श्रीदत्त उपनिषद - अध्याय दुसरा
स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.
नाभीपासूनी उन्मेष वृत्ती । होय सोऽहम् शब्दाची आवृत्ती । तेचि सदैव धरिता चित्ती । ब्रह्म हाता येतसे ॥१॥
धरिता सो सांडिता हम् । अखंड चाले सोऽहम् सोऽहम् । याचे धरिता ध्यान । ब्रह्मज्ञान होतसे ॥२॥
हकारेण बहिर्याती । सकारेण विशेत्पुनः । हंसहंसेत्यमुं मंत्र । जीवो जपति सर्वदा ॥३॥
अजपा नाम गायत्री । योगिनां मोक्षदा सदा । अस्या संकल्पमात्रेण । सर्व पापैः प्रमुच्यते ॥४॥
कुंडलिन्यां समुदभूता । गायत्री प्राण धारिणी । प्राणविद्या महाविद्या । यस्यां वेद स वेदवित् ॥५॥
सोऽहम् जपता लक्ष । हाता येई अलक्ष । कोटी जपे दत्त । प्रसन्न जाणा होतसे ॥६॥
निर्विकल्प म्हणजे कल्पनातीत । त्यासी राहावे चिंतित । निर्गुण परब्रह्म अद्वैत । स्वरुप जाणा होतसे ॥७॥
सोऽहम् हंसा तत् त्वम् असी । ते तू ब्रह्म आहेसी । सोऽहम् ध्याने ऐसी । अवस्था सहज होतसे ॥८॥
स्वरुपी राहिल्या वृत्ती । अवगुण अवघेची जाती । सर्व परब्रह्म मती । देव सर्वत्र संचला ॥९॥
निरंतर स्वरुपी राहता । स्वरुपची होईजे तत्त्वता । लक्षणे अंगी बाणता । मग वेळ नाही ॥१०॥
वृत्ती ऐसी वाढवावी । पसरोनी नाहीच करावी । पूर्ण ब्रह्मास पुरवावी । ब्रह्म सर्वत्र दिसतसे ॥११॥
अभ्यासाचा मुकुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणी । स्वरुपी वृत्ती लक्षणी । स्वरुपची जाणा होतसे ॥१२॥
बाह्य भलतैसे असावे । अंतरी स्वरुपी लागावे । स्वरुपी सदैव राहावे । ब्रह्म स्वरुप म्हणोनिया ॥१३॥
स्वरुपी स्वरुपची झाला । मग तो पडोनी राहिला । अथवा उठोनी पळाला । तरी तो ब्रह्म होत असे ॥१४॥
ॐ
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP