मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|साम्राज्यवामनटीका| श्लोक १ ते २० साम्राज्यवामनटीका श्लोक १ ते २० श्लोक २१ ते ४० श्लोक ४१ ते ६० श्लोक ६१ ते ८० श्लोक ८१ ते १०० श्लोक १०१ ते १२० श्लोक १२१ ते १४० श्लोक १४१ ते १५५ साम्राज्यवामनटीका - श्लोक १ ते २० वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक १ ते २० Translation - भाषांतर लब्ध चिन्मकरंदातें वर्णी वामन ग्रंथिं या ॥अर्थानुभव हा घेतां मनोमोह न त्यागितां ।मुरतें स्वसुखानंदीं सर्वही तोचि पांहु तें ॥१॥यास्तौ अनुभूतिलेश नामें संपूर्ण ग्रंथ हा ।करूनि अर्पिला पायीं शेषशायी हरीचिया ॥२॥समश्लोकी असी टीका तो श्रीवत्सांक स्फूरवी ।तसी करूनि ते अर्पी त्याच श्रीपदपंकजीं ॥३॥सत्यज्ञानानन्त आत्मा असे बम्हाचि निश्चयें ।असत् अज्ञान अल्पत्व निषेधानेंच जाणतो ॥४॥आत्मा सत्य असद्देह अनित्य तद्विलक्षण ।आत्मा देह नव्हे तेव्हां असे अन्य तयाहुनी ॥५॥देहात्मता निषेधें या पंचभूतें समातृक ।जातांतमोगुणें युक्त अन्नमय निषेध हा ॥६॥आत्मा ज्ञान असे प्राण अज्ञान तद्विलक्षण ।तेव्हां आत्मा नव्हे प्राण असे अन्य तयाहुनी ॥७॥प्राणात्मता निषेधानें इंद्रियें द्विप्रकार ही ।जातां रजोगुणासह निषेध प्राणकोश हा ॥८॥आत्मा अनंतचि मन अल्पत्वें तद्विलक्षण ।आत्मा तेव्हां मन नव्हे असे अन्य तयाहुनी ॥९॥मनात्मतानिषेधानें चित्तबुद्धि अहं मन ।जातां सत्त्वगुणेंयुक्त मनोमय निषेध तो ॥१०॥कोशत्रयनिषेधें या आत्मता नाहिं जाणतां ।दावी गुरु नखशिखें साक्षित्वीं मग त्याहि ती ॥११॥देहीं ब्रम्हांडिंही तैसा जो देहद्वयतीत त्या ।दिसे जेणें अहंराहू चंद्र आत्मा तयासची ॥१२॥एवं कोशत्रयातीत आत्मा चंद्र तया मनें ।अहंकृच्छाखेपरता पाहती सत्त्वदृष्टिनें ॥१३॥प्रळयीं जें जरे शेष निषेध शेषही तसें । आदि अंतीं एकचि जें मध्येंही तें असेच कीं ॥१४॥ब्रम्हांडीं प्रत्यकत्वें जे आत्मता कळतांच ते ।ब्रम्हांड उत्पत्ति लय आत्मत्वीं मग जाणती ॥१५॥सृष्टी प्रळयज्ञानानें कीं आत्मा सत्यकीरण ।यास्तौ भासे जगजळ न तें सत्य असत्यचि ॥१६॥देह द्रष्टा भिन्न स्थूळ सूक्ष्म देह चराचरा ।साक्षित्वें जाणता सर्व वास सर्वत्र यास्तव ॥१७॥कोशत्रय जडोपाधीनिषेधें आत्मसिद्धता ।झाली मनोमया कोशीं शुद्धी ते वंपदात्मक ॥१८॥न मोडे परि संस्कार अविद्येचे अनादि ते ।मोडती तेहि विद्येनें जाणतां तत्पदात्मक ॥१९॥जीवात्मता वंपदेंची तत्पदें परमास्मता । विद्याऽविद्योपाधित्यागें ब्रम्हा असें ‘असी’ पद ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP