अष्टम स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सूर्यासमदैवत । दुजेंनसेंजगांत । प्रत्यक्षसर्वासीदिसत । तेजोमयब्रम्हहें ॥१॥

अरुप अव्ययकालासी । मापूनदावीसर्वांसी । विपलपलघटीसी । मुहूर्तयामदिनादिकें ॥२॥

रात्रदिनतेआठप्रहर । पक्षमासऋतुकर । अयनदोनसंवत्सर । युगसंख्यामोजणी ॥३॥

एवंकरुनिअवयव । कालाचेकळवींवैभव । ऐसाहाप्रत्यक्षदेव । परीनेणतीजीवहे ॥४॥

जेणेंनासुनितम । प्रकाशकेलासुगम । जयाशीस्तवितीनिगम । आत्माहाचम्हणोनि ॥५॥

हेंसर्वचराचर । प्रभारुपेंपरमेश्वर । सर्वह्रदईंकरुनिसंचार । चैतन्यदेईंनित्यजो ॥६॥

जंगम आणिस्थावर । सूर्योदयींव्यापार । करीतसेनिरंतर । जयासूर्याचेनियोगें ॥७॥

यज्ञकर्मधर्माधर्म । प्रवर्तमानेंहोयशर्म । सृष्टीचेंकारणवर्म । नारायणप्रत्यक्षहा ॥८॥

स्वकीरणयोगेंतापवी । जलवर्षूनभिजवी । स्वकिरणेंचिनिपजवी । अन्नसमस्तकृपेनें ॥९॥

अंन्नापासूनरेत । रेतापासूनजीवजात । तेंअन्नजोनिपजवीत । तोचिसूर्यसर्वकर्ता ॥१०॥

अन्नदानेंकरीपालन । सूर्ययोगेंसर्वांभोजन । चराचरतृप्तकरुन । अस्ताजायलोकभर्ता ॥११॥

कालाचेअवयवदर्शन । हेंच आयुष्याचेंहरण । सर्वांसीकरीतसेलीन । कालात्मातोविश्वहर्ता ॥१२॥

एवंकर्मत्रयकरी । आपणवेगळाउर्वरी । लिप्तनसेकर्मपूरी । तेणेंनिर्गुणम्हणतीत्या ॥१३॥

सगुण आणिनिर्गुण । तोचिसूर्यनारायण । गायत्र्याक्षरेस्तवन । याचेचकेलेंनिगमानी ॥१४॥

त्रिगुणाच्यानाभीतीन । रथचक्र अतिप्राचीन । जयामाजिविश्वसंपूर्ण । ग्रथनकेलेभास्करें ॥१५॥

ज्यासम्हणतीशिशुमार । वरीविराजेरथसुंदर । अश्वजुंपिलासमोर । सप्तमुख अभिनव ॥१६॥

अरुणज्याचासारथी । स्वयेंमित्रझालारथीं । वालखिल्यादिस्तवकरिती । सर्वचक्षुपरमात्ता ॥१७॥

करितांजयानमस्कार । निरोगकरीशरीर । धर्मांदिपुरुषार्थचार । समर्पितभक्ताशी ॥१८॥

सर्वांचेचहेंदैवत । परीब्राम्हणामूख्यम्हणत । प्रणवरुपप्रणवातीत । सूर्यसत्यपरमात्मा ॥१९॥

आसनजयाचेंकमल । किरीट आणिकुंडल । सुवर्णकांतीतेजाळ । शंखचक्रधरद्विभुजजो ॥२०॥

एवंनमुनिनारायण । देवीभागवतपुराण । अष्टमस्कंदाचेवर्णन । पाहूंआतांप्रेमभरे ॥२१॥

जन्मेजयम्हणेबादरायणा । मन्वंतरेसर्ववर्णा । तैशीचदेवीआराधना । कोठेंकोठेंकशीकशी ॥२२॥

विराटरुपाचिस्थिति । विस्तारेंसांगामजप्रती । जेणेंहोयमाझीगती । सूक्ष्मरुपेंदेवीच्या ॥२३॥

ऐकुनतयाचेवचन । वदेतेव्हांबादरायण । नारदावदलानारायण । तेचिसांगतोतुजलागी ॥२४॥

स्वयंभूचास्वायंभूसुत । शतरुपापतीविख्यात । मनुप्रथमपृथ्वींत तोचिझालानारदा ॥२५॥

पित्याचेआज्ञेकरुन । तोकरीदेवीआराधान । सर्वांमाजीमहाकारण । महामायास्तवीतसे ॥२६॥

नमुंमाताजगत्कारिणी । दरारिगदावरधारिणी । वेदमूर्तीनारायणी । ह्रदयवासिनीनमोस्तु ॥२७॥

वेदत्रयाचिप्रमाणें । तुजठावींआदिकारणें । नमितीदेवतुजभेणें । महेश्वरीजाणुनी ॥२८॥

महाभागेमहामाये । महानंदेमहोदये । मातेमहादेवप्रिये । नंदप्रियेनंदजे ॥२९॥

महोत्सवेमहामारी । देवपुज्येभयहारी । ज्येष्ठेमहादेवप्रियकरी । सर्वमंगलमंगले ॥३०॥

शिवेसर्वार्थदायिनी । शरण्येगौरीनारायणी । त्र्यंबकेत्रिपुरहारिणी । कालकालेनमोस्तु ॥३१॥

दृश्यजेवढेंजगत । तुजमाजिओतप्रोत । चैतन्यएकसर्वांत । तेजरुपतुझेची ॥३२॥

ब्रम्हाविष्णुआणिहर । कर्ताभर्ताहर्ताहर । तवयोगेंचिनिरंतर । योग्यझालेतिघेही ॥३३॥

लज्जागिरिजाकमलासती । कीर्तिस्मृतीअभयाकांती । दाक्षायणीवेदवती । स्तवूंपूंजूंनमूंतूंतें ॥३४॥

जपभावनाआणिध्यान । तुझेंचकरुंकीर्तन । आतांव्हावेंप्रसन्न । सर्वात्मकेअंबिके ॥३५॥

नारदासांगेनारायण । एवंकरितांस्तवन । परांबाझालीप्रसन्न । मनुसिवांछितमागम्हणे ॥३६॥

मनुम्हणेप्रजोत्पादन । सदाअसोनिर्विघ्न । तथास्तुऐसेम्हणून । गुप्तझालीपरेशी ॥३७॥

मनुगेलाविधीपाशी । स्थानदेम्हणेमजसी । विधीचिंतीतमानसी । केवींआतांकरावे ॥३८॥

धरागेलीरसातळी । असुरमाजलासेबळी । साह्यकरीलयेवेळीं । नारायणजरीमज ॥३९॥

एवंविधीकरीविचार । तोअंगुष्ठमात्रसूकर । विरंचिचेनासाद्वार । आंतूनसन्मुखपडियेला ॥४०॥

क्षणाएकतयापाहती । तवझालागजाकृती । मरीच्यादितर्ककरिती । नवलकाय असेहें ॥४१॥

विरंचीमनींविचारी । विष्णुचकीप्रगटेंजरी । दुःखमाझेनाशकरी । तवनवलजाहले ॥४२॥

पर्वताकारदेहधारी । महावराहरुपेंहरी । भगवान्स्वयेगर्जनाकरी । हर्षवीतब्रम्हादिका ॥४३॥

महाशब्देंदिशाविदिशा । व्याप्तकेल्यानरेशा । घुर्घुरस्वनाजगदीशा । स्तवनकरीतीसर्वही ॥४४॥

जनतपसत्यवासी । देवस्तवितीदेवाशी । ऋग्यजुःसामाथर्वेशी । दिव्यस्तुतीकरितीते ॥४५॥

स्तुतीमात्रेंभगवान । तयाशींझालाप्रसन्न । करुनिकृपावलोकन । जलामाजीप्रवेशला ॥४६॥

सटाघायेंपीडित । समुद्रतेव्हांशरणांगत । रक्षीम्हणेमजप्रत । ऐकूनिहरीप्रवेशकरी ॥४७॥

शिरलाजलाचेंअंतरीं । चहूंकडेशोधीहरी । सुवासेंजाणूननिर्धारी । धराउचलीदंताग्रें ॥४८॥

यज्ञपुरुषयज्ञेश्वर । भगवान आदिसूकर । धराधरुनदंष्ट्रांकुर । गतश्रमठाकला ॥४९॥

ऐसादेवेशपाहुनी । स्तवकरितीदेवमुनी । विधीम्हणेवेदवाणी । पुंडरीकाक्षाजयतुझा ॥५०॥

भक्तार्तिनाशनाआधारा । सर्वप्रदाईश्वरा । धराशोभेदंष्ट्रांकुरा । नलिनीजेवींगजेंद्री ॥५१॥

तव आज्ञेकरुन । मीकेलेंहेंनिर्माण । चराचराचेंरक्षण । आदिरुपाकरावें ॥५२॥

एवंविधीस्तवीत । तवहिरण्याक्षदैत्य । पातलात्यातेक्रोधयुक्त । गदाघायेमारीविभू ॥५३॥

धराठेऊनस्थानीं । ब्रम्हादिकातोष उनी । हरिगेलास्वभुवनी । सुकराख्यानदिव्यहें ॥५४॥

विधीनेंमनुस्थापिला । पृथ्वीचातयाआधिपकेला । प्रजासृजम्हणेत्याला । स्रष्टासर्वजगांचा ॥५५॥

मनुसीझालेदोनसुत । थोरलातोप्रियव्रत । उत्तानपादनामेंहोत । पुत्रकनिष्ठतयाचा ॥५६॥

कन्यातीनमनुप्रती । आकूतिआणिदेवहूती । तीसरीजाणाप्रसूती । दक्षादिलीमनुनें ॥५७॥

रुचीसदिलीआकूती । यज्ञपुत्रतिजप्रती । मनूसरक्षीनिश्चिति । सहारुनिराक्षसा ॥५८॥

कर्दमादिलीदेवहूती । नवकन्यातिजप्रती । कपिलनामेंज्ञांनमूर्ति । पुत्रजाहलातियेचा ॥५९॥

सांख्याचार्यम्हणविला । कापिलकथिलेंमातेला । पुलहाश्रमींस्वयेगेला । अद्यापितेथेंविराजे ॥६०॥

ज्येष्ठपुत्रप्रियव्रत । विश्वकर्म्याचीकन्यावरित । बर्हिष्मतीनामेंविख्यांत । पितृआज्ञातोपाळी ॥६१॥

तिजपासूनदहासुत । झालेतेअतिनामांकित । अग्नीध्र इध्मजिव्हहोत । यज्ञबाहूतीसरा ॥६२॥

महावीररुक्मशुक्रक । घृतपृष्ठसवननामक । मेधातिथीवीतिहोत्रनवक । दहावापुत्रकविनामा ॥६३॥

कवीसवनमाहावीर । तिघेआत्माविद्यापर । परमहंसाश्रमीसत्वर । राहिलेमुक्तस्वानंदे ॥६४॥

एककन्याउर्जस्वती । धाकटीअसेतयाप्रती । दुजीभार्याएकहोती । तीनपुत्रतिसझाले ॥६५॥

उत्तमतोमसरैवत । मन्वंतराधीपतिघेहोत । राज्यकरीप्रियव्रत । अक्राअर्बुदवत्सरे ॥६६॥

एकविभागरविफिरत । अंधःकारतेव्हांपडत । नृपविचारीमनांत । तमकेवींममराज्जीं ॥६७॥

रथकरुनिसूर्यसम । प्रदक्षणाकरीमहाभौम । नाशकरीनसर्वमत । म्हणोनिफिरेसप्तधा ॥६८॥

तयाचेजेंरथगमन । सप्तसमुद्रझालेजाण । सप्तद्वीपेंतेक्षण । विभागझालेनारदा ॥६९॥

जंबुप्लक्षशाल्मली । कुशक्रौंचसंज्ञाकेली । शाकपुष्करेतेवेळीं । सप्तद्वीपेंपृथ्वींत ॥७०॥

सार इक्षूसुराघृत । क्षीरदधिमंडोदहोत । शुत्धोदक ऐसेसात । सागरजाहलेरथनेमी ॥७१॥

अग्निध्रादिसप्तसुत । क्रमेंस्थापीप्रियव्रत । जंबुदीपप्रथमाप्रत । दुजेंतिजेंक्रमानें ॥७२॥

भूमंडलाचाविस्तार । वर्णनकेलामनोहर । तोभागपुढेंसुंदर । बोलिजेलसंक्षेपें ॥७३॥

श्लोकशतैकसदतीस । भूमीचेउद्धरणविशेष । मनूचेंचरित्र इतिहास । वर्णनकेलाप्राकृतें ॥७४॥

देवीविजयेअष्टमैकः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP