अष्टम स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । जंबुद्वीपाचेंवेष्टण । क्षारोदलक्षयोजन । तयासीझालेंवेष्टण । प्लक्षद्वीपद्विगुणतें ॥१॥

आग्नीध्रनृपजंबुद्वीपीं । नद्यापर्वतसर्वद्वीपीं । सातसातमुख्यत्वें ॥२॥

सर्वांमाजीवर्षेंसात । चारजातीम्हणवित । नामेंसर्वांचीसांगत । नारायणनारदा ॥३॥

शिवयवसमद्रशांत । क्षेम अमृत अभयसात । इध्मजिव्हापुत्रहोत । सप्तवर्षेंपुत्रनामें ॥४॥

हंसपतंग उर्ध्वायन । सत्य ऐसेचारवर्ण । सहस्रायुप्रमाण । अर्कदैवतत्याचेअसे ॥५॥

अरुणाअनृम्णाआंगिरसी । सावित्रीसुप्रभापुण्यरासी । ऋतंभरासत्यंभरेसी । नद्यासातसुप्रभ ॥६॥

ज्यांचेहोतांदर्शन । पापजायनिरसुन । दिव्यकांतीतेजगहन । स्पर्शतांचिहोतसे ॥७॥

मणिकूट इंद्रसेन । वज्रकूटज्योतिष्मान । हिरण्यष्टीवसुपर्ण । मेघमालसातगिरी ॥८॥

मर्यादाकारीपर्वत । दोनीसागरांस्पर्शित । वर्षेंहोतीबहुलंबित । समानतत्‍ सर्वही ॥९॥

प्लक्षादिसर्वद्वीपांत । आयुर्बलतेजकांत । बुद्धिधैर्यपराक्रमबहूत । स्वाभाविकसिद्धते ॥१०॥

प्लक्षनामेंवृक्षपळस । प्लक्षद्वीपींमहौजस । जंबुसमानथोरवृक्ष । प्लक्षद्वीपींपळसाचा ॥११॥

तयाद्वीपारीद्विगुण । इक्षुरससमुद्रजाण । शाल्मलद्विगुण । मद्यसमुद्रेवेष्टिलेतें ॥१२॥

प्लक्षवृक्षासमान । येथेंशाल्मलीमहान । गरुडाचेहेंस्थान । स्वामीयेथेंयज्ञवाहू ॥१३॥

तयाचेहीपुत्रसात । त्यानामेंवर्षेंहोत । मर्यादार्थपर्वत । सातनद्याऐकिजे ॥१४॥

सुरोचनसौमनस्यरमण । पारिभद्र आप्यायन । सातवाविज्ञातजाण । पुत्रनामेंवर्षासी ॥१५॥

सरसगिरीशतश्रृंगक । वामदेवकुमुदकंदक । साहवानगपुष्पर्षक । सहस्रश्रुतीसातवा ॥१६॥

सिनीवालीअनुमती । कुहूरजनीसरस्वती । नंदाराकानद्यासाती । सोमदैवतसर्वांचे ॥१७॥

श्रुतधरवीर्यधर । वसुंधर इषुंधर । एवंवर्णतेथेंचार । घृतसमुद्रभोंवता ॥१८॥

कुशद्वीपतेथेंअसें । दर्भस्तंबमोठा असे । ज्याचेंतृणस्वप्रकाशें । उजळवीतोदेश ॥१९॥

तेथेंनृपहिरण्यरेता । सप्तवर्षेंसप्तसुता । विभागकरीतत्वता । नामेऐकातयांची ॥२०॥

वसुवसुदाननाभिगुप्त । दृढरुचिसत्यव्रत । भामदेवतैसाचिविक्त । वर्षेंजाणासुतनामें ॥२१॥

चक्रचतुश्रृंकूटक । कपिलद्रविणदेवानीक । उध्वरोमानामक । पर्वतसातजाणिजे ॥२२॥

रसकुल्यामित्राविंदा । मधुकुल्याश्रुतविंद । देवगर्भाघृतविंदा । मंदमालासातवी ॥२३॥

कुशलकोविद अभियुक्त । कुलकचारवर्णहोत । सर्वहीअग्नीसेवित । सर्वज्ञसर्वजनतेथें ॥२४॥

कुशद्वीपाचेआवरण । घृतसागरपरिपूर्ण । क्रोंचद्वीपयाहूनद्विगुण । क्षीरसागरेंवेष्टिलें ॥२५॥

येथेंक्रोंचनामेंपर्वत । ज्यासीषण्मुखविदारित । क्रोधेंशक्तिप्रहारित । दुखंडझालाभिन्नकुक्षी ॥२६॥

क्षीरोदकवरीसिंचून । वरुणेंकेलारक्षण । हीकथास्कंदपुराण । पाहतांकळेश्रोतया ॥२७॥

द्वीपातेंचिनामजाहलें । घृतपृष्टेंस्वामित्वकेलें । सातपुत्रत्यासिझाले । सप्तवर्षेंवाटिली ॥२८॥

आममधुरुहमेघपृष्ठ । सुधामालोहितभ्राजिष्ठ । वनस्पतीहेपुत्रश्रेष्ठ । सप्तवर्ष अधिपती ॥२९॥

शुक्लवर्धमानभोजन । बर्हणभद्रनंदनंदन । शैलसात ऐसेंजाण । नद्याआतांसांगतों ॥३०॥

अभयाअमृतौघावती । आर्यकाआणितीर्थवती । पांचवीवृत्तिरुपवती । शुक्लापवित्रासातह्या ॥३१॥

पुरुषऋषभद्रविण । देवक ऐसेंचारवर्ण । भजतीआपोनारायण । वरुणासिसर्वते ॥३२॥

क्षीरसमुद्राचेपार । शाकद्वीपमहाथोर । बत्तीसलक्षयोजनावर । दधिमंडोदतेवढा ॥३३॥

शाकद्वीपींशाकतरु । तैशाचमानेंमहाथोरु । मेधातिथीनृपवरु । पुत्रजाणप्रियव्रताचा ॥३४॥

त्याचेसात असतीसुत । पुरोजवश्रेष्ठसर्वांत । मनःपूर्वजवदुजाहोत । पवमानसुततीसरा ॥३५॥

धुम्रानिकचित्ररेफ । साहवानामेंबहुरुप । विश्वधृक ऐसेंवर्षभूप । स्थापूनीगेलायोगगती ॥३६॥

ईशान उरुशृंगक । बलभद्रशतकेसरक । सहस्रस्रोतदेवपालक । महासेनसप्तगिरी ॥३७॥

अनघाप्रथमायुर्दा । उभयस्पृष्टींअपराजिता । पंचपदीसहस्रसुता । निजधृतीसातवी ॥३८॥

सत्यव्रतक्रतुव्रत । दानव्रत अनुव्रत । चारवर्णपुरुषनांदत । प्राणवायूउपासिती ॥३९॥

दधिमंडोदापैलीवर । द्वीपमोठेंपुष्कर । स्वादोदकाचासागर । भोवतालीतयांच्या ॥४०॥

चौसष्टलक्षयोजन । याद्वीपाचेंप्रमाण । जेथेंअसेंविधीचेआसन । पुष्करनामयाकरितां ॥४१॥

तेंलक्षदळाचेकमळ । स्वर्णवर्ण अतितेजाळ । मानसोत्तरनामेंशैल । तेथेंअसेंएकटा ॥४२॥

दहासहस्रयोजन । उंचिआणिविस्तीर्ण । चारदिशेशींचारभुवन । तयावरीशोभती ॥४३॥

इंद्रयमवरुणकुबेर । चौघांचातेथेंविहार । मेरुप्रदक्षिणाभास्कर । तेथोनिचकरितसे ॥४४॥

संवत्सरात्मकयंत्र । तेथेंफिरेअहोरात्र । अधिपतेथेंवीतिहोत्र । पुत्रदोनतयासी ॥४५॥

रमणधातकीदोन । वर्षेंकरितीपालन । तेथीलनारदासर्वजन । निर्गुणब्रम्हसेविती ॥४६॥

मेरुपासूनमानसोत्तर । सप्तद्वीपेंसप्तसागर । चौपनलक्षदोनकोटविस्तार । योजनाचाजाणिजे ॥४७॥

मेरुपासुनदधिसागर । त्याचेजेथेंपैलतीर । आरंभतेथेंद्विपपुष्कर । अंतरतेथवरीजेंअसें ॥४८॥

सव्विसलक्षएककोटी । भूमीषटद्वीपपोटीं । इतुकीचशुद्धोदपैलतटीं । भूमिअसेंप्राणियुक्त ॥४९॥

पुढेंलोकालोकपर्यंत । भूमीअसेम्स्वर्णखचित । सर्वप्राणीविरहित । देवक्रीडार्थनिर्मिली ॥५०॥

त्याचभूमीचेप्रमाण । सत्तरलक्षाष्टकोटीजाण । चतुर्थांशजाहलापूर्ण । तेथवरीपृथ्वीचा ॥५१॥

सत्तावीसलक्षएककोटी । सप्तसागरभरलेनेटीं । त्रेपनलक्षदोनकोटी । प्राणिसंचारगिरीसह ॥५२॥

आठकोटीसत्तरलक्ष । भूमीप्राण्याअलक्ष । बाराकोटीपन्नासलक्ष । चतुर्थांशभूमीचा ॥५३॥

द्वितीयचतुर्थांशांत । लोकालोकनामेंपर्वत । प्राकारापरीशोभत । ध्रुवाहूनिउंचतो ॥५४॥

यापर्वताचेआंत । सूर्यजेथेंप्रकाशत । पंचवीसकोटीतेथ । योजनहोयधरित्री ॥५५॥

अर्धवरीराहिली । द्यौतीचम्हणविली । मध्येंजीहीपोकळी । आकाशनामतयाचे ॥५६॥

लोकालोकाचेपैल । ज्ञानीचएकपाहील । तीनीलोक अंतराल । पोटांतज्याच्यानिर्मिले ॥५७॥

लोकम्हणजेदृश्य । अलोकम्हणजेअदृश्य । दोनीसंधीतशैलेश । लोकालोकनामतेणें ॥५८॥

चारिदिशातयांवरी । विधिठेवीदिग्गजचारी । ऋषभपुष्कचूडकरी । वामनचौथाअपराजित ॥५९॥

करावयाजगरक्षण । स्वयेतिष्ठेनारायण । सवेज्याच्याविष्वक्सेन । कल्पवरीजगत्प्रभू ॥६०॥

अंडपुर्वीअचेतन । भेदकरीहरभगवान । मध्येंशिरलापूषण । मार्तंडनामयाकरितां ॥६१॥

पंचविसकोटचहूंकडे । भूमीभागजेथेंनिवडे । मध्यतोचिमार्तंडें । भ्रमणार्थकल्पिला ॥६२॥

सर्वलोकांसचेतन । करीसूर्यनारायण । लोकमित्रहोऊन । करीमेरुप्रदक्षिणा ॥६३॥

सर्वजीवांचाप्राण । सूर्यचिआत्माजाण । दृष्टिदातानारायण । प्रकाशरुपेंसर्वांशी ॥६४॥

उत्तरमागजेव्हांधरी । दिवसतेव्हांमोठाकरी । दक्षिणेवळताशर्वरी । वाढवीतकालात्मा ॥६५॥

अयनेंजीम्हणतींदोन । दक्षिण आणिउदगयन । तीजाणासूर्यापासून । प्रदक्षिणाक्रमयोगें ॥६६॥

जेम्हणवेंउत्तरायण । तेंअसेंउंचस्थान । पर्वतावरीआरोहण । दीर्घकालहोतसे ॥६७॥

अधोभागानेंगमन । तेंचजाणादक्षिणायन । मार्गतोचिअवरोहण । गतिसत्वरहोतसे ॥६८॥

जोमार्गसमान । विषुवत्म्हणवेतेंस्थान । दिनरात्रहोयसमान । समगतीनेंतेधवा ॥६९॥

श्लोक । यदाचमेषतुलयोः संचच्छरेत्थिदिवाकरः । समानानित्वहोरात्र्याण्यातनोतित्रयीमयः ॥१॥

अर्थ । मेषतुलाराशीवरी । प्राप्तहोयजेव्हांहरी । दिवारात्रसमानकरी । तीसतीसघटीतो ॥७०॥

श्लोकज्यांतएकशेंतीन । सप्तद्वीपाचेंवर्णन । प्राकृतबोलेसकरुण । भक्ततारिणीभवानी ॥७१॥

श्रीदेवीविजयेअष्टमस्कंदेतृतीयोध्यायः समाप्तः ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP