(आतां वस्तूंच्या संभवणार्या संबंधावर आधारलेल्या निदर्शनेचें उदाहरण हें :---)
“सत्पुरुष (घरीं आले असतां) त्यांना पाहुणचार करावा, असा गृहस्थाश्रमी लोकांना (म्ह० गृहस्थांना) बोध करणारा (उपदेश करणारा) जो उदय पर्वत, आकाशांत आलेल्या सूर्याला आपल्या डोक्यावर घेतो, (तो)”
ह्या श्लोकांत, ‘रानशेणींचा विस्तव विद्यार्थ्यांना शिकवितो’ ‘भिक्षा माणसाला रहायला लावते,’ वगैरे प्रयोगांप्रमाणें वरील, ‘गृहमेधिन: य: बोधयन:०’ हा प्रयोगही ‘आनुकूल्य’ या अर्थीं, णिच म्ह० प्रयोजकभेदाचा झालेला आहे यामुळें, व उदयपर्वताचा माथा, सूर्य उगवतो त्या जागेपर्यंत भिडलेला असतो,. त्यावरून, (म्ह० त्यानें आपल्या डोक्यावर, आलेल्या सूर्याला घेतलें आहे यावरून) तो पर्वत, गृहस्थाश्रमींच्या मनांत, “सत्पुरुष (पाहुणे म्हणून घरीं) आले असतां त्यांचें आदरातिथ्य करावें.” असा बोध होण्याला अनुकूल आचरण करीत आहे असें म्हणणें शक्य आहे यामुळें, व ‘माझ्या (म्ह० उदय पर्वताच्या) प्रमाणें इतरांनींही अतिथींची सेवा करावी,’ असें साद्दश्य येथें प्रतीत ओतें यामुळें, या श्लोकांत दोन वस्तूंच्या संभवित संबंधावर आधरलेली (संभवद्वस्तु संबंधमूला) निदर्शना हा (निदर्शनेचा) प्रकारही शक्य आहे (असें म्हणायला हरकत नाहीं).
“ह्या श्लोकांत, बोधयन ह्याचा, ‘जणु कांहीं बोध करणारा’ असा अर्थ केल्यास, ‘व्यालिम्पति तमोङगानि नभो वर्षति कज्जलम्’ (अंधकार अंगाला लेप करतो आहे, आकाश काजळाची वृष्टि करीत आहे) या गम्य उत्प्रेक्षेप्रमाणें येथेंही गम्य उत्प्रेक्षा होईल,” असेंही कुणाला म्हणतां येणार नाहीं; कारण एखादी वस्तु खरोखरीच संभवत असेल तर, तेथें संभावना अगर उत्प्रेक्षा होऊच शकत नाहीं. (तेथें उत्प्रेक्षेची प्राप्तीच नसतें.)
येथें संभवद्वस्तुसंबंधमूला निदर्शना जी मानली ती, ‘धातुनोक्तक्रिये नित्यंत कारके कर्तृतेष्यते ।’ (धातूने सांगितलेली क्रिया म्ह० व्यापार ज्या ठिकाणीं आहे असें जें कारक, तें नित्य कर्ताच असतें.) या वैय्याकरणांच्या मतें, पूर्वीं सांगितलेल्या पद्धतीनें बरोबर जूळते; पण कर्ता या शाब्दांत मूळ अकृ हा धातु आहे; त्या कृ धातूचा अर्थ करणें; व करणें म्हटलें कीं त्यांत प्रयत्न हा अर्थ आलाच, कृ या धातूचा यत्न करणें हा अर्थ न मानला तर, केलेलें व न केलेलें (म्ह० चेतन व अचेतन) असे पदार्थाचे दोन विभागच जुळणार नाहींत. म्हणून ‘कृ’ चा यत्न हा अर्थ घेऊन त्याला सकर्मक धातूपुढें येणार्या कर्तृ प्रत्ययाचा, आश्रय या अर्थी होणारा तृच (उदा० कर्ता धर्ता वगैरेंत असलेला) प्रत्यय लावून, कर्तृ असें असें रूप बनविलें; व त्या कर्तृपदाचा अर्थ निरूढ लक्षणेनें, यत्नाचा आश्रय, असा केला. हाच, तृच ह्या कर्तृप्रत्ययाचा मुख्य अर्थ; परंतु ‘रथो गच्छति’ याचा “गमनक्रियानुकूलयत्नाश्रय: रथ: ।” असा साब्दबोध थो असल्यानें व तो यत्न रथाचे ठिकाणीं संभवत नसल्यानें, त्या ठिकाणीं गच्छति यांतील ति या प्रत्ययाचा अर्थ जो ‘यत्नाश्रयत्व’ तो बदलून लक्षणेनें दुसरा अर्थ करावा. एवंच काय कीं, “वाक्यांतील कर्ता खरोखरीच धातूनें दाखविलेल्या क्रियेला अनुकूल असा यत्न करूं शकत असेल, तेथें कर्तृत्वाचा मुख्यार्थ मानावा; एरव्ही अचेतन कर्त्याचे ठिकाणीं तो अर्थ लाक्षणिक मानावा.” या नैय्यायिकांच्या मताप्रमाणें विचार केला तर, येथें बोधयन् ह्यांतील ‘बोह करणें’ ही क्रिया उप्दयपर्वताच्य बाबतींत संभवत नसल्यामुळें, ‘जणु कांहीं बोध करणारा’ अशी गम्य उत्प्रेक्षाच शक्य आहे.