मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे|
श्लोक ४६ ते ५०

सहस्त्र नामे - श्लोक ४६ ते ५०

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


सर्वमङ्गलमाङ्गल्य: सर्वकारणकारणम्‌ ।
सर्वदा-एककर: शार्ड्गी बीजापूरी गदाधर: ॥४६॥
२५१) सर्वमङ्गलमाङ्गल्य---सर्व मंगलांचे मंगल करणारा. सर्व मंगलांमध्ये श्रेष्ठ मंगल.
२५२) सर्वकारणकारणम्‌---सर्व कारणांचे कारण असणारा. ज्यापासून निर्मिती होते ते म्हणजे कारण.
२५३) सर्वदैककर---ज्याचा एकमात्र कर सर्व काही देणारा, धारण करणारा आहे.
२५४) शार्ङ्गी---ज्याने शृंगनिर्मित (शृंग = शिंग.) शिंशापासून बनविलेले धनुष्य धारण केले आहे.
२५५) बीजापूरी---अनेक बीजांनी भरलेले डाळींब ज्याने हातात धारण केले आहे असा. डाळिंब हे बहुप्रसवद्योतक आहे. ते प्रजनन व समृद्धी यांचे प्रतीक आहे.
२५६) गदाधर---हाती गदा धारण करणारा.
इक्षुचापधर: शूली चक्रपाणि: सरोजभृत्‌ ।
पाशी धृतोत्पल: शाली-मञ्जरी-भृत्‌ स्वदन्त-भृत्‌ ॥४७॥
२५७) इक्षुचापधर---उसाचे धनुष्य धारण करणारा.
२५८) शूली---हाती त्रिशूळ धारण करणारा.
२५९) चक्रपाणि---हाती चक्र धारण करणारा.
२६०) सरोजभृत्‌---हाती कमळ धारण करणारा. (सरोज = कमळ)
२६१) पाशी---हाती पाश धारण करणारा.
२६२) धृतोत्पल---नीलकमल धारण करणारा. (उत्पल = कमळ)
२६३) शालीमञ्जरीभृत्‌---ज्याच्या हातात साळीची लोंबी आहे.
२६४) स्वदन्तभृत्‌---आपला खंडित दात हाती धारण करणारा.
कल्पवल्लीधर: विश्व-अभयद-एककर: वशी ।
अक्षमालाधर: ज्ञानमुद्रावान्‌ मुद्‌गर-आयुध: ॥४८॥
२६५) कल्पवल्लीधर---हाती कल्पवल्ली धारण करणारा.
२६६) विश्वाभयदैककर---एका हाताने विश्वाला अभय प्रदान करणारा.
२६७) वशी---विश्वाला वश करणारा.
२६८) अक्षमालाधर---अक्षमाला धारण करणारा. (रुद्राक्षांची माळ)
२६९) ज्ञानमुद्रावान्‌---ज्ञानमुद्रा धारण करणारा. अंगठा आणि तर्जनी संयोग म्हणजे ज्ञानमुद्रा.
२७०) मुद्‌गरायुध---मुद्‌गर नामक शस्त्र हाती असलेला.
पूर्णपात्री कम्बुधर: विधृत-अलि-समुद्‌गक: ।
मातुलिङ्गधर: चूत-कलिका-भृत्‌ कुठारवान्‌ ॥४९॥
२७१) पूर्णपात्री---अमृतकलश धारण करणारा.
२७२) कम्बुधर---हातात शंख धारण करणारा. (कम्बु = शंख) किंवा हातात कडे घालणारा कंबु याचा ‘कडे’ असाही अर्थ अहे.
२७३) विधृतालिसमुद्‌गक---ज्याच्या मदरसाने युक्त अशा गण्डस्थलावर भ्रमरसमूहं गुंजारव करीत आहे असा. भुंग्यांचा समूह धारण करणारा.
२७४) मातुलिङ्गधर---ज्याने आपल्या हातात महाळुंग नावाचे फळ धारण केले आहे. (मातुलिङग = महाळुंग)
२७५) चूतकलिकाभृत्‌---ज्याच्या हातात आम्रमंजरी आहे. (चूत = आम्रवृक्ष)
२७६) कुठारवान्‌---ज्याच्या एका हातात कुर्‍हाड आहे असा.
पुष्करस्थ-स्वर्णघटी-पूर्ण-रत्न-अभिवर्षक: ।
भारतीसुन्दरीनाथ: विनायक-रतिप्रिय: ॥५०॥
२७७) पुष्करस्थस्वर्णघटीपूर्णरत्नाभिवर्षक :---- सोंडेवर धरलेल्या काठोकाठ भरलेल्या सुवर्णकलशातून रत्नांचा वर्षात करणारा.
२७८) भारतीसुन्दरीनाथ---भा म्हणजे सरस्वती, रती म्हणजे पार्वती, सुन्दरी म्हणजे लक्ष्मी यांचे नाथ अर्थात्‌ ब्रह्मा-महेश आणि विष्णू रूपात भक्तांसाठी लीला करणारा. भारतीरूपी सुंदरीचा नाथ. पती.
२७९) विनायकरतिप्रिय---विनायक गणांमध्ये क्रीडेचा आनंद घेणारा किंवा विनायक म्हणजे नायकरहित म्हणजेच परब्रह्म. परब्रह्मानंदात असणारा.

N/A

References : N/A
Last Updated : July 19, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP