व्याघात अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“ज्या ठिकाणीं एका कर्त्यानें ज्या साधनानें एखादें कार्य केलें असेल, अथवा तें करण्याची इच्छा असेल, त्या कर्त्याहून दुसर्या एका कर्त्यानें, त्याच साधनाच्या योगानें, वरील कार्याच्या विरुद्ध कार्य करण्यानें अथवा करण्याच्या इच्छेनें, पहिल्या कार्यांत जें विघ्न केलें जातें, त्याला व्याघात अलंकार म्हणावें.”
ह्या व्याघातांमध्यें पहिल्या कर्त्याहून दुसर्या कर्त्याचा निराळेपणा स्पष्ट प्रतीत होत असल्यानें, व्यतिरेक अलंकाराची सिद्धि हें या अलंकाराचें फल आहे. वरील लक्षणांत, कर्तृत्व जें सांगितलें आहे त्याचा अर्थ कार्याच्या उद्देशानें प्रवृत्त होणें हा घ्यावा. (म्ह० एखादी वस्तु स्वभावत:च एखादें फल देत असेल तर, त्या वस्तूच्या फलाविषयीं कर्त्याचें कर्तृत्व आहे असें येथें म्हणतां येणार नाहीं.) कर्तृत्वाची अशी विशिष्ट व्याख्या आम्ही कां करतों कारण आम्ही आतांच पुढें सांगणार आहोंत, व्याघाताचें उदाहरण :---
‘दुष्टांच्या समूहांनीं आपल्या (कठोर) भाषणानें प्रत्यहीं चिरहून टाकलेल्या दीनरूपी वृक्षांना, सदोदित आनंदी वृत्तीचे असे सज्जनांतील श्रेष्ठ पुरुष त्याच (पण मधुर) भाषणानें पालवितात (पल्लवयुक्त करतात).’
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP