द्वितीय स्कंध - अध्याय तिसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । राजाजाहलापरीक्षित । पितृवध्धर्मनिरत । साठवर्षेपर्यंत । राज्यकेलेंसुखानें ॥१॥
एकेदिवसींगेलावनीं । एकलाचफिरेकाननीं । तृषालागलीमंध्यांनी । शुष्ककंठजाहला ॥२॥
ध्यानस्थदेखिलामुनी । नृपमागेतयापाणी । तयापाहूनिमौनी । सुचलीकुबुद्धीकलिदोषें ॥३॥
मृतसर्पएकदेखिला । धनुष्कोटीनेंउचलिला । ऋषीचेगळांघातला । स्वगृहींगेलासवेची ॥४॥
ऋषिपुत्रासीकळलें । क्रोधेतेणेंशापिलें । जेणें पित्यासीहेळिले । सप्तमदिवसींमरेल ॥५॥
तक्षकदंशेकरुन । अवश्यहोईलतयामरण । तोशापपरमदारुण । नृपाकळवितीऋषिपुत्र ॥६॥
ऐकतांचिनृपेंतेवेळीं । बैसोनिआमात्याचेमेळीं । ह्मणेआलामृत्युजवळी । परीउपायकाज अवश्य ॥७॥
उगेचदैवम्हणोनी । बसतांहोईलप्राणहानी । उद्योगकरितांझणी । वाचलाकीप्रमद्वरा ॥८॥
प्रश्नकरितीप्रधान । सांगातीचेंआख्यान । मृत्यूचेमुखांतून । केंविकाधिलीउद्योगें ॥९॥
रावम्हणेभ्रुगुनंदन । जाहलाजोपुलोमेपासून । तेजस्वीतोच्यवन । सुकन्याभार्यातयाची ॥१०॥
शर्यातिराजकुमरी । बळेंच्यवनतीशिवरी । तिजपासूननिर्धारी । प्रमतीपुत्रजाहला ॥११॥
प्रमतीस्त्रीमनोहर । प्रतापीसजाहलाकुमर । रुरुनामकेलेंसत्वर । प्रमतीनेंपुत्राचे ॥१२॥
विश्वावसुगंधर्वापासुनी मेनकाझालीगर्भिणी । स्थूलकेशऋषीचेसदनीं । गर्भटाकोनिगेलीती ॥१३॥
तीकन्यापरमसुंदर । तिजलारक्षीऋषेश्वर । एकदातीसुकुमार । क्रीडतसेउपवनीं ॥१४॥
उपवरतीतरुणीजाहली । रुरुनेंतिजलापाहिली । वृत्तीमदनेंतन्मयकेली । प्रमद्वरास्वरुपांत ॥१५॥
निजलाघरीयेऊनी । नऊठेनजायभोजनी । पिताविचारीयेउनी । समाचारवदेतो ॥१६॥
म्हणेऋषिकन्याप्रमद्वरा । तीअसावीमजदारा । नातरीप्राणनिर्धारा । स्थीरनोहेकदापी ॥१७॥
ऐकूनसुताचेंवचन । स्थूलकेशाप्रतीजाऊन । मोहकवाक्येंबोलून । पुत्रार्थमागेकन्यका ॥१८॥
स्थूलकेशेवाक्यमानिलें । विवाहसंभारकरुंलागलें । रुरुचेचित्त आनंदलें । तवओढावलेंदुर्दैव ॥१९॥
पायपडूनसर्पावरी । सर्पदंशेतीनारी । मरणपावलीक्षणांतरी । हाहःकारजाहला ॥२०॥
रुरुनेंऐकतांचमरण । तेणेंघेतलेउरबडवून । ह्मणेमीप्रारब्धहीन । मुकलोंआतांसंसारा ॥२१॥
उदकघेउनिहातीं । उभाराहे एकांती । ह्मणेदेवारमापती । धावपावयेवेळे ॥२२॥
आजवरीसंध्यापूजन । जेकेलेंगायत्रीसेवन । तेणेंपुण्येंकरुन । उठोभार्याप्रमद्वरा ॥२३॥
नातरीदेईनप्राण । रुरुकरीऐसापण । देवदूत आलातत्क्षण । म्हणेव्यर्थमरसीकां ॥२४॥
मेल्यामागेंमरणें । यांतकायतुजमिळणें । दुजीभार्याजाउनिकरणें । दुराग्रहनकरावा ॥२५॥
संबोधोनिदेवदूत । दृढ अंतःकरणदेखत । रुरुचेअर्धायुषेंत्वरित । उठवीतीसमयवाक्यें ॥२६॥
अतिआनंदलेऋषीजन । प्रमद्वरेचेंकरितीलग्न । रुरुतिजसहवर्तमान । सुखीनांदेस्वगृहीं ॥२७॥
सूतम्हणेहोऋषीजन । परीक्षितीएवंवदून । महालपाहूनसातखण । मंत्र्यासहवरीबैसे ॥२८॥
रक्षकठेविलेचतुर । मणिमंत्रादिजाणणार । रीघनोहेतेथवर । कोणाचीहीकदापि ॥२९॥
स्नानसंध्याभोजन । तेथेंचकरीउत्तरानंदन । दिवसमोजीसावधमन । सर्पभयेशापभये ॥३०॥
कोणीकश्यपनामेंद्विजवर । मंत्रवेत्ताधुरंधर । राजशाप ऐकुनीसत्वर । नागपुराचालिला ॥३१॥
वृध्धविप्रहोऊन । कश्यपाजवळीयेउन । विनयेनमस्कारकरुन । तक्षकपुसेतयासी ॥३२॥
कोणतुह्मीकोठेंजाणें । अवश्यकार्यकायकर्णे । कृपेनेंमजसांगणें । त्वराफारदिसेकीं ॥३३॥
कश्यपह्मणेकरुनिपरार्थ । साधावगृहस्थेंस्वार्थ । सर्पदंशेपरिक्षित । विप्रशापेमुमुर्षूं ॥३४॥
तेंविषमीउतरीन । राजासिमंत्रेउठवीन । प्रजासवआनंदवीन । धनहीतेव्हांबहुलाभे ॥३५॥
तोसर्पमीचब्राह्मणा । तक्षकसकलनागराणा । तवमंत्रशक्तिधारणा । विषमाझेंनायके ॥३६॥
पाहूंतुझमंत्रबळ । दग्धकरितोंवटसमूळ । जरीजीवविशितत्काळ । तरीजावेंनागपुरा ॥३७॥
तक्षकेंएवंवदून । तत्काळसर्प होऊन । वटडंखिलाजाउन । भस्मकेलातत्क्षणी ॥३८॥
कश्यपह्मणेतक्षकासी । पहामाझेंमंत्रबळाशी । मगतेणेंकेलीभस्मराशी । जळमंत्रूनसिंचलें ॥३९॥
सवेचिवट उभारिला । पूर्वरुपेंतैसाचिठेला । पाहूनियाचकितझाला । तक्षकतेव्हांकायम्हणे ॥४०॥
तवसामर्थ्य अपार परीब्रह्मशाप अनिवार । इच्छितघेऊनीद्रव्यभार । धराजाइजेआपुल्या ॥४१॥
गतायूनृपाजाणुनी । धनतक्षकापासावघेउनी । ब्राह्मणगेलापरतोनी । तक्षकयेईगजपुरा ॥४२॥
रीघनसेजावयावरी । ऋषीरुपेंकेलीसर्पवरी । तक्षकशिरेंफलांतरी । कीटकरुपेंदुर्धष ॥४३॥
दूतहस्तेंपुष्पेंफलें । परीक्षितेंअंगिकारिलें । एकेकफलसर्वादीधल । एक आपणस्वयेंघेई ॥४४॥
तोसप्तमदिनसायंकाळ । परीक्षितेंविदारिलेंफळ । तवकीटपाहिलालघुकेवळ । रक्तनत्रभासती ॥४५॥
रावह्मणेसप्तदीन । आतांचिजाहलेपूर्ण । सत्यव्हावातोचिब्राह्मण । कीटाचियास्पर्शमात्रें ॥४६॥
कालवशनृपमोहित । स्वयेंकीट उचलीत । स्वकंठासीलावित । भविष्यतेचिहोतसें ॥४७॥
कंठस्पर्शतानाग । प्रगटलामहाभुजंग । दंशकरुनसवग । राजदेहवेष्ठिला ॥४८॥
रावजाहलागतप्राण । तक्षकगेलाउडोन । आक्रोशतीमंत्रीजन । अनर्थझालाम्हणोनी ॥४९॥
संस्कारसर्वजाहले । पदीजन्मेजयास्थापिलें । राज्यसर्वचालविलें । मंत्रिवर्गमिळूनिया ॥५०॥
जन्मेजय असेसान । धात्रीशिकवीराजलक्ष्मण । एकादशवर्षेंहोतापूर्ण । हलें ॥५१॥
कृपाचार्येंपढविलें । धनुर्वेदादिसांगकथिले । सुवर्णवर्मेकाशी नृपाळें । कन्यादीधलीवपुष्टमा ॥५२॥
बुद्धीबलपराक्रमी । जनमेजयामोठानियमी । निपुणझालानीतिकामी । जैसादुजायुधिष्टिर ॥५३॥
तक्षकाचेंवैरस्मरुन येईउत्तंकरा जभुवन । ह्मणेनृपातूंअज्ञान । कार्याकार्यजाणसी ॥५४॥
नऋधनाअभिमान । क्रीडा करिसीबाळासमान । कायप्रार्थावेतुजलागुन । ऐकुनिरावबोलिला ॥५५॥
कर्णेतेंकायनकेलें । नकर्णेतेंकाय अंगिकारिलें मजसांगावेंस्वामीवहिलें । करीनमगयथोचित ॥५६॥
तक्षकेंमारिलाममपिता । उत्तंकसांगेपरिक्षिता । कळलेंमंत्र्याविचारिता । अप राधकायरावह्मणे ॥५७॥
उत्तंकम्हणेमांत्रिक । द्रव्यदेऊनीफिरवीतक्षक । वैरीनव्हे कींपितृघातक । सूडपित्याचानघेशी ॥५८॥
सर्पेरुरुस्त्रीडंखिली । तेव्हांरुरुनप्रतिज्ञा केली । नाशिनसर्पाचीकुळीं । शस्त्रघेउनींवनीफिरे ॥५९॥
अजगरम्हणेरुरुशी । निरपराधीकांमारिशी । हिंसाकरणेंपापराशी । निंद्य असेकींबहुवस ॥६०॥
रुरुह्मणे तूंकोण अससी । मनुष्यापरीबोलसी । स्त्रीदंशेसर्पवैरासी । धरुनीकेलीप्रतिज्ञा ॥६१॥
डुंडुभह्मणेतीजाति । नाहींजाणमजप्रती । शापयोगेंअजगरगती । पावलोंमीब्राह्मणा ॥६२॥
तृणसर्पकरुनी । टाकिलाआंगावरीनेउनी । मगविप्रेंदचकुनी । शापिलेंमजक्रोधभरें ॥६३॥
म्हणेतूंहोय अजगर । वनींराहसीमहाक्रुर । रुरुभेटतांशापदूर । होसीह्मणुन उःशापिले ॥६४॥
तूंराजाअसून । नेणसीवैरकंदन । मिषकरोनिअंबायज्ञ । सर्पसत्रकरावे ॥६५॥
ऐकूनिउत्तंकवचन । रावकरीदुःखेंरुदन । धिक् पुत्रमी उपजून । पितृउध्धारनहोता ॥६६॥
आज्ञापूनिमंत्रियाशी । मेळ उनिसर्वसंभाराशी । आरंभिलेयज्ञाशी । अध्वर्यूतेथेंउत्तंक ॥६७॥
अनेकसर्पांचीकुळें । कुंडींपडतींमंत्रबळें । अनेकसर्पदग्धकेले । त्रातांकोणीनसेची ॥६८॥
तक्षक अतीभयेकरुन । इंद्रासिगेलाशरण । इंद्रासहतक्षकाव्हान । उतंककरीतेधवा ॥६९॥
डळमळेंइंद्राचेंआसन । घाबरले तेव्हांदोघेजण । आस्तीकाचेकेलेस्मरण । तक्षकेंतेवेळीं ॥७०॥
स्मरतांचिआस्तिकमुनी । परिक्षितासीप्रार्थुनी । यज्ञसमाप्तकर उनी मुनीगेलायथेच्छ ॥७१॥
भारत ऐकिलेंसकळ । परीनगेलीतळमळ । व्यासापुसेतोनृपाळ । गतीकेवीपित्याची ॥७२॥
दोनशतश्लोकचौतीस । पारीक्षितचरित्रास । स्वयेंबोलीलावेदव्यास । तेंचयेथेंवर्णिले ॥७३॥
देवीविजयेद्वितीयस्कंदेतृतीयोध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP