शिवरात्रमाहात्म्य - अभंग ११ ते १५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११.
पंचशतामाजी दोघी पतिव्रता । जारणी सर्वथा सर्व कांहीं ॥१॥
करुनियां ऐसीं जाती नरकासी । नांडिलें पतीसी त्यांच्या पापें ॥२॥
करिती एक वेळ झांकिती लोचन । शेवटीं बंधन यमाहातीं ॥३॥
नामा ह्मणे बरें नव्हे हे कोणासी । घडेल तयासी जाच बहू ॥४॥

१२.
राष्ट्रं करी पाप राजानें भोगावें । राजियाचें तें सर्व पुरोहितां ॥१॥
बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही । परी तें को-णाही न कळे वर्म ॥२॥
शिष्यें केलें पाप भोगावें गुरूनें । स्त्रिनें केलें घेणें पुरुषासी ॥३॥
नामा ह्मणे जन मायेंत गुंतले । सेखी खाती झोले संसाराचे ॥४॥

१३.
ऐसें बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्रीं हारपली ॥१॥
मरोनियां जन्म हरणाचा पावला । पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥
प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी । केलीं जैसीं तैसीं घ्यावीं फळें ॥३॥
नामा म्हणे देव कृपा करील जरी । सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥

१४.
होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥
जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥
धाकुटीला दोन्ही पाडसें गोजिरीं । दुजी गरोदरी पूर्ण मास ॥३॥
नामा म्हणे पुढें काय झाली गती । कथेची संगति ऐका बरी ॥४॥

१५.
देवलोकीं इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथें ॥१॥
सेवेसी चुकतां होय तूं किरात । ऐसें इंद्रें त्यातें शापियेलें ॥२॥
शेज सज्ज करितां अंतर पाडिलें । ह्मणोनी घडले भोग त्यासी ॥३॥
नामा ह्मणे सेवा करणें हें कठीण । त्यानें व्हावें जाण सावधान ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP