सर्वसाधारण - कलम १६८ ते १६९

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


राज्यांमधील विधानमंडळांची रचना . १६८ .

( १ ) प्रत्येक राज्याकरता एक विधानमंडळ असेल आणि ते राज्यपाल , व ---

( क ) * * * बिहार , * * * [ मध्यप्रदेश ], * * * [ महाराष्ट्र ], [ कर्नाटक ]. * * *[ आणि उत्तरप्रदेश ] या राज्यांमध्ये , दोन सभागृहं ;

( ख ) अन्य राज्यांमध्ये , एक सभागृह ,

मिळून बनलेले असेल .

( २ ) जेथे राज्याच्या विधानमंडळाची दोन सभागृहे असतील तेथे . एक " विधानपरिषद " म्हणून आणि दुसरे " विधानसभा " म्हणून ओळखले जाईल , आणि जेथे केवळ एक सभागृह असेल तेथे , ते " विधानसभा " म्हणून ओळखले जाईल .

राज्यांमध्ये विधानपरिषद नाहीशी करणे किंवा निर्माण करणे . १६९ .

( १ ) अनुच्छेद १६८ मध्ये काहीही असले तरी . विधानपरिषद असलेल्या राज्यात अशी विधानपरिषद नाहीशी करण्याकरता अथवा अशी विधानपरिषद नसलेल्या राज्यात अशी विधानपरिषद निर्माण करण्याकरता , त्या राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्य - संख्येच्या बहुमताने आणि सभागृहातील उपस्थित असलेल्या व मतदान करणार्‍या सदस्यांच्या दोन - तृतीयांशाहून कमी नाही इतक्या बहुमताने तशा आशयाचा ठराव पारित केल्यास . संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल .

( २ ) खंड ( १ ) मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये त्या कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतील अशा या संविधानाच्या सुधारणेच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशा पूरक . आनुषंगिक व परिणामस्वरुप तरतुदी अंतर्भूत असू शकतील .

( ३ ) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरता पूर्वोक्त्त असा कोणताही कायदा हा , या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP