द्वितीय स्कंध - अध्याय चवथा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । सूतसांगेऋषीप्रती । व्यासह्मणेऐकनृपती । पित्याचीजेणेंसदगती । होय ऐसेसांगतो ॥१॥
पुराण असेभागवत । नानाआख्यानेंसुरसबहूत । पूर्वींपढवीलें शुकाप्रत । परमगुह्य ऐकतें ॥२॥
धर्मादिपुरुषार्थचारी । श्रवणेंलाधतीकरी । सदगती दायकपावन ॥३॥
जनमेजयह्मणेकृष्णाशी । कोण आलाजीतापसी । केलेंतेणेंसर्प रक्षणासी । कारणकायसांगावे ॥४॥
सांगावेमजभागवत । जेणेंनासेलदुरित । जो उत्तमलोकप्राप्त । होयजेणेंपित्याशीं ॥५॥
व्यासवदेनृपासी । जरत्कारुमहातापसी । अतिनिस्पृहफिरेवनाशीं । लोंबतीपितरदेखिलें ॥६॥
तेह्मणतीआमच्यासुता । तूं विवाहकरीआतां । तेव्हांआम्हातृप्तता । स्वर्गवासमिळेल ॥७॥
जरत्कारुम्हणे समान । नामरुपाचीकरीन । जरीराहीवश्यहोऊन । विवाहतरीकरीनमी ॥८॥
सांगोनिऐसेवच्न । आनंदेफिरेवनोपवन । इकडेस्त्रीप्राप्तींचेंकारण । ऐकानवलचरीततें ॥९॥
कश्यपाच्यादोनकांता । एककद्रुएकवनिता । सहजवनींहिंडतां । सूर्याश्वपाहूनबोलती ॥१०॥
अश्वगौरसांगेविनता । कद्रूह्मणेकर्बुरता । सर्पाशीसांगे एकांता । सूर्यवाजीकृष्णकीजे ॥११॥
रवितापभयेंकरुन । जैंनमानिलेंवचन । माताशापीतयालागुन । दहनव्हाल अग्नींत ॥१२॥
नऊशेंनव्यांणवकुळेंहोती । नऊकुळेंवाक्यमानिती । तेवढीचवाचलीक्षिती । जळालीसर्वसर्पसत्रीं ॥१३॥
कर्बुरपाहूनिवाजीसी । विनताहोयकद्रुदासी । गरुडम्हणेमातेसी । सोडवीनदासीभाव ॥१४॥
सर्पासहसर्पमाता । गरुडवाहेतत्वता । कद्रूसहसागर उल्लंघिता । सुप्रसन्नपाहिली ॥१५॥
गरुडेंकद्रुनमूनी । म्हणेमातेकोणेंउपायानी । मममातादासीभावांतुनी । सुटेलतेसांगसत्य ॥१६॥
कद्रूसांगेआणीअमृत । ममपुत्राजरीदेत । दास्यत्वतेव्हां नासत । सत्यजाणगरुडातूं ॥१७॥
गरुडेंस्वर्गींजाउन । देवासर्वापराभ उन । अमृत घट आणून । सर्पालागीदीधला ॥१८॥
दासीभावगेलादुरी । सर्पासीझालाहर्षभारी । स्नानार्थजातीसत्वरी । अमृतप्राशन इच्छेनें ॥१९॥
घटनेलापुरंदरें । सर्पयेतीअतित्वरें म्हणतीघातकेलातस्करें । अमृतनेलेदैवगती ॥२०॥
घटहोतादर्भावरती । म्हणोनि दर्भचाटिती । चिरुनीजिव्हादोनहोती । सर्पझालेद्विजिव्ह ॥२१॥
तेशापभयेंकरुन । ब्रह्मदेवागेलेशरण । विधिसांगेवासुकीचिबहिण । जरत्कारुसीदेईजे ॥२२॥
ब्रम्हवाक्येंजरत्कारी । वासुकीनेऊनिवनांतरीं । प्रार्थुनिदीधलीनोवरी । जरत्कारुसीतेधवा ॥२३॥
तोम्हणेआज्ञामोडिता । कांहींअपराधघडता । टाकुनजाईनपरता । अवश्यम्हणेवासुकी ॥२४॥
राहेऋषीगृहकरोनी । अवसरपाहेगमनी । परिनचुकेतीसेवनी । जरत्कारीपतिव्रता ॥२५॥
भोजनानंतरएकेदीवशीं । ऋषीनिजलासावकाशी । सूर्य चालिलाअस्ताशी । संध्यासमयजाहला ॥२६॥
मनींविचारीपतिव्रता । संकटसमय आला अतां । निद्राभंगकरितां । मजटाकूनिजाईल ॥२७॥
नकरितांनिद्राभंग । तरी होयधर्मभंग । जेणेंराहेधर्म अभंग । उचिततेचिसर्वथा ॥२८॥
मनींऐसाकेलानिर्धार । सवेंचिजागवीभ्रतार । म्हणेसंध्येशीहोतो उशीर । उठाआतांप्राणपते ॥२९॥
ऐकतांचिजागाझाला । म्हणेत्वांनिद्राभंगकेला । आम्हीजातोंवनाला । बंधुगृहींराहेतूं ॥३०॥
तत्काळचालिलाऋषी । दुःखजाहलेंस्त्रियेशी । म्हणेअर्पिलेंज्याकार्याशी । कार्यकेवींहोयते ॥३१॥
ऋषीम्हणेतेंआहे । कालेंकरुनतूंपाहे । बोलोनिगेलालवलाहे । घरांगेलीपतिव्रता ॥३२॥
वासुकीससांगितलेवृत्त । कालेंकरुझालासूत । यायावरकुलो दभूत । आस्तीकनामजयाचे ॥३३॥
मोठाऋषीतपोधन । सर्पवाचवीलातेण । तुवांकेलासन्मान । उत्तमकेलेंराजेंद्रा ॥३४॥
भारतसर्व ऐकिलें । कुलासित्वांपावनकेलं । देवीमंदिरकीजेवहिलें । देवीयज्ञकरावा ॥३५॥
ऐकावेंहेंपुराण । स्वयेंतुजमीसांगेन । संबोधिलानारायण । येणेंमुळभागवती ॥३६॥
तीआदिमायाविश्वजननी । कृपकटाक्षेजगपालनी । रुद्ररुपेंसर्वहारिणी । कृपाकरीलभूपाळा ॥३७॥
पित्याशीहोईल सदगती । तुझीवाढेलसुकीर्तीं । पसरेलकुळाचीसंतती । पठणश्रवणेंकरुंनिया ॥३८॥
चौसष्ठश्लोकसुंदर । आस्तीकजन्ममनोहर । वदलीअंबाभाषांतर । स्कंदसमाप्त दुसरा ॥३९॥
देवीविजयेद्वितीयस्कंदेचतुर्थोध्यायगोडहा ॥४॥
॥ इति द्वितीयस्कंदः समाप्तः । श्री आंबापर्णमस्तु । शुभंभवतु ॥
द्वितीय स्कंद समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP