दशम स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नारायणजेजीवन । जीवमात्रज्यापासून । त्याआपाचेंस्थान । अयनतेंचीजीवाचे ॥१॥

सर्वजनाचेंअधिष्ठान । अथवाजगज्याचेंशरण । तोसर्वात्मानारायण । सृष्ठिस्थित्यंतकारीजो ॥२॥

सर्वशक्तीचेंपुंरुप । तेंचिहेंहरिरुप । चित्कलाज्ञानस्वरुप । अवर्णनीयपरात्मा ॥३॥

विश्वतोचिहकार । तैजसत्यांतरकार । प्राज्ञतोचिइकार । हरिनामेंगाइला ॥४॥

हरिनामाचीसरी । उपमानसेदूसरी । निर्गुणतोचिगुणाकारी । हरी रुपेंप्रत्यक्ष ॥५॥

हकारतेंचिगगन । शून्यपरीभासमान । रकारतेंचिरुपभान । इकारतेंचिचिद्रूपें ॥६॥

ऐसाहाचैतन्यघन । परात्मामधुसूधन । सर्वशक्तीचेनिधान । शक्तीरुपप्रगटहें ॥७॥

भ्रांतिहोतादूर । हेंचिभासेपरात्पर । नातरीहागुणाकार । सत्वमूर्तीप्रसन्न ॥८॥

सर्वत्रव्यापून असे । कुटस्थकोणानदिसे । विष्णूनामशोभतसे । सर्वमायेश्वरहाचिपै ॥९॥

जगतांसीव्यापूनिया । कारणरुपामनोमया । तिसम्हणतीविष्णुमाया । मायेशसत्यश्रीविष्णू ॥१०॥

हाचिशक्तीहाचिशिव । हाचिआत्माआणिजीव । मनबुद्धिहाचिसर्व । इंद्रियेंआणिदेवतां ॥११॥

हाचिकर्म आणिज्ञान । हाचिभक्तितपविज्ञान । हाचिसिद्धीचिदघन । निरालंब आनंदहा ॥१२॥

हाचिशास्त्रेंवेदधर्मा । कामक्रोधलोभ अधर्म । हाचिवेदाचेंमुख्यवर्म । चालकपालकहाचिहरी ॥१३॥

पंचभूतेंत्यांचेगुण । ओतप्रोतनारायण । विधिहरिहर आपण । स्वशक्त्याचिनटलासे ॥१४॥

ऐसेंहेंपरात्पर । भक्तजनांचेंमाहेर । क्षमावरक्षमासागर । कृपाकरपापध्नहा ॥१५॥

सूर्यचंद्रतारांगण । विद्युत्पावकतेजोगण । लक्षांशज्यांचाव्यापुन । अनंतांडेंराहिला ॥१६॥

चतुर्विद्धहोऊन अन्न । रसरुपस्वयेंचिनटून । भोक्तास्वयेंचिहोऊन । भोजनकरीस्वयेंची ॥१७॥

स्वयेंचिझालाजाठर । अन्नपचवींनिरंतर । स्वयेनटलादुर्निवार । समीरणप्राणजो ॥१८॥

चलनवलनप्रसारण । अकुंचनतैसेंधावन । स्वयेंकरीभगवान । लीलासहजजयाची ॥१९॥

चोरकुटिलदंभिजार । मोहमत्सर अहंकार । नटलास्वयेंसावेकार । निंद्यनर्कनटलास्वयें ॥२०॥

सात्विकशुद्धनिरामय । भोगमोक्षस्वयेंअव्यय । तोचिवर्णींचिन्मय । भागवतसर्वभाषेंत ॥२१॥

दशमस्कंदाचेंकथानक । मन्वंतरेंवर्णनसंम्यक । नारायणपरमधार्मिक । नारदासीसांगतसे ॥२२॥

स्वायंभूनामेंविख्याति । मनुजोशतरुपापती । तपलातपएकचित्तीं । उभाराहे एकपदें ॥२३॥

जीतेंद्रियजीतसमीर । शतवर्षेंजेवीस्थावर । ध्यानकरीनिराहार । वाग्भवबीजजपतसे ॥२४॥

पराशक्तीचेंकरीध्यान । एकाग्रझालेंमन । अंबाझालीप्रसन्न । वर इच्छितमागह्मणें ॥२५॥

ऐकतांचिमधुरवचन । मनुउघडीतसेनयन । तवझालेंदिव्यदर्शन । प्रत्यक्षरुपदेवीचे ॥२६॥

कुंकुमपंकिलदेहकांति । चतुर्भुजदिव्यशोभती । पाशांकुशेक्षुशराकृती । पुष्पेंधरिलींजियेनें ॥२७॥

मृगमदरेखिलेंचंदन । ईषत्शोभेसुहास्यवदन । नगनगलेइलीभूषण । मुकुटमाथांझळकतसे ॥२८॥

आरक्तकांततीनीनयन । रक्तकौशेयपरिधान । चोळीलेइलीशोभन । कमलहाररुळेगळां ॥२९॥

कमलासनींस्थिरावली । समरुपसख्यानीसेविली । पाहातांचिसाष्टांगेंनमिली । मनूनेंतेव्हांअतिहर्षें ॥३०॥

पुनःपुनःलोटांगण । करीबहुप्रदक्षिण । पुलकांकित अश्रुनयन । सगदगदस्तवीतसे ॥३१॥

विशालाक्षीसर्वांतरें । मान्येपूज्येजगद्वरे । सर्वमंगलेजनोद्धारे । जय अंबेनमोस्तुते ॥३२॥

विधिइंद्रहरिहर । तवकटाक्षेंईश्वर । यमपाशीरविकुबेर । जयसत्तेनमोस्तुते ॥३३॥

अग्निवायूईशान । निऋतिसोम उडुगण । पंचभूतेंतवाधीन । जयशिक्षेनमोस्तुते ॥३४॥

जरीदेशीमजवर । सृष्टींविध्नेंजावोंतदूर । प्रजासुखेंनिरंतर । वाढोत अंबेतवकृपें ॥३५॥

वाग्भवासिजेपती । सिद्धीहोवोंत्यांप्रती । देईत्यांसीभुक्तिमुक्ती । अखंडभक्तिदेईमज ॥३६॥

तयादेऊनवरदान । विंध्याचलागेलीआपण । सूर्यमार्गरोधिलाजेण । अगस्तीनेंनिजविला ॥३७॥

तीचहीविंध्यवासिनी । नंदजाजीकृष्णभगिनी । चपलाचमकेजीगगनीं । तीचजाणनारदा ॥३८॥

देवीवरेंतोमनुवर । राज्यकरीमन्वंतर । प्रजावाढलीअपार । देवीकृपेंतयाची ॥३९॥

हेंसुरस आख्यान । श्लोकगायत्रीप्रमाण । करितांश्रवणपठण । इच्छितसर्वहोतसे ॥४०॥

देवीविजयेदशमस्कंदेस्वायंभुमनुवर्णनन्नामप्रथमोध्यायः ॥१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP