अष्टम स्कंध - अध्याय दुसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नारायणम्हणेनारदासी । सर्वधरेचेमध्यासि । प्रथमजाणजंबुद्धीपासी । लक्षयोजनवाटोळे ॥१॥

नऊवर्षेंतयांत । समभागेंपर्वतांवित । नवनवसहस्रपरिमित । योजनप्रमाणवर्षांसी ॥२॥

दोनवर्षेंदणिणोत्तर । असतीऋषेधनुकार । लंबायमानपूर्वपर । दोनदोनदोहीबाजूं ॥३॥

मध्यभागीइलावृत । वर्षतेंचतुरस्रहोत । आयामत्याचानिघत । एकुणीससहस्रतो ॥४॥

पूर्वपरवर्षेदोन । एवंनऊनारदाजाण । इलावृत्तमध्यशोभन । नाभिस्थानभूमिचे ॥५॥

इलावृताचेमध्यावरी । मेरुनामेंमहागिरी । लक्षयोजन उंचबरी । वर्तुळबत्तीससहस्र ॥६॥

भूगोलहेंचकमळ । कर्णिकसुमेरुतेजाळ । सुवर्णपर्वतनिर्मळ । पुरेनऊजयावरी ॥७॥

सोळासहस्रयोजन । वर्तुळ असेमूळस्थान । तितकाचपृथ्वीसमान । होऊनियाराहिला ॥८॥

तितकाचखोल अंतरी । चौर्‍यांशीसहस्रयोजनेंवरी । तयाचेदाबचौफेरी । पर्वतचारठेविले ॥९॥

मंदर आणिमेरुमंदर । सुपार्श्वतैसाकुमुदथोर । अयुतयोजनेगेलेवर । विस्तीर्णवरीतैसेची ॥१०॥

पूर्वादिक्रमेंसर्वत्र । जाणवेंजेथेंउक्तिमात्र । केसराकृतीविचित्र । पांचपांचवर्तती ॥११॥

कुरंगकुरगदोन । कुसुभविकंकतदोन । त्रिकूटएकमिळून । पांचपूर्वेजाणिजे ॥१२॥

शिशिरपंतगरुचक । निषधशितिवासनामक । कपिलशंखवैदूर्यक । नारदाचारुधिजाणपांचवा ॥१३॥

हंसऋषभ्रनाग । नारदाकालंजरनग । वेष्टूनियाचहूंभाग । स्वर्णपर्वताराहिले ॥१४॥

अठरायोजनलंबींत । दोनसहस्र उंचहोत । ऐसेंदोनदोनपर्वत । चहूंबाजूसमेरुचे ॥१५॥

जठर आणिदेवकूट । कैलासतैसाकरवीरक । पवमानपारियात्रक । त्रिशृंगमकर आठहे ॥१६॥

चारीबाजूंआठाठगिरी । सुमेरुचीशोभासारी । सहस्रयोजनाभितरी । सर्वपर्वत जाणाहे ॥१७॥

दोनसहस्रयोजन । इलावृत्तचहूंकडून । अष्टसहस्रयोजन । भूमीजाणाइलावृत्ता ॥१८॥

इलावृत्ताचेदक्षणेस । जाणिजेतीनवर्षास । तैसेंचतीनगिरीस । समांतरेंओळखा ॥१९॥

निषधहेमकूटहिमालय । पूर्वविस्तृतगिरिराय । उंचगेलेअयुतकाय । दशयोजनविस्तीर्णत ॥२०॥

हरिवर्ष आणिकिंपुरुष । तृतीयहेंभारतवर्ष । एवंजाण उत्तरेस । गिरित्रयवर्षत्रय ॥२१॥

नीलश्वेतशृंगवान्‍ । मर्यादागिरीहेतीन । रम्यकहिरण्मयदोन । कुरुवर्षतीसरे ॥२२॥

इलावृत्तपूर्वभागांत । गंधमादनपर्वत । स्पर्शलानीलनिषेधाप्रत । भद्राश्ववर्षपुर्वेशी ॥२३॥

पश्चिमेसमाल्यवान । केतुमालनामेंवर्षजाण । एवंवर्षेसुलक्षण । जंबुद्वीपींअसतीपैं ॥२४॥

मंदरादिचारगिरि । चारवृक्षत्यावरी । अक्रायोजनविस्तारी । ध्वजासारिखेशोभत ॥२५॥

आंबाजांभुळकदंबवट । चारसरोवरेंउत्कृष्ट । चार उद्यानेंवरिष्ट । अप्सरादेवविहरती ॥२६॥

दुग्धमधुइक्षुरस । चौथेंसरीज्जलसुरस । नंदनचैत्ररथविभ्राजास । सर्वभद्रजाणवनें ॥२७॥

आंबेपिकूनखालेपडती । शिळेंपरीस्थूल असती । सुस्वादरसपाझरती । अरुणवर्णनदिवाहे ॥२८॥

आम्ररसाचीवाहिनी । अरुणोदानामेंपावनी । सर्वपापनिवारिणी । देवीतेथेंअरुणाख्या ॥२९॥

दैत्येश्वरेंपूजिली । अष्टनामेंगाइली । जीस्वयेंसुवर्णव्याली । ऐकनामेंनारदा ॥३०॥

आद्यामायाअतुला । अनंतापुष्टिईशमाला । दुष्टनाशाम्हणतीतिला । कांतिदायिनीनमोस्तु ॥३१॥

पूर्वेसकरुन इलावृत । अरुणोदाअसेंवाहत । जीचेउदकेंसुवासित । दशयोजनभूमीका ॥३२॥

ऐसीचजंबूरसवती । नदीजाहलीजंबूमती । इलावृत्तदक्षिणेप्रति । दक्षिणगांमिनीजाणिजे ॥३३॥

तेथेंनामेंजंब्वादिनि । परांबाअसेंभवानी । पूजिलीसर्वदेवानी । नामाष्टकेंकरुनिया ॥३४॥

कोकिलाक्षीकामकला । करुणाकामार्चनलोला । कठोरदेहाधन्यशीला । नाकिमान्यागभस्तिनी ॥३५॥

एवंदेवनमस्कारिती । सर्वसिद्धीपावती । तयानदीतीरमाती । सुर्यतापेंस्रुवर्णतें ॥३६॥

त्याचेंअनेक अलंकार । देवांगनालेंतीअपार । मुकुटादिअतिसुंदर । देवकरितीतयाचे ॥३७॥

कदंबाच्यापंचधारा । गेल्यापश्चिमेमधुसारा । शतयोजनगंधवारा । सुवासेंव्याप्तकरीतसे ॥३८॥

धारेश्वरीयोगमाया । सुरपूजितीत्याठाया । द्वादशनामेंकरुनिया । निरंतरसेविती ॥३९॥

धारेश्वरीमहादेवता । भक्ताकार्यदेवपूजिता । महोत्साहाकालकांता । महाननाकर्मदा ॥४०॥

कांतारग्रहणेश्वरी । कामकोटिप्रवृत्तकरी । द्वादशनाम्रीनमोस्तु ॥४१॥

तयावटापासून । पांचनदझालेउत्पन्न । इलावृत्त उतरेकडून । वाहतीतेविचित्र ॥४२॥

दुधदहीमधुघृत । गुडशर्कराबहुत । अन्नेंवस्त्रेंसहित । शय्याभूषणेंसर्वदेती ॥४३॥

मीनाक्षीतेथेंबैसली । सर्वदेवांपूजिली । षोडशनामेंस्तविली । सर्वकल्याणदायका ॥४४॥

नीलांबरारौद्रानना । नीलालकाफलदाना । वरदातीअतिमान्या । अतिपूज्यागजगती ॥४५॥

मदनोन्मादिनीमाया । आम्हींनमूंमानप्रिया । मानप्रियांतराछाया । मारवेगधरनामूं ॥४६॥

मारपूज्यामारमादिनी । मयूरवरशोभिनी । शिखिवाहनगर्भावनी । नमूंआम्हींसदैव ॥४७॥

त्याजलाचेंकरितांपान । सदाराहेनरतरुण । श्रमदौर्गंध्यभ्रमचिन्ह । नुपजेकदांमानवा ॥४८॥

मेरुचेमस्तकांवरी । ब्रम्ह्याचीअसेपुरी । दशसहस्रयोजनेपरी । मध्येंविस्तृत असेती ॥४९॥

त्यापुरीचेअष्टदिशी । दिग्पालपुरेरम्यदेशी । अडीचसहस्रयोजनेशी । विस्तारत्याचापृथक्‍ पृथक्‍ ॥५०॥

विष्णुत्रिविक्रमजाहला । तेव्हांपदस्पर्शझाला । भगवत्पदीनामजीला । गंगातेथेंप्रगटली ॥५१॥

बहुकाळेंतीनिघाली । ध्रुवलोकांतूनचालली । चंद्रमंडलीपातली । मगपडलीब्रम्हलोकी ॥५२॥

तेथेंजाहलीचारधारा । चारनामेझालीसत्वरा । सिताअलकनंदावेगवरा । चक्षुभद्राचवथेंहें ॥५३॥

सितानिघेपूर्वेकडून । गंधमादनींयेऊन । भद्राश्वनामेंवर्षांतून । पुर्वसमुद्रामिळाली ॥५४॥

अलकनंदाहिमाचली । येऊनभारतांआली । अतिवेगेसागरांगली । गंगादुर्लभसर्वत्र ॥५५॥

पश्चिमवहाचक्षूझाली । माल्यवान्पर्वतींआली । केतुमालांतूनगेली । पश्चिमसागरींनारदा ॥५६॥

भद्रानामेंचौथीधारा । शृंगवन्मार्गेसत्वरा । कुरुवर्षांतूनऋषिवरा । उत्तरसागरांमिळाली ॥५७॥

नद्यानद असतीअपार । अष्टवर्षेभोगपर । स्वर्गशेषपुण्यनर । भोगार्थतीनिर्मिली ॥५८॥

तेथेंवज्रसमशरीर । सहस्रायूहोतोनर । सदासुखभोग अपार । पुण्यशेषजसेंजसें ॥५९॥

भारतवर्षकर्मक्षेत्र । सर्वांमाजीअतिपवित्र । येथेंमिळवूनिसर्वत्र । तेथेंजावेंभोगाया ॥६०॥

तेथेंपुण्य असेगाठीं । तोंवरीचसुखगोष्टी । पुण्यनवाढेंएकवटी । भारतवर्षांविनाऋषे ॥६१॥

नववर्षाचेंमुख्यदैव । ऐकसांगेनविभव । सेव्यसेवकभाव । उकलूनिवर्णितो ॥६२॥

नववर्षांनारायण । अनुग्रहकरीआपण । स्वयंकरीदेवीपूजन । पृथक्रूपेपूज्यतो ॥६३॥

इलावृत्तामाजीभव । राहे एकसदैव । भवानीसहगणभैरव । संकर्षणाभजतसे ॥६४॥

भद्राश्ववर्षाचापती । भद्राश्वनामेंविख्याति । भजेतोहयग्रीवमूर्ती । आदिपुरुषविष्णुते ॥६५॥

हरिवर्षांतनृहरी । प्रल्हादत्याचेसेवनकरी । केतुमालवर्षांतरी । रमासेवीस्मररुपा ॥६६॥

रम्यकवर्षीमीनमूर्ती । मनुसेवीतयाप्रती । अर्यमातोकूर्माप्रती । हिरण्ययवर्षीसेवीतसे ॥६७॥

कींपुरुषींहनुमान । करीसीतारामसेवन । भारतामाजीमजलागुन । सेविसीतूंनारदा ॥६८॥

भारतामाजीपर्वत । आहेतनारदाबहुत । नद्यातैशाचिबहुत । मूख्यमुख्यवर्णितों ॥६९॥

मलयमंगलमैनाक । ऋषभकोलत्रिकूटक । सह्यदेवगिरीकुटक । श्रीशैलवेंकटाद्री ॥७०॥

वारिधारविंध्यऋष्यमुक । भुक्तिमानऋक्ष महेंद्रक । पारियात्रद्रोणरैवतक । गोवर्धनचित्रकूट ॥७१॥

ककुभगौरमुखनील । कामगिरीइंद्रकील । अर्बुदनागसिद्धाचल । आणीक असतीबहू ॥७२॥

ताम्रपर्णीचंद्रवशा । कृतमालाविपाशा । वटोदकाविहायसा । कावेरीवेणापयस्विनी ॥७३॥

तुंगभद्राकृष्णवेणी । शर्करावर्तकापयोष्णी । भीमरथीनिर्विंघ्यातापिनी । सुरसाशरयुनर्मदा ॥७४॥

ऋषिकुल्यात्रिसामागोमती । यमुनामंदाकिनीसरस्वती । सुषोमाशतद्रूद्वृषद्वती । चंद्रभागामरुद्धधा ॥७५॥

वितस्ताअसिक्नीचर्मण्वती । महानदीविश्वारोधवती । ऐरावतीसप्तवती । सिंधूशोणमहानंद ॥७६॥

नारदाहेंवर्षभारत । श्रेष्ठ असेंसर्वांत । देवऋषीयासीस्तवित । पुण्यभूमिउत्तमही ॥७७॥

जपहोमयज्ञदान । धर्मकर्मवेदाध्ययन । नानाशास्त्रेंअवलोकन । देवीसेवनयामाजी ॥७८॥

जंबुद्वीपाउपद्वीपें । आठ असतींअमूपें । समुद्रामाजीदिव्यरुपें । ऐकनारदासांगतो ॥७९॥

स्वर्णप्रस्थचंद्रशुक्र । आवर्त आणिरमणक । मंदरोपाख्यहरिणक । पांचजन्यसाहवें ॥८०॥

सिंहललंकाआठजाण । प्लक्षद्वीपादिप्रमाण । उत्तरोत्तरतोद्विगुण । मानेंजाणसर्वही ॥८१॥

चार आणिदोनशत । श्लोकेंभूगोलवर्णित । जंबुद्धीपयेथेंसांगत । भाषांतरेंजगदंबा ॥८२॥

देवीविजयेष्टमेद्वितीयः ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP