टेला आमच्या लग्नानें खरेपणाचें स्वरूप देण्याचा निश्चय केला आणि या कामांत माझी सारी भिस्त, मधुकर, एकटया तुमच्यावरच आहे, आमच्या लग्नाला तुमची आडकाठी नाहीं ना ?
वसंत:
(राग-यमन. ताल-दादरा.)
वैवाहिक दीक्षा जधि प्राप्त हो तुला ॥
प्रेमोत्सव होई कीं तेंवि मला ॥धृ०॥
आप्तवर्ग बांधिति ती सूत्र-बंधनें ॥
तींच करिति सुद्दष सुनव प्रेम-बंधनें ।
अंकूस्ति प्रेमांकुर होइ त्या पळा ॥१॥
मधुः असल्या अनुरूप विवाहाला दुदैंवाखेरीज दुसर्या कोणाची आडकाठी असणारा ? मी मागेंच एक दोन वेळां तुमच्याबद्दल गोष्ट काढिली होती; पण तात्या म्हणतात तुमचें टिपण जमत नाहीं, आई म्हणते परतवेल होते आणि अण्णा तर वैद्याच्या मुलाखेरीज कोणाचें नांव सुद्धां काढूं देत नाहींत. यंदा तात्यांनीं पुढल्या महिन्यांत वेणूचे ग्रह साधारण बरे आहेत तेव्हां तेवढघांत लग्न करून घ्यायला हरक्त नाहीं म्हणून लग्नाला कशीतरी परवानगी दिली आहे एकदांची ! तेव्हां आतां लोकांचीं तोडें बंद करण्यासाठीं निदान त्या बाळाभाऊशीं का होईना पण एकदांचें घेणूचें लग्न करण्याचा मी विचार केला आहे.
वसंत: बाळाभाऊ कोण हा !
मधुः अहो तो आमच्या गांवच्या वैद्यवुवांचा मुलगा ! वैद्यवुवांनीं अण्णांच्यावर आपल्या वैद्यकाचे चांगलेंच जाळें पसरलें होतें. अण्णा त्यांच्या अगदीं अर्ध्या वचनांत वागत असत. वैद्यवुवांच्या अतंकाळीं अण्णांनीं त्यांना वचन दिलें कीं वेणू बाळाभाऊला देईन म्हणून, आतां बाळाभाऊतें स्वतां नकार दिल्याखेरीज अण्णा म्हणतात मी कांहीं माझ्या वचनाला बाघ आणणार नाहीं.
वसंत: बरें; निदान मुलगा तरां बरा आहे का ?
मधु: कसला बरा ? जाणून बुजून पोरांला विहिरींत लोटायची ! घरच्या माणसांनीं शिकण्यासाठीं इथं ठेवला आणि मुलानें नाटकाचा छंद धरिला ! उठतां बसतां नाटकाखेरीज बोलणें नाहीं ! नेहमीं नाटकवाल्यांत पडलेला !
वसंत: आणि अशा माकडाच्या पदरीं तुम्हीं असलें रत्न बांधणार ? मधुकर, यापेक्षां वेणूला खरोखरीच एखाद्या---
मधुः वसंतराव, मला कांहींच कळत नाहीं असें समजूं नका ! पण हा लोकापवाद मोठा कठीण आहे ! चवाठयावरचीं कुत्रीं भाकरीच्या तुकडयानें तरी भुंकायचीं थांबतात; कावळा व्रण असेल तिथें तरी चोंच मारितो, विंचवाला छेडलें तरच तो नांगी चालवितो; पण लोकांच्या कुटाळकीची तर्हा या सर्वांच्या विरहित असतें. तेव्हां असा देखतां डोळ्यांनीं आगींत पाय घालायला तयार झालों आहें, बरें दुर्दैवानें त्याचें टिपणही तात्यांच्या पसंतीस उतरलें आहे ! आज आतां तेवढयासाठींच निघालों आहें. कुठुन तरी त्याला हुडकून अढून एकदां मुलगी समक्ष पहा म्हणजे शास्त्रोक्त झालें म्हणून सांगतो.
वसंतः धिक्कार असो आमच्या समाजाला ! विचारी मनुप्याला असा अविचार करणें भाग पडतें आणि त्याबद्दल त्याला कोणी दोष देत नाहीं ! अरेरे असे प्रकार पहात बसण्यापेक्षां संन्यास घेऊन वनवास पत्करलेला बरा !
मधुः वसंतराव असं अगदीं निराश होऊं नका ! चल आज त्या बाळाभाऊला बोलावूं, त्याला दोन गोष्टी सांगून पाहूं ! मी ही आज रात्रीं पुन्हां तुमच्याबद्दल गोष्ट काढून पाहतों ! पाहूं, प्रयत्नांतीं परमेश्वर ! नाहींतर होणाराला पाठ दिलीच पाहिजे, चला, त्या बाळाभाऊचा तपास काढूं.
वसंतः काशीच्या नव्या पाठशाळेंतून शिक्षण संपवून परीक्षा दिल्यानंतरसुद्धां तेथेंच राहिलों असतों आणि संन्यास घेतला असता---
मधु:व: मग दादाला हंसायला कुठें जागा उरली ? चला अहो, हातपाय गाळूं नका. चला.
मधुकर:
(राग-बिहाग, ताल-त्रिवट.)
सजुनि तुम्हा संन्यासी होतां नुरत तिळहि हंसण्या बारण इतरां कां तुम्ही हंसती ॥धृ०॥
हा विषाद द्या त्यजुनि तुम्ही प्रयत्न करुनि वरा नव यथ ॥१॥ (जातात.)