दशम स्कंध - अध्याय दुसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । विंध्याद्रीचेआख्यान । नारदासांगेनारायण । जन्मेजयापराशरनदन । शौनकादिकांसूतसांगे ॥१॥

विंध्याचलनामेंपर्वत । शृंगवान्परमाभ्दुत । नारदतयागृहांयेत । सहजफिरतांकौतूकें ॥२॥

विंध्येंकरुनिसत्कार । पूजिलाभावेंमुनिवर । आसनीबैसवोनिसमोर । उभाठाकेनम्रत्वें ॥३॥

म्हणेआजिझालोंधन्य । पादस्पर्शेंपावन । सूर्यापरीआगमन । निर्भयार्थ आपुलें ॥४॥

येणेंझालेंकोठून । नवलकीजेंवर्णन । मनोगतमीऐकेन । स्वामीचेंकाय असेंतें ॥५॥

नारदेंलाविलीकळ । मोठाकौतुकीप्रबळ । विंध्यासिम्हणेतेवेळ । मेरुपर्वतांहुनीआलोंअसें ॥६॥

अष्टदिग्पालाचेलोक । तेथेंअसतीसुखदायक । ऐसेंबोलोनिवाक्य । श्वासोश्वासटाकीतसे ॥७॥

उच्छवासाचेंकारण । शैलपुसेंशंकितमन । नारदम्हणेऐककारण । सांगतोतुज इंद्रारे ॥८॥

गौरीपिताहिमाचल । शिवचास्वशुरकेवळ । पूज्य असेतोप्रबळ । शिवसंबंधेंपर्वता ॥९॥

कैलासतोशिवस्थान । पूज्यतेणेंतोपावन । निषध आणिगंधमादन । पूज्य असतीस्वस्थानी ॥१०॥

सूर्यप्रदक्षणाकरित । तोहाकनकपर्वत । गर्व असेययाबहूत । पूज्यमान्यधन्यतेचा ॥११॥

त्याचागर्वपाहून । श्वास आलानवलवाटून । जेंलोकींझालेंमहान । गर्वत्यांसीनसावा ॥१२॥

असोकरणेंकायमज । तवगृहींआलोंसहज । प्रसंगेंसांगीतलेंतुज । जातोंआतांब्रम्हलोकां ॥१३॥

एवंतयासीवदोन । देवमुनीजायतेथोन । चिंतालागलीदारुण । विंध्यमानसींतेधवा ॥१४॥

केवींजिंकावेंमेरुसी । बुद्धीउपजेतयाशी । सूर्यादिप्रदक्षिणायाशी । करितीतेणेंगर्व असे ॥१५॥

रोधितायाचिप्रदक्षिण । गर्वहोईलतेव्हांक्षीण । मजलायेईलशरण । जयएवंविचारिला ॥१६॥

मगशरीरवाढविलें । आकाशसर्वव्यापिलें । सर्वांचेमार्गलोपले । आड आलाविंध्याद्री ॥१७॥

प्रकाशेपूर्वीअरुण । मार्गनाहींसेंपाहून । सूर्यासिसांगेअरुण । गमनमार्गनसेची ॥१८॥

आड आलापर्वत । रथतेथेंचितिष्ठत । अंधःकारझालापृथ्वींत । अर्धमार्गीमेरुच्या ॥१९॥

लोपलेसर्वसंध्यास्नान । अनर्थप्रवर्तेदारुण । कैचाहोमकैचेंहवन । व्याकुळसर्वजाहले ॥२०॥

अर्धभागांतीलजन । सूर्यतापेंतयाशीण । सर्वस्वीआलेंमरण । भयभीतदेवझाले ॥२१॥

ब्रम्हरुद्रादिदेवगण । आलेजेथेंनारायण । सांगतीसर्ववर्तमान । कारणविंध्य अनर्थाचे ॥२२॥

विष्णूम्हणेदेवासी । देवीभक्त अगस्तीऋषी । तोहरीलविंध्यतेजासी । काशीसराहेमुनीती ॥२३॥

मुक्तीदात्रीशिवपुरी । तेथेंजाउनीसर्व अमरीं । प्रार्थूनियापरोपरी । ऋषीआणादक्षिणे ॥२४॥

विष्णुवाक्य ऐकून । देवनिघालेतेथून । श्रीकाशीप्रतियेऊन । धन्यममानितीआपणा ॥२५॥

श्रीगंगेचेंदर्शन । मनकर्णिकेचेकेलेस्नान । तारकेशातेपूजुन । दानेंदेऊनीब्राम्हणां ॥२६॥

पाहूनिमहास्मशान । देवकरितीलोटांगण । धन्यधन्ययेथेंमरण । अमरकीमर्थजाहलों ॥२७॥

निघालेसर्वतेथून । विश्वनाथाचेंदर्शन । विशालाक्षीचेंपूजन । पाहिलीमग अन्नपूर्णा ॥२८॥

धुंडिराजदंडपाणी । नंदीवीरभद्रमणी । काळभैरवायैउनी । समर्पितीवडाघोडा ॥२९॥

गंगागुहाआणिकाशी । पाहूनिआलेवेगेशी । नमूनिसाक्षिविनायकाशी । ऋषिआश्रमींपातले ॥३०॥

मैत्रावरुणाकरुननमण । देवींआरंभिलेंस्तवन । नमोनमोश्रेष्ठवर्ण । ब्राम्हणश्रेष्ठनमोस्तुते ॥३१॥

जयभूसुरेश्वरा । नमोब्रम्हऋर्षीश्वरा । नमोचतुर्वेदधरा । शास्त्रतत्वज्ञानमोस्तु ॥३२॥

वातापीबलसूदना । आतापीप्राणहरणा । बिल्वलासुरनाशना । समुद्रशोषणानमोस्तु ॥३३॥

कुंभसंभवातपोधना । लोपामुद्राप्रियप्राणा । शस्त्रशापप्रहरणा । सर्वसमर्थानमोस्तु ॥३४॥

ज्याच्याउदयेंकरुन । दिशाजलेंप्रकाशमान । फुलतींकाशसुमन । नमस्कारुंतयाशी ॥३५॥

ऐकतांचिदेववचन । सर्वदेवांतेपाहून । ऋषिवरझालाप्रसन्न । नवलकरीमानसी ॥३६॥

म्हणेआजिकेलेंधन्य । सर्वदेवींदिलेंदर्शन । ऋषीबोलेहासोन । किमर्थयेणेंजाहले ॥३७॥

जेसर्वलोकांचेपालक । असुरांचेजेअंतक । कर्माचेंफलदायक । कायदुष्करतुम्हांशी ॥३८॥

किमर्थमांडिलेंस्तवन । इछितसांगामजलागुन । कार्यतुमचेसाधीन । यथाशक्तीसत्यत्वें ॥३९॥

देवम्हणतीमहर्षी । रोधिलेसुर्यमार्गासी । विंध्याचलतपोराशी । अनर्थतेणेंओढवला ॥४०॥

त्याचेकरावेंस्तंभन । स्वयेंतेथेंजाऊन । अवश्यम्हणेकुंभनंदन । देवगेलेस्वभुवनां ॥४१॥

मगभार्येसहमुनी । गंगास्नानकरुनी । विश्वेश्वरातेनमुनी । दंडपाणीपूजिला ॥४२॥

कालभैरवांयेऊनी । प्रार्थींतसेमहामुनी । कांकाढिसीकाशितुनी । भक्तरक्षकाभैरवा ॥४३॥

विध्नेंसर्वांचिहरिसी । मजकांबाहेरकाढिशी । कोणचेपापफळाशी । आलेंतेणेंवियोगहा ॥४४॥

पराचेजेअवगुण । न उच्चारिलेआपण । नकेलेंमिथ्याभाषण । कापट्याक्रियानकेलीमी ॥४५॥

एवंप्रार्थूनीभैरवासी । पूजिलेंसाक्षिविनायकाशी । निघालाऋषिदक्षणेशी । काशीविरहेंसंतत्प ॥४६॥

नलागतांएकक्षण । मनोगतीतपोधन । भार्येसहपातलाजाण । जेथेंविंध्य उठावला ॥४७॥

पहातांचऋषीशी । शैलकापलामानसी । लहानझालावेगेंसी । साष्टांगेनमीऋषिते ॥४८॥

तयानम्रपाहून । ऋषिबोलेप्रसन्न । जोंवरीपरतयेईन । तोंवरीरहाऐसाची ॥४९॥

तूंमोठींगंडशिळ । चढावयानाहींबळ । म्हणोनीलघुरुपेंकेवळ । राहेवत्सातोंवरी ॥५०॥

ऐसेंतयाआज्ञापून । मुनिनिघेतेथून । श्रीशैलातेपाहुन । मलयपर्वतींराहिला ॥५१॥

अगस्तीनजायपरत । विंध्यतैचाचिराहत । सूर्यादिद्रहपूर्ववत । नमनकरुंलागले ॥५२॥

हेंविंध्याचेंआख्यान । विप्रपराक्रमवर्णन । श्रवणेंकरीपावन । देवीभक्तचरित्रहें ॥५३॥

पंचावन आणिएकशत । श्लोक असतीभागवत । तेचयेथेंभाषेंत । वदलीअंबादयेनें ॥५४॥

श्रीदेवीविजयेदशमेद्वितीयः ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP