मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान| भूपाळी नद्यांची नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान भूपाळी नद्यांची भूपाळी रामाची ध्यान सगुणध्यान निर्णुंण ध्यान नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान - भूपाळी नद्यांची समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ भूपाळी नद्यांची Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥ ॥ प्रात:काळीं चवथ्या प्रहरीं उठोन, हस्त पाद प्रक्षाळण करून भूपाळी म्हणावी ती ॥ प्रात:काळीं पात: स्रान । घडे केलिया स्मरण । महादोषांचें दहन । महिमा गहन पुराणीं ॥धृ०॥ गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी । पूर्ण फल्गु भोगावती । रेवा गौतमी वैतरणी ॥१॥कुंदा वरदा माहेश्वरी । तुंगभद्रा आणि कावेरी । गणिका तप्ती मलापहारी । दुरितें हरी जान्हवी ॥२॥काळी कालिंदी किंकिणी । कपिलायणी इंद्रायणी । नलिनी आर्चिनी धर्मिणी । ताम्रपर्णी नर्मदा ॥३॥मणिकर्णिका भोगावती । ककुद्मती हेमावती । सीता प्रयाग मालती । हरिद्वती गंडिका ॥४॥भीमा वरदा मंदाकिनी । महापगा पुन:पुनी । वज्रा वैष्णवी कुमुदिनी । अरुणा वरुणा नारदी ॥५॥शरयू गायत्री समुद्रा । कुरुक्षेत्र सुवर्णभद्रा । दास म्हणे पुण्यक्षेत्रा । नाना नद्या गोविंदीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP