दशम स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । स्वायंभूमचनूचासुत । नामत्याचेप्रियव्रत । उत्तानपादनामेंसुत । स्वायंभूचाधाकटा ॥१॥

उत्तानपादाचासुत । ध्रुवनामेविख्यात । अढळपदतयादेत । अच्युत अतिप्रेमानें ॥२॥

प्रियव्रताचासुत । स्वारोचिषनामें असत । यमुनातीरीतपकरीत । जीर्णपर्णेंभक्षुनी ॥३॥

मूर्तीकरुनमातीची । पूजाकरीदेवीची बारावर्षेंहोतांचि । प्रसन्नझालीअंबिका ॥४॥

स्वारोचिषादिलावर । दुजामनुमन्वंतर । निष्कंटकराज्यथोर । केलेंकृपेंतारिणीच्या ॥५॥

प्रियव्रताचादुजासुत । उत्तमतोहितपकरीत । तीनवर्षेंउपोषित । गंगातीरीबैसला ॥६॥

तोतिजामनूजाहला । देवीवरलाधला । मन्वंतरभोगूनराज्याला । जाहलातोराजर्षी ॥७॥

प्रियवताचातिजापुत्र । तामसनामेंसुचरित । तपकरीनवरात्र । शरच्चैत्रपुजाविधीं ॥८॥

नर्मदेचेंदक्षणतीर । सेविलेंबीजकामेश्वर । चौथामनुराज्यथोर । देवीवरेंभोगिलें ॥९॥

प्रियव्रताचाचौथास्रुत । नामत्याचेरैवत । पांचवामनुविख्यात । अंबेकृपेनेंजाहला ॥१०॥

चाक्षुषनामेंअंगसुत । पुलहासीशरणजात । राज्यवंशमोक्षसतत । प्रार्थींतसेऋषींसी ॥११॥

वाग्बीजपूजाविधान । पावलामुनीपासून । विरजातीरायेऊन । तपतेणेंआरंभिलें ॥१२॥

वाळकीभक्षूंनपानें । जपकरीएकमनें । वायुभक्षतिजेंवर्षी ॥१३॥

एवंबारावर्षेंझाली । अंबातेथेंप्रगटली । सर्ववांछापूर्णकेली । चाक्षुषमनुसाहवा ॥१४॥

सुर्यपुत्रवैवस्वत । श्राद्धदेवदेवीभक्त । सातवामनुतोभोगित । देवीवरेंराज्यासी ॥१५॥

स्वारोचिषमनूंत । चैत्रवंशीनृपसुरथ । राज्यभ्रष्टजायवनांत । सुमेधामुनीचेआश्रमीं ॥१६॥

मुनीसम्हणेंनृपती । जाणूनहीसर्वमजप्रती । मोहहोतोदुःखचित्तीं । गतराज्याचाकिमर्थ ॥१७॥

मुनीम्हणेमहामाया । आकर्षुनिज्ञानींह्रदयां । मोहगर्तेतटाकुनिया । जन्ममरणदाखवी ॥१८॥

तिचेचकृपेवांचून । नतुटेंकदांबंधन । जन्ममोक्षासिकारण । तीचएकजगन्माया ॥१९॥

कायनामकायगुण । पराक्रमशीलवासस्थान । संभवकैसाकायखूण । सर्वसांगतियेचे ॥२०॥

ऐसेंऐकेनृपवचन । ऋषिकरीवर्णन । अनंतनाम अनंतगुण । शुद्धशीलतियेचे ॥२१॥

सर्वजगवासस्थान । अजन्मातीअव्ययजाण । पादभक्तीचीहीखूण । नृपाजाणतियेची ॥२२॥

भक्ताचेंकरायारक्षण । प्रगटेस्वयेंचिआपण । मधुकैटभभयेकरुन । ब्रम्हदेवेंस्तवियेली ॥२३॥

नमोनिद्रेसर्वभद्रे । नाशिसीसर्व अभद्रे । नमोमातेमुखचंद्रे । तंद्रेमुद्रेनमस्ते ॥२४॥

नमोनमोजगद्धात्री । नमोअभिष्टफलदात्री । नमोनमोजन्मकर्त्री । महामायेनमस्ते ॥२५॥

नमोसमुद्रशयने । नमोनमोकमलनयने । सर्ववशविधायिने । कर्मफलेनमस्ते ॥२६॥

नमोनमोकालरात्री । महारात्रीमोहरात्री । नमोनमोदुष्टहंत्री । मदोत्कटेनमस्ते ॥२७॥

नमोनमोव्यापिनी । नमोवशगामिनी । नमोतुजमानिनी । आनंदसीमेनमस्ते ॥२८॥

नमोनमोमहनीये । नमोनमोमहामाये । नमोनमोअव्यये । महाराध्येनमस्ते ॥२९॥

नमोनमोपरात्परे । नमोपरमेसर्ववरे । नमोनमोदयापरे । लज्जेपुष्टीनमस्ते ॥३०॥

नमोकीर्तीकमनीये । जगद्वंद्येकांतिमये । नमोकरुणेचिन्मये । जागृद्रूपेनमस्ते ॥३१॥

नमोनंदपरायणे । नमोएकएकवर्णे । नमोद्वितीयोद्विवर्णे । दयारुपेनमस्ते ॥३२॥

नमोनमोत्रिवर्गनिलये । नमोत्रिरहितेत्रये । तुर्येतूर्यपदाश्रये । पंचमीतेनहस्ते ॥३३॥

नमोपंचभुतेशी । नमोषष्ठीदेविशी । नमोषडवर्गनाशिशी । षडाम्नायेनमस्ते ॥३४॥

नमोसप्तवारात्मिके । नमोसप्तऋष्यात्मिके । नमोसप्तभूम्यात्मिके । सप्तवरदेनमस्ते ॥३५॥

नमोअष्टमीवसुमती । नवग्रहांतूंगृहवती । नमोवरागवती । नवांकेतुजनमस्ते ॥३६॥

नमोदशावतारे । नमोनमोदिशाधारे । नमोरमेरुद्रपरे । एकादशिनीनमस्ते ॥३७॥

नमोएकादशगणे । नमोद्वादशीभुजगुणे । नमोनमोद्वादशद्युमने । त्रयोदशीनमस्ते ॥३८॥

नमोत्रयोदशवती । नमोविश्वेदेवसती । नमोभुवनमयज्योती । चतुर्दशीनमस्ते ॥३९॥

नमोचतुर्दशेंद्रवरदे । नमोतत्कोणवासदे । नमोनमोमनुफलदे । पंचदशीनमस्ते ॥४०॥

नमोदेवीषोडशी । नमोषोडशकलेशी । नमोनमोपरेशी । असुरहंत्रीनमस्ते ॥४१॥

एवंकरीतांस्तुती । दयार्द्रझालीभगवती । जागीझालाश्रीपती । मधुकैटभमारिलें ॥४२॥

ऐसाचएकदांमहिषासुर । पळविलातेणेंपुरंदर । यमचंद्राग्नीकुबेर । सर्वतेणेंपळविलें ॥४३॥

यज्ञभागस्वयेंघेत । त्रैलोक्येंद्रतोचिहोत । बहुवर्षेंपर्यंत । दुःखितदेवजाहले ॥४४॥

आलेहरिहराजवळ । वृत्तकळविलेंसकळ । तवप्रगटेतेजसोज्वळ । सर्वदेवदेहांतुन ॥४५॥

तेजाचीझालीदिव्यनारी । अष्टादशभुजासुंदरी । त्रिनयनातीकृशोदरी । सन्मानिलीसर्वथा ॥४६॥

वस्त्रेंभूषणेंवाहन । शस्त्रेंआस्त्रेंधनुर्बाण । पानपात्रमाल्याभरण । तांबुलादिसमर्पिले ॥४७॥

देवास आनंदथोर । देतगर्जलीसुस्वर । व्याप्तझालेदिशांतर । शब्देकरुनतेसमईं ॥४८॥

देवऋषिकरितीस्तुती । मधुपानीहोयप्रीती । हस्यवदनसूर्यंकांती । सिंहारुढामहालक्ष्मी ॥४९॥

शब्द ऐकूनघोर । क्रोधेंधांवेमहिषास्रुर । सवेसैन्य अपार । युद्धारंभजाहला ॥५०॥

शस्त्रेंदैत्यवर्षति । छेदीअंबासहजगती । सैन्यनासूनसमस्ती । महिषासुरवधियेला ॥५१॥

देवीकेलेंस्तवन । तयांदेऊनवरदान । सवेंचझालीअंतर्धान । महामायापरांबा ॥५२॥

शुंभनिशुंभदोन असुर । यांसीझालाब्रम्हवर । रक्तबीजादिघेऊन असुर । आलास्वर्गजिंकाया ॥५३॥

सर्वदेवपराभविले । त्रैलोक्येंद्रतेचिझाले । इंद्रादिकशरणगेले । जगदंबेशीहिमाचली ॥५४॥

तेथेंआलीपार्वती । दुःखपुसेदेवाप्रती । तिचेदेहांतूनपरंज्योती । प्रगटलीकालिका ॥५५॥

अभयदेउनीदेवांशी । स्वयेंगेलीशत्रुपुराशी । बैसलीरम्य उपवनेशी । आरंभिलेंगायन ॥५६॥

पाहूनिरुपसुंदर । गायन ऐकुनीसुस्वर । चंडमुंडदोघेअसुर । वृत्तसांगतीशुंभासी ॥५७॥

तेणेंऐकतांचिवृत्त । असुरजाहलामोहित । पाठविलासुग्रीवदुत । बोलावणेंअंबेसी ॥५८॥

दुतम्हणेगेसुंदरी । चालशुंभासुराचेंघरी । रत्नभोक्तातोनिर्धारी । स्त्रीरत्नतूंनिश्चयें ॥५९॥

देवजिंकिलेंसमस्त । तोअसेत्रैलोक्यनाथ । तयासीकरुनीकांत । अपारसुखभोगावे ॥६०॥

ऐकोनीहसेंअंतरी । दुर्गाबोलेमनोहरी । सत्यदूतावाक्यपरी । प्रतिज्ञाकेलीम्याएक ॥६१॥

बाळपणींचखेळतां । सख्यासीबोलिलेदूता । तोचिकरीनमीभर्ता । जिंकीलजोयुद्धींमज ॥६२॥

त्वांशुंभासिसांगिजे । जिंकुनमजनेइजे । अथवाजरीभय उपजे । वेगेंजाईपाताळां ॥६३॥

ऐकताच ऐसीमात । दूतमुखेंशुंभदैत्य । क्रोधेंधूम्राक्षदैत्य । पाठविलाआणाया ॥६४॥

साठसहस्त्र असुर । घेऊन आलासमोर । अंबाकरीहुंकार । धृम्राक्षभस्मजाहला ॥६५॥

सैन्यमारीकेसरी । चंडमुंड आलेसत्वरी । प्रगटेकालीभ्रुवांतरी । महाघोराभयप्रदा ॥६६॥

चंडमुंडतिणेंवधिले । चामुंडानामजाहलें । तव आणिकसैन्य आलें । रक्तबीजासह अपार ॥६७॥

अंबेचेदेहांतून । शक्तीनिघाल्यासुलक्षण । ब्राम्हीरौद्रीकौमारीजाण । वैष्णवीवाराहीनृसिंही ॥६८॥

ऐंद्रीआणीशिवदूती । दैत्यसैन्यमारिती । अंबात्यारक्तबीजाप्रती । मारीशस्त्रेंअपार ॥६९॥

रक्तबिंदूभुमीवर । उत्पन्नहोतिअसुर । दैत्यझालेअपार । भयवाटलेंदेवाशीं ॥७०॥

अंबावाक्येचामुंडा । रक्तचाटींप्रचंडा । शस्त्रघायेंखंडखंडा । करुनीधाडिलास्वर्गासी ॥७१॥

निशुंभशुंभदोघेजण । अंबाहस्तेंपावलेंमरण । संतोषलेअमरगण । स्तविलीत्यांहींपरांबा ॥७२॥

एवंकरुनीमर्दन । देवांचेंकेलेंरक्षण । नानारुपेंकरुन । भक्तरक्षीसर्वदा ॥७३॥

नारदासांगेनारायण । स्रुरथासीएवंबोधून । नवाक्षरमनुदेऊन । पूजाविधीसांगितला ॥७४॥

नृपेंकेलेंआराधान । निराहारवर्षेंतीन । पावलातेव्हांवरदान । स्वराज्य आणिमनुत्व ॥७५॥

सूर्यापासूनहोणार । सावर्णीनामेंनृपवर । सातवामनुसाचार । देवीवरेंसुरथतो ॥७६॥

हेंसुरस आख्यान । करितांश्रवणपठण । वाछिंतत्याचेसर्वपूर्ण । देवीप्रसादेंहोतसे ॥७७॥

सहाआणिदोनशत । श्लोकदेवीकथामृत । मन्वंन्तरांचेचरित । आठमनुवर्णिले ॥७८॥

श्रीदेवीविजयेदशमेतृतीयः ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP