द्वितीय स्कंध - अध्याय दुसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । ऋषीह्मणतीसांगेसूता । सत्यवतीव्यासमाता । केवीजाहलीशंतनुकांता । निषादकन्याकेविवरी ॥१॥
प्रथमशंतनुकामिनी । तीकोणहोतीभामिनी । वसुअंशभीष्मकोठुनी । केवीझालासांगिजे ॥२॥
सूतम्हणेइक्ष्वाकुवंश । रावझाला महाभिष । यज्ञेंतोषऊनयज्ञेश । ब्रह्मसदनपावला ॥३॥
एकदांसभेमाझारी । चतुराननासे वितीवेदचारी । समस्तदेवांच्याहारी । यथायोग्यबैसल्या ॥४॥
महाभिषतेथेंअसे । गंगादेवीबैसलीसे । इतक्यांतवायूसरसे । वस्त्र उडालेंगंगेचें ॥५॥
तीलांवण्याचीखाणी । उघडेंअंगमोकळेंपणी । सर्वहीतेव्हांअधोंवदनीं । तटस्थलक्षणीबैसले ॥६॥
रावपाहेनिरखूनी । सुरसरीपाहेहस्यवदनीं । लज्जायुक्तहोवोनी । सांवरीपदरजान्हवी ॥७॥
पाहोनिविधीकोपला । ह्मणेमर्यादाभगकेला । घेऊनमनुष्यजन्माला । महाभिषाभोगावें ॥८॥
पुण्ययोगेंममसदन । पावसीलजामागुत्यान । तूंहीगंगेजाऊन । रममाणव्हावें मानवीं ॥९॥
शापेंहोउनीदुःखीत । महाभिषतेव्हांचिंतित । जन्मस्थळसोमवंशांत । प्रतीपरावनिवडिला ॥१०॥
तेथेंतोजन्माआला । नामशंतनूपावला । इकडेकायवृतांतझाला । गंगेकडेपरिसिजे ॥११॥
शंतनुजन्मनव्हता । प्रतीपतेव्हांसहजफिरता । गंगातीरीं बैसलाहोता । नवलएकजाहलें ॥१२॥
अतिमनोहररुपीणी । गंगाहोऊनीतरुणी । दक्षिणांकीयेउनी । प्रतीपाचेविराजे ॥१३॥
नृपह्मणेआश्चर्यभरीं । कोणाचीतूसुकुमारी । किमर्थमम अंकावरी । बैसलीससांगिजे ॥१४॥
गंगाम्हणेनृपती । व्हावेंमाझेंआपण पती । ऐकूनिम्हणेतिजप्रती । दक्षिणांकीबैसलीस ॥१५॥
सुनालेकीचेंस्थान । पावली सदैवयोगाने । स्नुषाव्हावेंत्वांजाण । ममपुत्राशीवरावे ॥१६॥
अद्यपीमजपुत्रनसे । परीहोईलतवभाग्यवशें । ऐकूनीपरीक्षूनीसरिस । गुप्तजाहलीसुरापगा ॥१७॥
राव आलाघरासी । मनींह्मणेआश्चर्यसरसी । मज अभाग्यानिपुत्रिकासी । स्नुषाकेविलाभेल ॥१८॥
ऐसेनित्यचिंतनकरी । तवजगन्माताकृपाकरी । भार्याझालीगरोदरी सुदिनीपुत्रजाहला ॥१९॥
अतिहर्षेनृपाळे । अपारधनवाटिलें । जातकादीसर्वकेलें । अतिहर्षेपाहेंमुख ॥२०॥
शंतनुनामठेवित । तरुणपाहूनिआपलासूत । रुपेंगुणेंअतिमंडित । सवेचिराज्यींस्थापिला ॥२१॥
पुत्रासिसांगेकानीं । गंगातीरींकोणीकामिनी । प्राप्तहोताचिधर्मपत्नी । करुनिआणीनिःशंक ॥२२॥
एवंसांगूनपुत्राशी । प्रतीपगेला वनाशीं । आराधुनीपरांबिकेशी । सायुज्यपावलाकृपेनें ॥२३॥
इकडेशंतनूनृपति । प्राज्ञत्वेंसाधीराजनीती । पुत्रवत् पाळीप्रजेप्रती । अखंडसेवीदेवीते ॥२४॥
एकसमयीं वनांतरीं । शंतनूरावमृगयाकरी । सहजपातलागंगातीरी । तवपाहेकामिनीते ॥२५॥
स्मरलेतेव्हांपितृवचन । भुललारुपलावण्यपाहून । म्हणेतूंकोणाचीकोण । एकटीकेवी वनांतरी ॥२६॥
तुझेंरुपपाहून । लुब्धझालेंमाझेंमन । अंगिकारीमाझेंवचन । धर्म पत्नीहोईजे ॥२७॥
ऐकूनीनृपाचीवाणी । गंगाबोलेंहांसोनी । जरीराहशीममवचनी वरीनतुजराजेंद्रा ॥२८॥
जेव्हांजेव्हांमाझेंमन । सांगेतैसेचकरीन । त्वांकरितांच निवारण । जाईनक्रुरभाषणेंसी ॥२९॥
नृपझालाकामातुर । केलासर्वअंगिकार । रथींबैस उनीसत्वर । घराआणिलीकामिनी ॥३०॥
सुमुहूर्तमगपाहुनी । विवाहेकरी धर्मपत्नी । रमताझालाहर्षमनीं । धन्यमानीत आपणा ॥३१॥
पुढेंपुत्रहोतातियेशी । रावझालाअतिहर्षी । तव उचलूनिपुत्रासी । स्वप्रवाहीटाकिला ॥३२॥
नृपतीह्मणेमनीं । कोण आहेहीकामिनी । डाकिनीकींशाकिनी । कायकरावेंमीआता ॥३३॥
जरिकांहींविचारिता । त्यागूनजाईलहीआता । तरीहोय उपहास्यता । सुखनाशहोईल ॥३४॥
ऐसेंविचारेनृपती । कांहीनबोलेअप्रीती । टाकिलेनेऊनपुत्रसाती । राजाकांहींनबोले ॥३५॥
आठवाहोताचिकुमर । घेऊननिघालीसत्वर । रावलोळेपायावर । ह्मणे एवढा कुमरमजदीजे ॥३६॥
नायकेतीचालली । रावेंतेव्हांकरिधरिलीं । क्रोधेकरुनिनिवारिली । ह्मणेदुष्ठेघातुके ॥३७॥
सातपुत्रत्वांमारिले । परीनाहींनिवारिले । ममकुळाशी बुडविले । धर्मपत्नीहो उनी ॥३८॥
राहेअथवासुखेंजाई । आठवासुतमजदेई । प्रवर्तसी कांकुलक्षई । भयनमानिशीपातका ॥३९॥
ऐकूनिऐसेंक्रोधवचन । म्हणेनेणसीमी कोण । मजत्रिपथागंगाजाण । महाभिष अससीतूं ॥४०॥
जन्मांतरेंतूंनेणसी । मजवाक्येअव्हेरिशी । मीजाईनस्थानासी । पुत्रतुजदेईन ॥४१॥
पुत्रनाशाचेंकारण । सांगते ऐकसावधान । अष्टवसूएकदीन । वसिष्ठाश्रमींपातले ॥४२॥
स्त्रीजनासह क्रीडती । तेथेंनंदिनीसपाहती । कामधेनूरुपवती । आश्रमीनव्हतेवशिष्ट ॥४३॥
तयामाजीद्यौनामक । वसूहोताजाणएक । तेणेंऐकूनीस्त्रीवाक्य । धेनूचोरिलीऋषीची ॥४४॥
उशीनरनामेंराजर्षी । नेलीतयाआश्रमासी । दुग्धपाजिलेंकन्येशी । सखीस्त्रियेचीम्हणुनिया ॥४५॥
नंदिनीचेंदुग्धप्राशीत । आयुष्यहोय अयुत । जराव्याधीनासत । म्हणोनिदीधलेंतियेशी ॥४६॥
वसिष्ठपातलेसदनी । तोनदेखिलीनंदिनी । ज्ञानदृष्टयाजाणुनी । वसुगणशापिले ॥४७॥
चोरिलीमाझीनंदिनी । वसुगणेंमजनमानुनी । प्राप्त असेमनुष्ययोनी । जन्ममरणदुःखद ॥४८॥
वसूतेव्हांशरण आले । कृपेनेंमग उःशापिले । सात जणातेवदले । स्वल्पकालें सुटाल ॥४९॥
अपराधकेलाजेणें । बहुकालमानुष्यभोगणे मगतुवास्वर्गाजाणें । अपारकीर्तिमेळउनी ॥५०॥
गंगाम्हणेभूपती । तेशरण आलेमजप्रती । जन्मदेऊनसोडीवम्हणती । तेचिवसूमोक्षिले ॥५१॥
हावसूचिरकाळ । राहील भूपातुजजवळ । अपारकीर्तिमिळवील । कुलदीपजाहला ॥५२॥
जोंवरीअसेसान । केवीराहेमजवांचून । तोंवरीकरुनिपालन । तरुणहोतादेईनतुतें ॥५३॥
सूतम्हणे एवंबोलली । पुत्रासहगुप्तझाली । नृपाळापडलीभुली । स्वप्नवतझालेंकी ॥५४॥
स्वप्नकैंचेजागृती । स्त्रीपुत्रनदिसती । नेणोकायदैवगती । उभयलाभामुकलों ॥५५॥
लोभेंधांवलोंसुताशी । अंतरलोकींदोहींशी । व्यर्थ ऐश्वर्यसंपत्तीशी । कार्यकर्णेभणंग ॥५६॥
एवंविलापेनृपती । द्वादशवर्षेपूर्णहोती । सहजरावगंगेप्रती । प्राप्तझालादैवयोगें ॥५७॥
तवदेखिलेप्रवाहात । बाळएकलेंक्रीडत । चिमणेंधनुष्यहातांत । चिमणेबाणसोडीतसे ॥५८॥
गोजिरगोंडसहात । धनुष्यगरगराफिरवित । केव्हांबाणकाढीत । केव्हांजोडी नकळेची ॥५९॥
गंगेच्यावाहतीलहरी । वरीतरतीबाणहारी । श्रमनसेबाळाचेअंतरीं । तेजःपुंजसूर्यजैसा ॥६०॥
पाहूनीरावविस्मित । मनामाजीचिंतीत । जळामाजीकेविस्थित । नकळेकांहींदेवमाया ॥६१॥
जव ऐसेचिंतीत । गुप्तझालाबाळतेथ । तवप्रकटलीअकस्मात । पूर्ववतजान्हवी ॥६२॥
बाळदेऊनराजाप्रती । गंगावदलीमागुती । पुत्रतुझाअतिख्याति । गंगानंदननामयाचे ॥६३॥
सर्वविद्यापारंगत । भार्गवसमयुद्धांत । राहिलासेवसिष्टाश्रमांत । परशुरामसमत्वया ॥६४॥
ऐसेंवदूनिगुप्तझाली । राजवृत्ती बहुतोषली । पुत्रघेउनीमहाबली । उत्सवपरमकरीतसे ॥६५॥
युवराज्यपुत्रादेउन । सुखेंराहेआपण । एकदांप्रवेशलावन । मृगयाकरीतएकला ॥६६॥
तवमधुसुगंधमारुत । येऊनिनृपाझगडत । सुगंधयोगेंउन्मत्त । शंतनुतेव्हाजाहला ॥६७॥
म्हणेहासुगंधपवन । येत असेजेंथून । अतिरमणीयतेंस्थान । असेल अवश्यपहावें ॥६८॥
पवनमार्गेंसुगंध घेत । राजाजाययोजनपर्यंत । निषादकन्यादेखिलीतेथ । रुपसुगंधयुक्ताती ॥६९॥
परीवस्त्र असेंमलीन । राजाभुललापाहून । ह्मणेतूंदेवकन्येसमान । कोण आहेसांगिजे ॥७०॥
योग्यतुजराज्यसुख । किमर्थभोगिशीव्यर्थदुःख । मजवरुनदेईंसुख । मनोगतसांगदेतोंमी ॥७१॥
सत्यवतीह्मणेमहाराज । सुखेच्छाआहेमज । परीपित्याआधीनसमज । तोदेईतरीघडावें ॥७२॥
ऐकूनिनिषादाघरीं । आलारावसत्वरी । म्हणेहीतव कुमरी । देसीतरीविवाहीन ॥७३॥
निषादह्मणेनृपती । कन्याकीजपुत्राप्रती । आपली जाहलीयायुवती । तिच्यापुत्राराज्यनसे ॥७४॥
ऐकूनिराव उदास । परतगेलागृहास । स्नानभोजनादित्यास । नसुचकांहींतेधवा ॥७५॥
पितयापाहुनिसचिंत । नमोनिचरणविनवीत । किमर्थजाहलेदुःखित । मज अवश्यसांगिजे ॥७६॥
मीअसतांजिवंत । दुःखाचीकायमात । परचक्रेकींभयाभित । सांगावेंमजत्वरेनें ॥७७॥
आज्ञामात्रेकरुन । पृथ्वीसमस्तजिंकीन । शिर आनंदेंआर्पीन । दुःखनाशार्थ आपुल्या ॥७८॥
पुत्रवाक्य ऐकिलें । लज्जायुक्तनृपबोलें । एकपुत्रेनसंतोषले । चित्तमाझेंशूरवीरा ॥७९॥
एकटाजरीयुद्धांतरी । पडतांमजदुःखभारी । दुजानसेसहकारी । बंधुतुजपुत्रारे ॥८०॥
मंत्रीमुखेंभावजाणुनी । गंगापुत्रयेदाशसदनी । म्हणेममपित्यालागुनी । अर्पणकरीहीकन्या ॥८१॥
दाशह्मणेंराजसुता । तूचिवरीहीकांता । पितरेंईशिंवरिता । तीचेसुता राज्यनसे ॥८२॥
पुत्रम्हणेहीमममाता । पित्यासीदेईतत्वता । राज्यादिधलेंइच्यासुता । कदांकाळींनकोमज ॥८३॥
निषादम्हणेसत्यवचन । परीतवपुत्रबलवान । होताकली दारुण । होईलकीराज्यार्थ ॥८४॥
पुन्हावदेगंगासुत । विवाहनकरीमीसत्य । अर्पिकन्यापित्याप्रत । भीष्मप्रतिज्ञाजाणिजे ॥८५॥
प्रतिज्ञाएवंवदला । तेणेंभीष्मनामपावला । दाशकन्याशंतनुला । प्राप्तझालीयेणेंपरी ॥८६॥
कुमारपणींव्यासजनन । नेणेराजाअथवाजन । सत्यवतीधर्मपत्नीहोऊन । राज्यसदनींवसतसे ॥८७॥
दोन पुत्रतीसजाहले । चित्रांगदचित्रवीर्यवहिले । पंचत्वप्राप्तझाले । शंतनूसतेधवा ॥८८॥
राज्यींस्थापिलेंचित्रांगदा । भीष्मरक्षींसर्वदा । काशीराजगृहीएकदा । स्वयंवर ऐकिलें ॥८९॥
एकलाचिभीष्मजाऊन । सर्वराजेजिंकून । कन्याआणिल्यातीन । अंबाअंबिकाअंबालिका ॥९०॥
अंबाआणिअंबिका । दोघीकेल्याउभयपुत्रका । तिसरीतीअंबालिका । शाल्वाकडेनिघाली ॥९१॥
शाल्वेंनकेलाअंगिकार । भीष्मापाशींआलीसत्वर । ह्मणेमाझापाणिग्रहकर । नकरीभीष्मब्रह्मचर्ये ॥९२॥
तीदुःखेंसेवीवन । तप आचरली दारुण । शिववरेंपुरुषहो उन । मीष्मसमरींपाडिला ॥९३॥
शिखंडीनामेंयुवती । कथाविस्तारभारती । सूचनार्थकिंचित्प्रति । दीधलीयेथेंश्रोतयां ॥९४॥
पुत्राचेंमरन ऐकूनी । दुःखकरितसेजननी । भीष्मेंतीससमजाउनी । विचित्रवीर्यस्थापिला ॥९५॥
तयासी राजयक्ष्माहोउन । पावलातेव्हांतोहीमरण । जाहलेंजेव्हांवंशखंडन । भीष्मासिमाता संबोधी ॥९६॥
ह्मणेदोनीभार्याघेऊन । भीष्मागार्हस्थ्यकरुन । करुनीवंशोत्पादन । राज्यकरीपुत्रका ॥९७॥
भीष्मह्मणेमाझापण असत्यनोहेकदाजाण । आमंत्रूनयोग्य ब्राह्मण कुलवृद्धीकरावी ॥९८॥
मगकुमारपणीचासुत । भीष्मानुमतेंतयास्मरत । प्रगटझालाशुकतात । नमस्करीतमातेशी ॥९९॥
मातृआज्ञेकरुन । व्यासकरीस्त्रीगमन । अंबाव्यासाशीपाहून । नेत्रझांकीभयाने ॥१००॥
ह्मणोनीअंधझालासुत । अंबिकाहीखिन्नहोत । पांडुरवर्णतेव्हांहोत । पुत्रपंडुजाहला ॥१॥
दासीनेंहावभावकरुन । व्यासकेलाप्रसन्न । विदुरपुत्र अतिसुगुण । धर्मांशेकरुनीजन्मला ॥२॥
श्रेष्टपरीअंध असे । राज्यकर्ण्यायोग्यनसे । भीष्मेंसर्वमतेंऐसें । जाणूनिपंडुस्थापिला ॥३॥
गांधारराजकुमारी । नामेंअसेगांधारी । धतराष्ट्राचीनोवरी । महासतीतीह्मणवे ॥४॥
शूरसेनाचिदुहिता । कुंतिभोजपालीतत्वता । दुर्वासासितिणेंसेविता । मंत्रदेतदुर्वास ॥५॥
सांगेकुंतीसदुर्वास । येणेंमंत्रेंज्यादेवास । स्मरतांतोचितवकार्यास । करीलप्रत्यक्षयेउनी ॥६॥
ऋषीगेलानिघूनी । बालभावेंविचारीमनीं । सत्यासत्यपरिक्षेवांचुनी । स्वस्थचित्तनव्हेची ॥७॥
मगएकांतीजाउनी । सूर्यासीस्मरेमंत्रह्मणोनी । स्मरतांचविप्रवेषेंतरणी । तरुणीसंनीधपातला ॥८॥
संबोधेवरदेउनी । निघूनगेलातीसभोगुनी । एकासखीवांचुनी । नेणेंकोणीवरदानें ॥९॥
महालींअसेगर्भवती । प्रसवलीपुत्रसूर्यकांती । कवचकुंडलस्वांगधृती । पाहूनितीससुखदुःख ॥१०॥
म्हणेऐसेंहेंपुत्ररत्न । परीमीतोदैवहीन । कळवितांकलंकदारुण । दोनीकुळालागेलकी ॥११॥
फुटलेमाझें कपाळ । टाकूनीदेणेंऐसाबाळ । अवश्यकर्मप्रबळ । भोगावांचूननसुटे ॥१२॥
मग आणोनीपेटी । बाळठेविला अंतःपुटी । प्रार्थुनीअंबेसीगोमटी । गंगेंतसोडिलाअतिदुःखें ॥१३॥
स्नानकरोनिआलीघरा । कोणीनजाणेंविचारा । हीचिझालीपंडुदारा । दुजीमाद्रीमद्रकन्या ॥१४॥
अधिरथनामेंनिषादासी । पेटीलाधलीपरियेशी उघडितांपाहेपुत्रासी आनंदपोटींनसमाये ॥१५॥
राधानामेभार्येषी । आणूनदीधलातियेशी । म्हणेमजनिपुत्रिकासी । पुत्रदीधलागंगेनें ॥१६॥
राधालावीआपुल्यास्तना । सवेंचफुटलाप्रेम पान्हा । दैवसर्वत्रयोजना । करीतसेआपण ॥१७॥
राधेयनामझालेंत्यासी । प्राप्त झालाकर्णधाराशी । म्हणोनिनामबाळाशी । कर्ण ऐसेंजाहलें ॥१८॥
शतपुत्रगांधारीस । जाहलेदुर्योंधनादिकलिभास । दुःशिलानामकन्येस । गांधारीच्याजाहले ॥१९॥
वेश्यापुत्र अंधास । युयुत्सुनामदीधलेंत्यास । पांडुकरीमृगयेस । गंधमादनीसदावसे ॥२०॥
मृगयाकरितांएकेदिनीं । मृगरुपेंएकमुनी । क्रीडाकरितांनृपानी । बाणमारिलानकळता ॥२१॥
नेणोनिमारिलासिबाण । ब्रह्महत्यानबाधेजाण । परीसुखसमईहरिण । धर्मिष्टराजेनमारिति ॥२२॥
केलासीआमचासुखघात । ह्मणेशापघेईत्वरित । स्त्रीआलिंगिशिमदोन्मत्त । मृत्यूतेव्हांचितुजग्रासो ॥२३॥
मरनपावलाशापूनी । पंडुअतिदुःखितहो उनी । उदासराहेगंधमादनीं । सेवार्थराहतीभार्यासवे ॥२४॥
धृतराष्ट्रासिनृपासन । देताझालागंगानंदन । विदुराप्रतिनिधीनेमून । विरक्तवतभीष्मवसे ॥२५॥
पडूह्मणेकुंतीस । वंशखंडत आपणास । पुत्रावांचूनिस्वर्गवास । प्राप्तनोहेकदापि ॥२६॥
धर्मशास्त्रींमीऐकिलें । पुत्रावांचोनिगतीनमिळे । पुत्रकीजेयुक्तिबळें । जाणादेशप्रकारें ॥२७॥
श्लोक । यस्तल्पजप्रमीतस्यक्लीबस्यव्याधितस्यवा । स्वधर्मेणनियुक्तायांसपुत्रःक्षेत्रजस्मृत इतिमनुः ॥१॥
अमृतेजारजः कुंडोमतेभर्त्तरिगोलकः । सहोढोगर्भिणींनारींपरिणीयसुतोभवेत् ॥२॥
कानीनःकन्यकाजातोक्रीतोमौल्येनप्राप्यतो । वनेप्राप्तेवनस्येतिदतकोदेशस्मृतः ॥३ मनुः॥
स्वांशजस्वस्त्रीयेशी । होयतो प्रथमगुणराशी । कन्यापुत्रविशेषी । दुसराजाणनिश्चयें ॥२८॥
परपुरुषींपतीनें योजिलीअसतांन्यायानें । क्षेत्रजपुत्रतोजाणे । मनुवाक्येंतीसरा ॥२९॥
पतिमरणानंतर । पुत्र उपजवीजीनार । गोळकहाचौथाप्रकार । पांचवापुत्रश्रवणकीजे ॥३०॥
पतीअसतांघरी । जारकर्मकरीनारी । पुत्रहोतातीचेउदरीं । कुंडनामतयाचें ॥३१॥
गर्भिणीशीलग्नकेलें । घरींयेतांमूलझालें । सहोढनामठेविलें । साहवापुत्रऋषीह्मणती ॥३२॥
कन्याअसतांपुत्रझाला । तोकानीनम्हणविला । विकतजोघेतला । क्रीतपुत्र अष्टम ॥३३॥
नववासांपडेवनीं । दहावादत्तकदिलाकोणी । एवंपुत्रावांचोनी । इहपरनसेंसुख ॥३४॥
तरीत्वांममवचनें । पुत्राकीजेउन्नत । जेणेंसोमवंशखंडन । नहोयतेंकरावें ॥३५॥
पतिआज्ञामिळताकुंती । मंत्रेस्मरेधर्माप्रती । पुत्रजाहलाअतिख्याती । युधिष्ठिर धर्मराज ॥३६॥
द्वितीयवर्षीमारुत । आणोनाप्रसवलीसुत । भीमझालाअतिख्यात । इंद्रास्मरेतीसर्यानें ॥३७॥
तयापासाव अर्जुन । झालानराश आपण । पतीचेअनुमतानें । मंत्रदीधलामाद्रीशी ॥३८॥
तीणेंस्मरलेअश्विनीकुमार । दोनपुत्रजाहलेसुकुमार । पांच पुत्रपांडुसमोर । दोघीमध्येंजाहले ॥३९॥
कालवशे एकांती । माद्रीसपाहूननृपती । शापेंभूलपडलीचित्तीं । कामातुरजाहला ॥४०॥
माद्रीकरीनिवारण । परीमारकझालापंचबाण । दीधलेंमाद्रीस आलिंगन । गतप्राणपडियेला ॥४१॥
हाहक्कारमाद्रीकरी । कुंतीपातलीझडकरी । पाहूनिआक्रोशकरी । ऋषीसर्वमिळाले ॥४२॥
संस्कारकेला ऋषिजनीं । माद्रीनिघालीसहगमनीं । पुत्रकुंतीप्रतदेउनी । गेलीमाद्रीपतीसवें ॥४३॥
उद्युक्तहोतिकुंति । परीऋषीनिवारिती । संरक्षावेपुत्राप्रती । सहगमननकरावे ॥४४॥
मातेसहपांचकुमर । ऋषींपोंचवितीहस्तनापुर । देवीसाक्षदेतानिर्धार । भीष्मेंतेव्हां अंगिकारिलें ॥४५॥
पांचपांडवाएकनारी । द्रौपदीपरमसुंदरी । पार्थपत्नीमनोहरी । कृष्णभगिनीसुभद्रा ॥४६॥
अभिमन्यूतीचासुत । विराटकन्याविवाहित । तीचागर्भसंरक्षित । स्वयेंकृष्णचक्रधर ॥४७॥
तोजाहलापरिक्षिती । पांडवतेव्हांराज्यकरिती । छत्तीसवर्षेंन्यायरीती । धर्मेंभोगिलेंसाम्राज्य ॥४८॥
धृतराष्ट्रराहेघरीं । भीमनित्यझिडकारी । धर्मवृद्धाचीसमजीकरी । भीममूर्खह्मणोनिया ॥४९॥
धृतराष्ट्रह्मणेयुधिष्टिरा । जरीद्रव्यदेसीमाझेंकरा । सर्वपुत्रासिनिर्धारा । सांपरायिककरीनमी ॥५०॥
धर्मघेईचौघांचेंमत । भीमतेव्हांनाहींम्हणत । पूर्वकर्म आठवीत । संतप्तफारजाहला ॥५१॥
धर्मेंविदुराचियामतें । द्रव्यदीधलेंअंधातें । भीमाकळोनदेतीते । अर्जुनादिबांधव ॥५२॥
अष्ठादशवर्षेपर्यंत । अंधारराहिलाघरांत । विदुराचेंघेऊनमत । तपोवनाचालिला ॥५३॥
गांधारीआणिविदुर । कुंतीनिघालीसत्वर । धर्मादिपांचीकुमर । शोकसमुद्रींबुडाले ॥५४॥
पुत्राचेउत्तरकरुनी । संजयासहकाननीं । शतयुपाश्रमसंनिधानी । करोनीकुटीराहिले ॥५५॥
साहावर्षेंझालीजाउनी । धर्म उत्सुकमातृदर्शनी । सर्वांसहगेलावनीं । नमस्कारिलेवुध्धसर्व ॥५६॥
विदुरतेथेंनदिसे । धर्मधृतराष्ट्रासिपुसे । अंधसांगेविरक्त असे । ध्यानस्थ फिरेसुखानें ॥५७॥
गंगातीरींदुजेदिवसी । धर्मपाहेविदुरासी । नमस्कारोनिचरणासी । म्हणेमीयुधिष्ठिरवंदितो ॥५८॥
तवतोनबोलेचिकांहीं । काष्ठपाषाणसमदेही । ज्योतीनिघूनधर्मदेही । धर्मांशातलीनझाला ॥५९॥
विदुरगतप्राणझाला । धर्मशोकेंआहाळला । देहदाहाचाविचारकेला । तोजाहलीनभोवाणी ॥६०॥
मुक्तझालासेविदुर । दाहानाहीं अधिकार । ऐकूनीपरतेयुधिष्ठिर । मातेजवळीबैसला ॥६१॥
जेसर्वमृतजाहले । व्यासेंपुन्हादाखविले । धर्मादिकपरत आले । तवजाहलीयादवी ॥६२॥
मधुपुरीतवज्रस्थापिला । परिक्षितीराजाकेला । पांचासहधर्मगेला । उत्तरपथेस्वर्गाशीं ॥६३॥
सव्वीस आणि तीनशत । श्लोकसर्वशंतनूचरित । महाराष्ट्रीयभाषेत । वर्णनकरीपरांबा ॥६४॥
देवीविजयेद्वितीयस्कंदेद्वितीयोध्ययः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP